-
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र तीव्र निषेध करत आहे.
या निर्घृण दहशतवादी हल्ल्यात देशातील विविध भागातील मृत्यूमुखी पडलेल्या २८ पर्यटकांच्या कुटुंबियांच्या दु:खात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक मंडळ सहभागी होत त्यांना आदरांजली वाहत आहे व या दहशतवादी हल्ल्याच्या मागील शक्तींना शिक्षा देण्याची मागणी करताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक मंडळ सर्व कट्टरवादी धर्मांध शक्तींच्या विरोधात एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन जनतेला करीत आहे
.
