महाराष्ट्र अंनिसच्या ग्रंथदिंडीच्या प्रेरणा पुरस्कारांचे वितरण

विश्वास पेंडसे -

‘शोध नवोदितांचा’ ही संकल्पना मनात घेऊन महाराष्ट्र अंनिस, पिंपरी-चिंचवड शाखा, अंनिस ग्रंथदिंडी यांच्या वतीने प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या वेळी अंनिस कार्यकर्ता प्रेरणा पुरस्कार (राज्यस्तरीय) २०२३ सन्मान प्रदान सोहळा निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे संपन्न होत असताना राज्यातून दहा जणांना हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानपत्र आणि एक हजार रुपये किमतीची पुस्तके देण्यात आली. हा सन्मान डॉ. अभिजित सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी डॉ. राजेंद्र कांकरिया (ट्रस्टी – सोनद ट्रस्ट), विश्वास पेंडसे (म. अंनिस ग्रंथदिंडी), अनिल चव्हाण (सहसंपादक), तसेच प्राची दुधाणे (संस्थापक-सहसंचालक, वारसा सोशल फाऊंडेशन, पुणे) आदी उपस्थित होते. रेश्मा कचरे, सविता कोठावळे, मंदाकिनी गायकवाड, सई सावंत, अनिकेत केदारी, विजय पाटील, पांडुरंग तिखे, दिनेश आदलिंग, राहुल केदारी, लालनाथ चव्हाण आदींचा सन्मान करण्यात आला. या सन्मानाबद्दल सर्वांनी विशेष समाधान व्यक्त केले. या पुरस्काराने अजून काम करण्याचे जबाबदारी वाढली असल्याचे पुरस्कारार्थी यांनी मांडलेले आहे. या कार्यक्रमांतर्गत डॉ. अभिजित सोनावणे यांच्या लिखित भिक्षेकरांचा डॉक्टर वैशिष्ट्यपूर्ण आत्मकथन अनुभव चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मिलिंद देशमुख (विश्वविक्रमी प्रेरणादायी अनुभव) व दिनेश आदलिंग (स्वयंप्रेरित युवा राष्ट्रीय गरज) चित्रफित दाखवून पुरस्कारांना सुरुवात केली. या वेळी अनेकांनी मनोगते व्यक्त केली. महाराष्ट्र अंनिसचे कार्य याबद्दल विचारमंथनही करण्यात आले. भिक्षा देण्यापेक्षा मदत करा, हात द्या आणि त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यांना भिक्षा देऊन आयतं मिळाल्याने भिकारी रस्त्यावर निर्माण होतील. त्यांना कामं करायला प्रोत्साहन दिले तर स्वावलंबी होतील, असे डॉ. अभिजित सोनावणे यांनी सांगितले.

विश्वास पेंडसे, निगडी, पुणे


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]