‘देशद्रोही’ होत चाललेल्या लेकी

भरत यादव - 9890140500

(दिशा रवीला समर्पित)

भारतमातेच्या लेकी
देशद्रोही होताहेत
विद्रोही होत चालल्याहेत

कधी आदिवासींच्या संघर्षाबरोबर उभ्या ठाकतात
तर कधी दलितांबरोबर
आणि कधी काश्मिरींची बाजू घ्यायला सरसावतात
कधी ‘सीएए’च्या विरुद्ध बंडात सहभागी होतात
कधी ‘लिंचिंग’च्या विरोधात हुंकार भरतात
कधी पिंजरा तोडण्याचे आंदोलन करतात
कधी ‘हाथरस टोळक्या’विरुद्ध
अग्रेसर होतात
या पर्यावरणरक्षणाच्या मोहिमेत सामील होतात
कधी राम-रहीमला आव्हान देतात
कधी आसाराम बापूला
आणि कधी चिन्मयानंदला
आजकाल शेतकरी-मजूर आंदोलनाच्या बाजूने झेंडा फडकवताहेत

त्या सत्तांधांना आव्हान देताहेत
लव्ह करणे अधिकार आहे
खुलेआम दावा करताहेत
गरज पडली तर या आपल्या पित्याविरुद्धदेखील बंड करत आहेत
लाज-शरम धुडकावत पुरुषी संस्कृतीची ऐशीतैशी करताहेत
आजकाल या मोठे पराक्रम गाजवताहेत
थेट सत्तेला आव्हान देताहेत
या कधी ‘जेएनयू’त दिसताहेत
कधी ‘जामिया’त
कधी दिल्ली विद्यापीठात
या कुठेही प्रकट होत आहेत
या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत
या तुरुंंगात जायलाही नाहीत घाबरत
नीडर बनल्या आहेत
या लेकी अंधारामध्ये
मशाल बनून समोर येताहेत
यातच माझी एक निरागस लेक
दिशा रवी सुद्धा सामील झालीये

सलाम माझ्या लेकींनो!
मला तुमचा अभिमान वाटतो
तुम्ही आशेच्या किरण आहात
उषःकाल होणार आहे,
तुम्ही सर्वजणी याची साक्ष आहात


-मूळ हिंदी कविता : सिद्धार्थ रामू

मराठी अनुवाद : भरत यादव
yadavbh515@gmail.com
संपर्क : 9890140500


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]