अरुण कुमार -
ठाऊक नाही कधी त्याने
ग ला गायीत बदलवून टाकले
मी क म्हणजे कायदा म्हणत
राहिलो
परंतू
झ पासून बनलेल्या झुंडीने
चिरडून टाकले
तबरेजचे स्वप्न
अखलाखचे अस्तित्व
पहलू खानचे घर
आणि
ह पासून बनलेल्या हिंसेमध्ये
सहभागी होत गेले तमाम
त पासून बनलेले तमाशाखोर
ब पासून बनले संवेदनाहीन बघे
त्या झुंडी
म पासून आपले मनोबल वाढवित राहिल्या
काळाचे हे क्रूर मारेकरी
झुंडीच्या रूपात खरेतर
कट्टरवादाचे प्रतिनिधी होते
जे रूजवत होते
धार्मिकतेची नवी परिभाषा
बदलवत होते सेक्यूलर राष्ट्राची वर्णमाला
तर
झुंडी असल्याची खंत
वाटत नव्हती
खंत तर याची होती की
या झुंडींविरोधात
मी गप्प होतो
मूळ हिंदी कविता – अरुण कुमार
मराठी अनुवाद – भरत यादव
संपर्क – 9890140500
yadavbh515gmail.com