-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा जालना च्या वतीने नालंदा बुद्धविहार, नागेवाडी येथे ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी भंते धम्मधर शाक्य पुत्र महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत आम्र वृक्ष, राय जांभूळ, बेंगलोर ब्युटी, फणस, फॅशन फ्रूट यांसारख्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव मधुकर गायकवाड यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व आणि आजच्या पर्यावरणाची स्थिती व वाढते मायक्रो प्लास्टिकचे प्रदूषण याचे भान प्रत्येकाने ठेवून पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे या संदर्भात माहिती दिली.
