-
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, माजी आमदार, लेखक, युवकांचे प्रेरणास्थान, ‘युवक क्रांती दला’चे संस्थापक आणि ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाचे संपादक डॉ. कुमार सप्तर्षी यांचे दिनांक १८ जुलै २०२६ रोजी दु:खद निधन झाले. त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या संपादक मंडळातर्फे भावपूर्ण आदरांजली!
