-

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त जादूटोणा विरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याबद्दल प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जनसंवाद यात्रा सुरू करण्यात आली. निवृत्त पोलिस महासंचालक अशोक धिवरे यांनी पुणे येथील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर ज्या ठिकाणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती. त्या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवून या यात्रेची सुरुवात केली. या कायद्याबद्दल अंनिस संपूर्ण महाराष्ट्रात फिरून जगजागृती करणार आहे.
या यात्रेतून अंनिसचे कार्यकर्ते नंदिनी जाधव, प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे हे जनसंवाद करणार आहेत. या कार्यक्रमास अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, श्रीपाल ललवाणी, दीपक गिरमे, अरविंद पाखले, मिलिंद देशमुख, अनिल वेल्हाळ तसेच अंनिसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.