संदेश गायकवाड -
शनिवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी पेण तालुक्यातील गवळणवाडी येथे दोन मांत्रिकांच्या सांगण्यावरून वामन दरवडा यांचे सासरे व पत्नी देवका वामन दरवडा गावातील लोकांवर जादूटोणा करून गावातील माणसं आजारी पडतात व मरतात त्यामुळे काही दिवसांपूर्वी गावातील बंदोबस्त करण्यासाठी बाहेरील जालीम मांत्रिक आणून तंत्रमंत्र करून त्याचा सर्व खर्च वामन दरोडा याने केला. सदर खर्च करूनही माणसं आजारी पडत असल्यामुळे गावातील मांत्रिकाच्या सांगण्यावरून पीडित कुटुंबाकडून बारा लाखाची मागणी केली, सदर रक्कम देणे शक्य नसल्याने पीडित कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आली. सदर मारहाणीत देवका वामन दरवडा या बेशुद्ध पडल्या तर उषा कृष्णा ठोंबरा, सुवर्णा हरिचंद्र ठोंबरा, आदित्य वामन ठोंबरा यांना जबर मारहाण झाली. सदर प्रकरण फोनच्या माध्यमातून रात्री बारा वाजता अंनिसचे कार्यकर्ते नितीन निकम आणि संदेश गायकवाड यांना कळली असता ताबडतोब पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि मांत्रिकावर १) हिरामण नागू ठोंबरा, २) काशिनाथ हिरामण ठोंबरा व मारहाण केलेल्या गुंडावर १) परशुराम हिरामण वाघ २) भानुदास हरी दरवडा यांना जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा २०१३ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा दाखल करण्यासादर्भात अॅड. संकल्प गायकवाड यांची खूप मदत झाली.
वरील सर्व प्रकरण हाताळण्यात पीआय बागुल साहेब, पीएसआय सुनील चव्हाण आणि पीएआय नवखरे साहेबांची मोलाची मदत झाली.
– संदेश गायकवाड, पेण
