लोणंदच्या गायकवाड महाराजाचा भांडाफोड

अंनिवा -

विठ्ठल किसन गायकवाड (सध्या रा. क्षेत्र पाडेगाव, लोणंद-नीरा रोड, लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) या करणी, भूतबाधा उतरवण्याचा दावा करून लुबाडणार्‍या भोंदू देवऋषीवर जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल.

याबाबत सविस्तर वृत्त असे ः गायकवाड महाराज हा गेली दोन ते अडीच वर्षेस्वतःच्या अंगात दत्त संचारला आहे, असे सांगून दर मंगळवार, शुक्रवारी व अमावस्या, पौर्णिमा या दिवशी मोठ्या प्रमाणात दरबार भरवून येणार्‍या भक्तांच्या कोणत्याही अडचणींवर – उदा. करणी काढणे, भूतबाधा काढणे, मूल न होणे, कोणतीही शारीरिक समस्या यावर 100 टक्के दैवी उपाय सांगणारा हा भोंदू मोठ्या प्रमाणात आपले बस्तान वाढवीत होता. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रशांत पोतदार यांना माहिती मिळताच त्यांनी त्याचे सहकारी डॉ. दीपक माने, अ‍ॅड. हौसेराव धुमाळ यांनी गुप्तपणे साध्या वेशात भक्त बनून थेट दरबारात जाऊन समस्यांचा पाढाच वाचला. त्यांना मोठी करणी झाली आहे, नागिणीचा त्रास आहे. 8 महिन्यांत 100 टक्के मूल होईल, असे सांगितले व 11 फेर्‍या करायला लावल्या. यावरून ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांच्या हे लक्षात आले की, तो भक्तांची आर्थिक, मानसिक फसवणूक करत आहे.

ही सर्व बाब अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांना कळवली व हा भोंदू जादूटोणाविरोधी कायद्याचा भंग करत आहे, हे निदर्शनास आणून दिले. त्यांनी याची गंभीर दखल घेऊन लोणंद पोलीस स्टेशनचे न सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांना त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी ‘अंनिस’ कार्यकर्त्यांनी लोणंद पोलिस स्टेशन गाठले. तेथील अधिकारी व त्यांची टीम घेऊन प्रत्यक्ष भोंदूबाबाचा दरबार गाठला. अमावस्या असल्याने दरबारात मोठ्या प्रमाणात भक्त आलेले होते. अंगात देवाचा संचार आणून समस्या सोडवणे सुरूच होते. पोलिसांना बघताच महाराजाला घाम फुटला. सर्व आँखो देखा पाहिल्यावर महाराजास ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली.

अशा भोंदूबाबांचे पीक सध्या सर्वत्र वाढत आहे. जनतेने अशा बाबींपासून दूर राहावे व निर्भयपणे असे प्रकार कोठे चालत असतील तर तक्रार द्यावी, असे आवाहन ‘अंनिस’ने केले आहे.

या संपूर्ण कारवाईत ‘महाराष्ट्र अंनिस’चे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, अ‍ॅड. हौसेराव धुमाळ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, लोणंद पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, उपनिरीक्षक गणेश माने, कॉन्स्टेबल प्रिया दुरगुडे, हवालदार ए. के. नलवडे, पोलीस नाईक ज्ञानेश्वर मुळीक, कॉन्स्टेबल गोविंद आंधळे यांनी प्रत्यक्ष भोंदूबाबाच्या कारवाईत सहभाग घेतला.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]