सुरेश नारायण तायडे - 8668844544
चेटूक केले, करणी केली, केली जादू निरंतर।
होते नव्हते सगळे, झाले जवळचे छू मंतर ॥धृ॥
हवेत फिरवून हात, बाबा सोनसाखळी देतो
भोळ्या-भाबड्यांना फसवून उल्लू साधून घेतो।
जाणून घे तू, खरे संत अन् भोंदू मधले अंतर
होते नव्हते सगळे, झाले जवळचे छू मंतर ॥1॥
हातात गंडेदोरे, भाळी भस्म लावुनी फिरतो
नको-नको ती भीती मग तो साधकांना भरतो।
ह्याने पोटा-पाण्याचे त्याचे काम चाले निरंतर
होते नव्हते सगळे, झाले जवळचे छू मंतर ॥2॥
प्रत्येक घटनेमागे काही कारण असते नित्य
जन्मानंतर मरण आहे समजून घे तू सत्य।
जिवंत असता सारे काही नाही मेल्यानंतर
होते नव्हते सगळे, झाले जवळचे छू मंतर ॥3॥
–सुरेश नारायण तायडे, मलकापूर
जि. बुलडाणा मो.क्र. 8668844544