‘मअंनिस’ शाखा गडचिरोलीतर्फे पूरग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत

अंनिवा -

गडचिरोली तालुक्यातील वाकडीजवळ असलेल्या कृपाळा गावात नुकत्याच येऊन गेलेल्या पुरामुळे त्या गावातील वसंत तुकाराम भोयर व रंजित बोंडकुजी बावणे यांची घरे पाण्यात बुडाल्याने क्षतिग्रस्त झाली. घरातील अन्नधान्याची पाण्यामुळे खूप मोठी हानी झाली. गावातील काही लोकांनी त्यांना चांगल्या प्रकारे साथ दिली. कृपाळा गावातील पूरग्रस्तांची माहिती वृत्तपत्रांतून मिळताच महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या बातमीची दखल घेऊन त्या दोन्ही कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी पोलीस पाटील बालाजी मेश्राम, सुषमा नरेश मेश्राम; तसेच ‘महा. अंनिस’चे जिल्हाध्यक्ष उद्धव डांगे, जिल्हा उपाध्यक्ष शब्बीर शेख, जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, जिल्हा प्रधान सचिव पुरुषोत्तम ठाकरे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव कोठारे, विज्ञानबोध वाहिनी प्रमुख प्रशांत नैताम, व्यसनमुक्ती विभाग देवानंद कामडी, अरुण भोसले, सिंधू चहांदे, सुधा चौधरी, शहर उपाध्यक्ष दामोदर ऊप्परवार, कमलाकर वारके, प्रधान सचिव सुनील नन्नावरे, सुनीता भोयर, प्रमोद राऊत, समीर शेख, अक्षय चहांदे, गावकरी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.