नरेंद्रकुमार कांबळे -
कसोटी विवेकाची वर्धा येथे दिनांक १७/८/२०२३ ते १९/८/२०२३ पर्यत मगन संग्रहालय, वर्धा येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व तालुका शाखाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. सदर प्रदर्शनी वर्ध्यात घेण्याकरीता वेळोवेळी डॉ. हमीद दाभोलकर व नागपूरचे रामभाऊ डोंगरे यांचे खूप सहकार्य लाभले म्हणून वर्ध्यात हा उपक्रम घडून आला.
दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी या प्रदर्शनीचे उद्घाटक डॉ. अभ्युदय मेघे कार्यकारी अधिकारी राधिकाबाई मेघे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी डॉ. विभा गुप्ता चेअरपर्सन मगन संग्रहालय वर्धा, व नरेंद्रकुमार कांबळे वर्धा जिल्हा अध्यक्ष मा. अंनिस हे या प्रसंगी उपस्थित होते. सदर प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ४२३ लोकांनी तीन दिवसात भेटी देऊन बघितले व शाळा, विद्यार्थीसुद्धा बघण्यास आल्या. पावसाळा असल्याने शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी कमी आले जर पाऊस नसता तर अजून जास्त लोकांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जीवन कार्यावर आधारित सदर प्रदर्शनीला भेट दिली असती, तरी पण सदर उपस्थिती योग्यच होती. सदर प्रदर्शनीकरीता मगन संग्रहालयच्या चेअरपर्सन डॉ. विभा गुप्ता यांनी कुमारप्पा भवन विनामूल्य उपलब्ध करून दिला, मात्र थोडी जागा कमी असल्यामुळे एक वॉटरप्रूफ मंडपसुद्धा टाकला होता. त्यामुळे जड साहित्य बाहेर मंडपामध्ये ठेवण्यात आले. सदर जागा शहराच्या मध्यभागी असल्यामुळे येणार्यांची संख्या वाढली. त्यामुळे डॉ. दाभोलकर यांच्या जीवन कार्यावर आधारित कसोटी विवेकाची जवळून बघता आली. या कार्यात अधिक जास्त प्रचार, प्रसार होण्याकरीता वृत्तपत्र वार्ताहरांनी वृत्तपत्रातून बातम्या प्रकाशित करून खूप सहकार्य केले. त्यांचे खूप धन्यवाद, तसेच समितीच्या जोस्त्ना वासनिक जिल्हा उपाध्यक्ष, अॅड. पूजा जाधव जिल्हा प्रधान सचिव, सुरेश रंगारी जिल्हा कार्याध्यक्ष, डॉ. रुपाली सरोदे, डॉ. प्रवीण धाकटे, डॉ. मयूर नागमोते त्याचप्रमाणे, प्रियदर्शना भेले वर्धा तालुका अध्यक्ष, शीतल बनसोड, उषाताई कांबळे, माया दडमल आणि जानराव नागमोते प्रधान सचिव सेवाग्राम शाखा, महेश दुबे प्रशिक्षण विभाग प्रमुख, सुधाकर दडमल कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे विलास नागदेवते, चंद्रप्रकाश बनसोड बुवाबाबा भांडाफोड विभागप्रमुख, राजेश वाघमारे मानसिक आरोग्य विभागप्रमुख, दशरथ गवळी संस्कृतिक विभाग, अनिल भोंगाडे, ज्योती मोखाडे, जयश्री लोहवे, तसेच पद्माकर आंबदे अध्यक्ष पुलगाव शाखा, विनोद टेंभुर्णे कार्याध्यक्ष पुलगाव शाखा राहुल खनडालकर, नीलेश डमभारे, प्रा. प्रधन्यानंद वाघमारे इत्यादींनी सहकार्य केले व सदर उपक्रम सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने यशस्वी करण्यास मदत झाली.
– नरेंद्रकुमार कांबळे, वर्धा