अजय शर्मा ‘दुर्ज्ञेय’ -
तो म्हणाला-
जा सगळ्यात खालच्या पायरीवर उभा राहा
मी गपगुमान उठलो आणि सांगितलेल्या स्थानी उभा राहिलो
तो म्हणाला-
तू सेवेकरी आहेस!
सर्वांची सेवा कर
मी गपगुमान उठलो आणि
सर्वांचे पाय चेपू लागलो
तो म्हणाला-
तू संस्कारहीन आहेस!
ही रांग तुझ्यासाठी नाहीये
मी गपगुमान उठलो आणि
त्या रांगेमधून बाहेर पडलो
तो म्हणाला-
वाचणे-लिहिणे तुझा धर्म नाही!
मी अज्ञानाच्या भट्टीत कितीक पिढ्या ढकलून दिल्या
असेच जवळपास तीन हजार ( कदाचित त्याहूनही काही अधिक )
वर्षांपर्यंत फक्त ऐकण्याच्या नंतर
एक दिवस
माझ्यातल्या मी मधून जेव्हा एक मी
उभा राहिला आणि बोलला-
ऐका!
इतके म्हणणे होते की
सृष्टी पराभूत झाली,
धर्म भ्रष्ट झाला,
देव संतापले
मठ-मंदिरं हादरली…..
आणि तेव्हा मी जाणलं
बोलणं काय करू शकतं ते!
बोलणं आम्हांला स्वतःपासून
इतरांपासून सर्वांपासून स्वतंत्र
करत असतं
बोलणं आम्हाला माणूस बनवतं…
काय तुम्हीही घाबरताय बोलण्यास?
काय तुम्ही गरज असतानाही
बोलत नाही आहात?
जर होय!
तर तुम्ही अजूनही गुलाम आहात
किंवा मग गुलाम बनण्याच्या प्रक्रियेत आहात!
मूळ हिंदी कविता – अजय शर्मा ‘दुर्ज्ञेय’
मराठी अनुवाद – भरत यादव
संपर्क – 9890140500
yadavbh515gmail.com