दत्ता गायकवाड - 9860816495
पृथ्वीभोवती सूर्य फिरतो आहे
छे, हो, सूर्याभोवती पृथ्वी फिरते
माणूस आणि धर्माचा वाद
पण यातून विचार बाद!
कोण सांगणार? धर्माच्या विरुद्ध….
विचार स्वातंत्र्य?
चूक आमचा विचार
आमच्यामुळे स्वातंत्र्य!
‘जिवंत जाळा, गोळ्या घाला.’
समाज शहाणा आहे
शहाणपणा नको!
आवरण्याची शक्ती!
संयमाची भक्ती!
राजसत्तेची उक्ती!
उदो-उदो करा….
बाप रे…! 75 वर्षांनंतर
पुन्हा तेच, पुन्हा तेच…!
आता शब्दांची मशाल पेटवू या
नाहीतर…. पुन्हा अंत होईल
माणसाचा, माणुसकीचा!
– दत्ता गायकवाड
मु.पो. इस्पुर्ली, ता. करवीर, जि. कोल्हापूर.
संपर्क : 9860816495