अंनिवा -

सोलापूर शहर शाखेतील कार्यकर्त्यांनी दोन स्त्रियांचे जटा निर्मूलन केले. एकीला 30 वर्षापासून तिला जट होती. साधारण 5 फूट लांब जट होती. जट कापल्यावर तुम्ही माझा भार हलका केला म्हणून खुप समाधान व्यक्त केले.
बीडी घरकुल हैद्राबाद रोड, मुळेगाव येथे राहणार्या तारामती महादेव कलशेट्टी वय 65, यांच्या 35 वर्षापासूनच्या 4 फूट लांबीच्या जटा कापल्या. यावेळी अंनिसच्या निशा भोसले, सरिता मोकाशी, लता ढेरे, अंजली नानल, गट्टी व व्ही. डी. गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष लता ढेरे आणि समाजसेविका मार्था आसदे उपस्थित होते.