मंदाकिनी गायकवाड -
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनास दहा वर्षे होत आहेत. त्यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त फलटण येथे ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढण्यात आली.
मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. ही बाब स्वतंत्र भारतात अत्यंत घृणास्पद आहे. या घटनेत शासनाचे वर्तन अत्यंत निषेधार्ह आहे. या महिलावरील अत्याचाराचा निषेध फेरीमध्ये करण्यात आला.
तसेच पाठ्यपुस्तक विभागाने पाठ्यपुस्तकातून डार्विनच्या सिद्धांताचा पाठ वगळला या निषेधार्थ फलटण शाखेच्या कार्यकर्त्यांनी पाठ्यपुस्तक विभागाला या निषेधार्थ पोष्ट कार्ड पाठवण्यात आले.
– मंदाकिनी गायकवाड, फलटण