‘वसा दाभोलकरांचा’ या पुस्तकाचे कॉ. भालचंद्र कांगो यांच्या हस्ते प्रकाशन!

अंनिवा -

कोल्हापुर येथील अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल चव्हाण लिखित ‘वसा दाभोलकरांचा’ या पुस्तकाचे प्रकाशन भाकपचे राष्ट्रीय नेते भालचंद्र कांगो यांच्या अध्यक्षतेखाली व “अंनिस”च्या ज्येष्ठ नेत्या प्रमोदिनी मंडपे यांच्या हस्ते दि. 16 रोजी ऑनलाइन झाले.

प्रा. डॉ. विलासराव पोवार यांनी प्रास्ताविकामध्ये चळवळीतील कार्यकर्त्यांनी लिखाण करण्याची गरज सांगितली. लेखकाच्या मनोगतात अनिल चव्हाण यांनी दाभोलकरांची खिलाडूवृत्ती, नियमितपणा, नेमके नियोजन, चिकाटी आणि साधी राहणी अशी वैशिष्ट्ये स्पष्ट केली. प्रा. प्रमोदिनी मंडपे यांनी दाभोलकरांच्या विचारांचा परिचय करून दिला आणि त्यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले.

कांगो यांनी अध्यक्षीय भाषणात चार विचारवंतांच्या खुन्यांना ताबडतोब पकडण्याची मागणी केली. दाभोलकरांनी “अंनिस”च्या कामाला समग्रतेचे भान आणून दिले, कायद्याचा पाठपुरावा केला आणि प्रबोधनाबरोबर कृतिशील होऊन समाजबदलासाठी प्रयत्न केले, हे स्पष्ट करून पुरोगाम्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सुरुवात अण्णा कडलास्कर यांनी गीतगायनाने केली. पाहुण्यांचा परिचय सतीशचंद्र कांबळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन गिरीश फोंडे यांनी केले.

यावेळी ‘वसा दाभोलकरांचा’ या पुस्तकाच्या 1300 रुपये किमतीच्या 26 प्रती भारतात कोठेही फक्त 500 रुपयांत घरपोच उपलब्ध करून देणार असल्याचे सांगून, (‘कॅश ऑन डिलिव्हरी’साठी 50 रुपये अतिरिक्त आकारले जातील.) या उपक्रमात महाराष्ट्रातील सर्व व्यक्ती, संस्था, संघटना, मंडळांनी सहभागी व्हावे, ज्यांना पुस्तके हवी असतील त्यांनी संपर्क करावा, असे आवाहन प्रकाशक ‘एआयएसएफ’चे राज्य सचिव प्रशांत आंबी यांनी केले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]