अंनिवा -
20 ऑगस्ट, 2013 रक्षाबंधनादिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला होता. त्यांना कृतिशील अभिवादन करण्यासाठी तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथील अनिता काटकर यांच्या डोक्यात अडीच वर्षांपासून असलेली जट सोडवून अभिवादन करण्यात आले.
दिनेश गोणते यांनी नंदिनी मॅडम यांच्याशी संपर्क करून बहिणीच्या डोक्यात असलेल्या जटेसंदर्भात सर्व माहिती सांगितली, बहिणीशी बोलावयास सांगितले. अनिताताईंना जट कशी तयार होते, याबाबत माहीती नंदिनी यांनी सांगितली. आतापर्यंत काढलेल्या जटांसंदर्भात सर्व अनुभव; तसेच जटेमुळे होणारा त्रास याबाबत सविस्तर माहिती दिली. अनिताताईंना सर्व पटत होते. ‘आठ दिवसांनी जट काढूया,’ असे म्हणत होत्या. तेव्हा “रक्षाबंधनादिवशी (दि. 22) तुमच्या भावाची इच्छा आहे की, माझी बहीण आजच्या दिवशी जटेसारखा अंधश्रध्देतून मुक्त व्हावी. तेव्हा आज मी लगेच येते,” असे जाधव मॅडमनी सांगितले व ‘महा. अंनिस’चे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख; तसेच दिनेश गोणते यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या उपस्थितीत नंदिनी जाधव यांनी जटनिर्मूलन केले.