भोंदू बुवांची सेवासंगत मेंढरे राखुनी, नातू होई आजीचा खुनी

डॉ. दीपक माने -

नातू – आजी नाते हे मैत्रीचे,आनंदाचे असते पण पाण्याला जसा ज्याची संगत तसा रंग येतो तसे निरागस कुमार  मनाचे भोंदूचे संगतीने हिंसक, खुनी रूपांतर होवून जीवनाचा बेरंग कसा होतो ते पाहा.

राणंद, ता. माण, जि. सातारा येथील आजी, नातू, आई असे कुटुंबीय राहत होते. दैवताची काही काळ सेवा करण्यासाठी  लोक कळपाची निगा राखण्याची कामे मामाचे गावी जाऊन राहिल्या प्रमाणे करतात. तेथेच कपट काही एक भुलवायचे लोक या संत तुकोबांचे अभंगा नुसार सावज पारखून एका भोंदूबाबाने लहान मुलांला नादी लावले व त्याचा वापर करून शोषण सुरु केले. त्याचा परिपाक असा

आजीचा खून अल्पवयीन नातवाने केला ही बातमी झळकली. भोंदूबुवाला अटक केली आणि दीड लाखापेक्षा जास्त किमतीचे दागिने, रोखड मुद्देमाल हस्तगत केले. या  प्रकरणी महाराष्ट्र  अं.नि.स. सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत (सी.आर.) बर्गे, सुधाकर बर्गे (कोरेगाव शाखा), डॉ. दीपक माने (सातारा शहर शाखा), या सत्यशोधन समिती सदस्यांनी प्रत्यक्ष भेटी, वस्तुस्थिती पाहणीसाठी दौरा करून निष्कर्ष काढून एक निवेदन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्याचे निश्चित केले.

त्यावेळी परिसरातील अनेक गावातील लोकांनी सहकार्य केले. निवेदनावर प्रमोदिनी मंडपे, वंदना माने, प्रकाश खटावकर,राजेश पुराणिक, डॉ. दीपक माने, अ‍ॅड. हौसेराव धुमाळ, विकास तोडकर, यांच्या सह्या आहेत. अधीक्षकांनी तात्काळ दूरध्वनी वरून सूचना देऊन सहकार्य केले.

या कामी अध्यक्ष बर्गे सरांनी तरुणांना लाजवेल असा उत्साह दाखवत दिवसभर सारथ्य करून सिद्ध केले की अध्यक्ष पद हे नामधारी नसून क्रियाशील असू शकते.

सदर परिसरात पोलिस अधिकारी सह प्रबोधनास संघटना सहकार्य करण्यास तयार असल्याचेही सांगितले.

– डॉ. दीपक माने, सातारा


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]