डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन

-

नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार पकडा,

धर्मांध संघटनेवर बंदी आणा आणि खटला जलद गतीने चालवा!

राज्यभर ‘निर्भय मार्निंग वॉक’, शासनास निवेदने आणि अभिवादन सभा

डॉ.नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिनी राज्यभरात ‘अंनिस’ची आंदोलने

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापककार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यामध्ये काही धर्मांध शक्तींकडून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेला 9 वर्षे पूर्ण झाली. या घटनेचा निषेध करून केंद्र सरकार व राज्य सरकारला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने निवेदने देण्यात आली. या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला विरोध करण्यासाठी, प्रतिगामी विचारांच्या संघटित मारेकर्‍यांकडून त्यांचा खून करण्यात आल्याचे आता स्पष्ट झाले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पश्चात देखील त्यांच्या निर्भीड आणि विवेकी कार्यकर्त्यांनी त्यांचे कार्य जोमाने पुढे सुरू ठेवले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंतांचे देखील खून केले गेले. या चारही खुनांतील आरोपींचा परस्परसंबंध देखील तपासातून पुढे येत आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास सध्या सीबीआय करत आहे.

या चारही खुनाबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या मनात तीव्र वेदना, खदखद आहे.

अंनिस’ने शासनाकडे प्रमुख तीन मागण्या केल्या, त्या अशा :

1) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनामागच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा.

2) या खुनामागच्या धर्मांध संघटनेवर कठोर कारवाई करण्यात यावी.

3) हा खून खटला जलद गतीने चालवून मारेकर्‍यांना कठोर शिक्षा करावी.

20 ऑगस्ट रोजी राज्यभरात ‘अंनिस’ शाखांनी केलेल्या आंदोलनाचे हे रिपोर्टिंग

संपादन आणि संकलन राहुल थोरात

शाखा : कोल्हापूर निर्भय मॉर्निंग वॉक

कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज, इचलकरंजी, जयसिंगपूर आणि कोल्हापूर शहरात तीन ठिकाणी मॉर्निंग वॉक काढण्यात आले.

कोल्हापूर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढण्यात आला. त्याची सुरुवात ‘महाराष्ट्र अंनिस’च्या राज्याध्यक्ष सरोजमाई पाटील यांनी केली. या प्रसंगी त्यांनी ‘धर्मांध सनातनी प्रवृत्तीला पराभूत करण्याचे आवाहन केले.

खुन्यांच्या एका वकिलाने ‘तुम्हीही ‘मॉर्निंग वॉक’ला जात जा,’ असा धमकीवजा सल्ला दिला. त्याला प्रत्युत्तर म्हणून दरमहा 20 तारखेस कोल्हापूर येथे ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढला जातो. रॅलीची सुरुवात बस मार्गावरून होऊन कदमवाडी -माझी शाळा – डी. वाय. पाटील हॉस्पिटल -सदर बाजार- मुख्य मार्ग आणि शाहू कॉलेज येथे समारोप झाला.

‘मॉर्निंग वॉक’साठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूरचे अध्यक्ष प्रा. डॉ. विलासराव पोवार, अनिल चव्हाण, प्राचार्य डॉ. एल. डी. कदम, प्रा. के. व्ही. गायकवाड, सीमा पाटील, छाया पोवार, वसंतराव पाटील, साधना देसाई, विजय भोगम, रघुनाथ कांबळे, दिलीप पवार, मेघा पानसरे, संजय कळके, रमेश वडणगेकर, किरण गवळी, सुरेश जत्राटकर, संजय सौंदलगे, संजय सुळगावे, अजित चव्हाण, सुनंदा चव्हाण, व्यंकापा भोसले, सतीशचंद्र कांबळे, गीता हसूरकर, संभाजी जगदाळे, चंद्रशेखर बटकडली, प्रशांत आंबी, वसंतराव पाटील, भरत लाटकर, भिकाजी यादव, अतुल दिघे, हसन देसाई आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिना’निमित्त अनिल चव्हाण यांचे शाहू कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आजची परिस्थिती’ या विषयावर सप्रयोग व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एल. डी. कदम होते. प्रमुख पाहुण्या सरोजमाई पाटील, विलासराव पोवार, छाया पोवार उपस्थित होत्या. प्रा. के. व्ही. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. बी. बी. घुरके यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. ज्योती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. एस. एम. गोजारे यांनी आभार मानले.

यावेळी कोरगावकर हायस्कूलच्यावतीने शाहू कॉलेज, कदमवाडी, भोसलेवाडी या मार्गावर ‘निर्भय रॅली’ काढण्यात आली. रॅलीमध्ये मुख्याध्यापक संजय सौंदलगे, प्रभूप्रसाद रेळेकर, अनिल चव्हाण यांच्यासह विविध शाळांचे शिक्षक सहभागी झाले होते.

येथील प्रबुद्ध हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक संजय आर्दाळकर, माणिक यादव, मालती यादव व अंनिसचे कार्यकर्ते यांनी सुतार मळा, प्रबुद्ध सोसायटी, कोल्हापूर रस्ता इत्यादी भागातून रॅली काढली.

अंनिस वार्तापत्राचे सहसंपादक अनिल चव्हाण यांचे प्रात्यक्षिकासह प्रबोधनात्मक व्याख्यान झाले. प्रमुख पाहुणे संजय सुळगावे तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय आर्दाळकर होते.

– रमेश वडणगेकर, कोल्हापूर

शाखा : जयसिंगपूर निर्भय वॉक रॅली

जयसिंगपूर शहरातील पुरोगामी विचारांच्या संघटनांनी शहीद नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन व विचारांचा जागर करण्यासाठी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ रॅली काढली होती.

रॅलीमध्ये प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. महावीर अक्कोळे व डॉ. चिदानंद आवळेकर, डॉ. अजित बिरनाळे, डॉ. अतिक पटेल, साहित्यिका नीलमताई माणगावे, कॉ. रघुनाथ देशिंगे, प्रा. शांतारामबापू कांबळे, प्र. प्राचार्य डॉ. चव्हाण, सेवादलाचे बाबासाहेब नदाफ या मान्यवरांनी आपल्या भाषणातून पुरोगामी विचारांचा जागर केला.

‘निर्भय मॉर्निंग वॉक’ रॅलीचे वैशिष्ट्य : सकाळी 6.30 वाजता रॅलीला सुरुवात – पुरोगामी चळवळीतील प्रसिद्ध डॉक्टर, प्राचार्य, साहित्यिक, प्राध्यापक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्तेउपस्थित – पंच्याहत्तरी ओलांडलेल्या संवेदनशील कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग – हातामध्ये विचारप्रवण करणारे घोषणा फलक – पद्मश्री डॉ. दाभोलकर, कलबुर्गी, गोविंदराव पानसरे यांना अभिवादन करण्यासाठी डिजिटल फलक – घोषणांच्या आवाजाने परिसर दुमदुमला- स्वतःहून नागरिकांचा रॅलीत सहभाग – ‘शाहू-फुले-आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर’ – जितेंगे लढेंगे – लढेंगे जितेंगे’ यांसारख्या घोषणा देण्यात आल्या.

या रॅलीमध्ये समाजवादी प्रबोधिनी जयसिंगपूर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल, लाल बावटा कामगार युनियन व सर्व पुरोगामी संघटनांनी सहभागी घेतला होता. विशेषकरून संवेदनशील ज्येष्ठ कार्यकर्तेमा. एफ. वाय. कुंभोजकर, रमेश माणगावे, अशोक शिरगुप्पे, प्रा. ए. एस. पाटील, हेरवाडे, प्रा. प्रकाश मेटकर, प्रा. सुनील बनसोडे, प्रा. डॉ. तुषार घाटगे, सचेतन बनसोडे, संदीप शेडबाळे, श्रीकांत कांबळे, प्रा. बाळगोंडा पाटील, प्रा. डॉ. ढबे, प्रा. कबीर कुंभार, अमित माणगावे, मा. बामणे, शुक्राचार्य ऊर्फ बंडू उरुणकर व अन्य पुरोगामी कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते.

– रघुनाथ देशिंगे, जयसिंगपूर

शाखा : गडहिंग्लज निर्भय मॉर्निंग वॉक

गडहिंग्लज येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्व परिवर्तनवादी संघटनांच्यावतीने सकाळी 6.00 वाजता ‘निर्भय मॉर्निंग वॉक’चे आयोजन केले होते. रॅलीची सुरुवात एम. आर. हायस्कूल येथून झाली. यावेळी चळवळीची विविध गाणी म्हणत, तसेच विविध घोषणा देत रॅली कडगाव रोड, वीरशैव चौक, बाजारपेठ, नेहरु चौक, महालक्ष्मी मंदिरमार्गेदसरा चौक येथे आली. ‘डॉ. दाभोलकर अमर रहे’, ‘कॉ. पानसरे अमर रहे’, ‘डॉ. कलबुर्गी अमर रहे’, ‘गौरी लंकेश अमर रहे’, ‘वरील विचारवंतांच्या खुन्यांना फाशी झालीच पाहिजे,’ अशा घोषणा देत ‘हे असे आहे; पण हे असे असणार नाही’, ‘तोड, मर्दा तोड चाकोरी’, अशी चळवळीची विविध गाणी बाळासाहेब मुल्ला यांनी म्हटली. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर व इतर विचारवंतांच्या खुनाला 8-9 वर्षेहोऊन देखील त्यांचे सूत्रधार अजून शासनाला व तपास यंत्रणांना सापडले नाहीत. तसेच त्यांच्या मारेकर्‍यांना अजूनही शिक्षा झालेली नाही. डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर जादूटोणाविरोधी कायदा झाला; परंतु त्याचे नियम अजूनही तयार केले नाहीत. याबद्दल शासनाचा धिक्कार करण्याबद्दलचे मत प्रा. अशपाक मकानदार यांनी व्यक्त केले. कार्याध्यक्ष प्रा. सुभाष कोरे यांनी आभार मानले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. शिवाजी होडगे, प्रा. आर. बी. कांबळे, प्रा. आप्पासाहेब कमलाकर, प्राचार्य सात्ताप्पा कांबळे, अशोकराव मोहिते, सौ. उज्वला दळवी, सरोजिनी कदम, वसुंधरा सावंत, रमजान अत्तार, बाळेश नाईक, महादेव बारामती, प्रा. डी. जी. चिघळीकर, इंजि. श्रीरंग राजाराम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

– प्रा. सुभाष कोरे, गडहिंग्लज

शाखा : इचलकरंजी निर्भय मॉर्निंग वॉक

डॉ. दाभोलकरांच्या स्मृतींना आणि कार्याला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इचलकरंजी शाखेच्या वतीने ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ केला.

शहरातील छत्रपती शिवाजी पुतळा ते जनता चौक ते प्रांत कार्यालय चौक ते पुन्हा छत्रपती शिवाजी पुतळा असा ‘मॉर्निंग वॉक’चा मार्ग होता. बजरंग लोणारी, सुनील स्वामी, युसूफ तासगावे, रोहित दळवी आदी कार्यकर्त्यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या. यावेळी ‘महा. अंनिस’सह शहरातील विविध परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते, सक्रिय कार्यकर्ते, तसेच अन्य नागरिक उपस्थित होते.

– विभा नकाते, इचलकरंजी

शाखा : सांगली वैज्ञानिक दृष्टिकोन दिन

गाथा उत्क्रांतीची’ फिल्मचे सादरीकरण

20 ऑगस्ट हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून साजरा होतो. यानिमित्त सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘विश्वाची व जीवांची उत्क्रांती’ या विषयावरील ‘गाथा उत्क्रांतीची’ या सुंदर अ‍ॅनिमेशन फिल्मचे आयोजन यशवंतनगर हायस्कूल, (कुपवाड) सांगली येथील विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले.

महास्फोटातून विश्व, तारे, सूर्य व पृथ्वीची निर्मिती कशी झाली, इथपासून ते पृथ्वीवर जीवसृष्टीचा विकास कसा झाला, याचे सुंदर ध्वनिचित्रण या फिल्मद्वारे सादर केले गेले. एकपेशीय जीवापासून ते उत्क्रांत होत मानव सृष्टीत कधी आला आणि तो सृष्टीचा स्वामी कसा बनला, याची माहिती विद्यार्थी अवाक् होऊन पाहत होते.

यावेळी प्रा. प. रा. आर्डे म्हणाले, “सृष्टीतील घटनांमागे दैवी कारण नसून, नैसर्गिक कार्यकारणभाव आहे व तो बुद्धीने समजावून घेता येतो, हा विज्ञानाचा विचार फिल्मद्वारे मुलांपर्यंत पोचविता आला.” या फिल्मच्या संहितेच्या लेखिका प्रसिद्ध कवयित्री नीलिमा माणगावे यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी देवकल्पनेबद्दल छान कथा यावेळी सादर केली.

या कार्यक्रमाचे संयोजन सांगली अंनिसचे प्रा. प. रा. आर्डे व अमित ठकार यांनी केले. फिल्मनंतर आर्डे सरांनी उत्क्रांतीवादावर विविध प्रश्न उपस्थित करून मुलांच्या चौकसबुद्धीला प्रेरणा दिली.

याप्रसंगी ‘अंनिस’चे डॉ. संजय निटवे, आशा धनाले, त्रिशला शहा व रमेश माणगावे यांची उपस्थिती होती. यशवंतनगर हायस्कूलचे मुख्याध्यापक अरविंद कदम व त्यांच्या सहकार्‍यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची मदत केली.

त्रिशला शहा, सांगली

शाखा : इस्लामपूर निर्भय मॉर्निंग वॉक

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा इस्लामपूरच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी, 20 ऑगस्टला सकाळी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’चे आयोजन करण्यात आले. शहरातील विविध संघटना व मान्यवर यामध्ये सहभागी झाले.

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून वॉकची सुरुवात झाली. यल्लामा चौक -गांधी चौक- पोस्ट ऑफिस आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन सांगता झाली.

यावेळी प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी मनोगतात, विचारांची लढाई विचारानेच लढायची असते. मात्र डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांचा खून केला. मात्र त्यांचे विचार संपविता आले नाहीत, हे सिद्ध झाले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. या ‘निर्भय मॉर्निंग वॉक’मध्ये बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील (काका), कॉ. धनाजी गुरव, उमेश कुरळपकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा इस्लामपूरचे कार्याध्यक्ष डॉ. एस. के. माने, अध्यक्षा डॉ. नीलम शहा, दीपक कोठावळे, प्रा. सी. जे. भारसाकळे, प्रा. एकनाथ पाटील, विजय तिबिले, प्रा. संतोष खडसे, डॉ. अमित सूर्यवंशी, प्रा. एस. आर. नांगरे व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते. संयोजन प्रा. पी. एच. पाटील, शशिकांत बामणे यांनी केले. डॉ. एस. के. माने यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजेश दांडगे यांनी आभार मानले. दुपारी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते सुनील स्वामी यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

– प्रा. डॉ. संतोष खडसे, इस्लामपूर

शाखा : तासगावनिर्भय मॉर्निंग वॉक

‘अंनिस’ तासगाव शाखेच्या वतीने शहरात ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढण्यात आला.

‘अंनिस’ कार्यकर्त्यांसमोर बोलताना प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांनी डॉ. दाभोलकर, कामगार नेते गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या खुनामागच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा, धर्मांध संघटनेवर कारवाई करण्यात यावी आणि खून खटला जलद गतीने चालवून मारेकर्‍यांना कठोर शिक्षा व्हावी, ही मागणी केली.

“डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार आजही प्रेरक ठरतात. सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील घटना हेे उदाहरण आहे. उच्च शिक्षण आणि स्वत: डॉक्टर असणारे कुटुंब मांत्रिकाच्या नादाने उद्ध्वस्त झाले. वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसाराचे काम करत राहणे, हीच खरी आजच्या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली ठरेल,” असे मत अमर खोत यांनी मांडले. “दाभोलकर खून खटला जलद गती न्यायालयात व्हायला हवा,” असे मत बाबूराव जाधव यांनी मांडले. “अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम वाढण्यासाठी अन्य समविचारी मंडळींनी पाठबळ द्यायला हवे,” अशी सूचना अर्जुन थोरात यांनी मांडली. “संख्येने कमी असले तरी विचार घेऊन काम करणारा कार्यकर्ता मोठा असतो,” ही शहाजी भोसले यांनी भूमिका मांडली. समीर कोळी यांनी स्वागत केले. प्रा. वासुदेव गुरव यांनी आभार मानले. स्वामी रामानंद भारती विद्यालय येथे सुजाता म्हेत्रे यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन दिनानिमित्त व्याख्यान दिले.

अमर खोत, तासगाव

शाखा : सातारा स्मृतिजागर

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला 9 वर्षे पूर्ण झाली. त्याच्या पूर्वसंध्येला सातारा येथील पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सातारा जिल्हा ‘अंनिस’सह सर्व पुरोगामी संघटना, परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था व परिवर्तनवादी समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशाचे प्रतीक असणारी मेणबत्ती पेटवून ‘विवेकाचा आवाज बुलंद’ करण्याचा निश्चय करण्यात आला. सर्वांनी काळी फीत बांधून खुनाचा तपास मुळापर्यंत अजून का केला जात नाही, याचा निषेध केला. ‘लढेगे जितेंगे’, ‘आम्ही सारे दाभोलकर’ या घोषणांनी परिसर दुमदुमला. उदय चव्हाण, प्रशांत पोतदार, डॉ. दीपक माने, अ‍ॅड. हौसेराव धुमाळ, वंदना माने, प्रकाश खटावकर, विजय पवार, कॉ. विजय मांडके आदी ‘विवेक साथी’ कार्यक्रमास उपस्थित होते.

सातारा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा केला. डॉ. दीपक माने आणि वंदना माने यांनी मुलांसमोर चमत्काराच्या प्रयोगाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमास प्रकाश खटावकर, अ‍ॅड. हौसेराव धुमाळ उपस्थित होते.

डॉ. दीपक माने, सातारा

शाखा : पुणे वैज्ञानिक दृष्टिकोन दिन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन हा ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून संपूर्ण देशातील विविध विवेकवादी संघटना साजरा करत असतात. या दिवसाच्या निमित्ताने न्यू इंग्लिश स्कूल, फुरसुंगी येथे चमत्कार प्रात्यक्षिकांसह वैज्ञानिक दृष्टिकोन सांगायची संधी मिळाली. उत्साही मुला-मुलींसोबत कार्यक्रम छान रंगला. यासाठी शाळेतील विज्ञानशिक्षिका मनीषा गायकवाड आणि विज्ञान विभागाचे प्रमुख राजेंद्र ढवळे, प्राचार्य बाजारे कार्यक्रमास पूर्ण वेळ उपस्थित राहून सहभाग घेतला. अंधश्रध्दा निर्मूलन समिती हाताळत असलेले सर्व विषय भविष्यात आपल्या शाळेत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. दाभोलकर यांना आजच्या दिवशी कृतीतून अभिवादन करता आले, याचे समाधान आहे.

डॉ. नितीन अण्णा, पुणे

शाखा : सोलापूर शासनास निवेदन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन 9 वर्षेझाली. त्यांच्या खुनामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन मारेकर्‍यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, असे निवेदन ‘अंनिस’ सोलापूर शहर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले. तहसीलदार दत्तात्रय मोहोळे यांनी निवेदन स्वीकारले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला प्रतिगामी विचारांच्या लोकांनी विरोध केला. मारेकर्‍यांकडून त्यांचा खून करण्यात आला, याची चौकशी जलद गतीने करून मारेकर्‍यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी विनंती महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने केंद्र व राज्य सरकारकडे करत आहोत, असे निवेदनात नमूद करण्यात आलेे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिवर्षाचे निमित्त साधून शहर शाखेचे कार्याध्यक्ष व्ही. डी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, राज्य सचिव केदारीनाथ सुरवसे, श्रीपाद लोखंडे उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र लोखंडे, सोलापूर

शाखा : मंगळवेढा रक्तदान शिबीर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मंगळवेढा, एम. डी. स्पोर्ट्स, निंबोणी व विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, निंबोणी -मंगळवेढा व ग्रामस्थ निंबोणी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त औचित्य साधून निंबोणी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यांत 73 जणांनी सहभाग नोंदवला.

“डॉ. दाभोलकरांनी त्यांच्यासारखेच असंख्य कार्यकर्तेघडविले आहेत. कार्यकर्त्यांची ही नवी पिढी चळवळ जोमाने पुढे नेत आहे,”असे मत ‘अंनिस’चे कार्यकर्तेविनायक माळी यांनी मांडले. कार्यक्रमात डॉ. दाभोलकरांचा विचार पुढे नेण्याचा संकल्प ‘अंनिस’ कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी एम. डी. स्पोर्ट्स निंबोणी, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनियनचे मंगळवेढा- निंबोणी येथील सर्व पदाधिकारी सभासद, ‘अंनिस’ कार्यकर्तेव निंबोणी गावातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या. रेवनील ब्लड सेंटर, सांगोला यांनी मोलाचे सहकार्य केले.

विनायक माळी, मंगळवेढा

शाखा : बार्शी तहसीलदारांना निवेदन

‘अंनिस’ शाखा बार्शीच्या वतीने दाभोलकर खून तपासाबाबत बार्शी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यानंतर दुपारी 4 वाजता जिजामाता विद्यामंदिर येथे अभिवादन सभा आयोजित केली होती. या वेळी प्रा. तानाजी ठोंबरे, सुरेश जगदाळे, अतुल नलगे, प्रा. हेमंत शिंदे, डॉ. अशोक कदम, प्राचार्य चंद्रकांत मोरे, अनिरुद्ध नकाते, उन्मेष पोतदार, सौ. पोतदार, अशोक वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेमंत शिंदे, बार्शी

शाखा : मुंबई अभिवादन सभा

शनिवार, 20 ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त ‘महाराष्ट्र अंनिस’ आणि केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जगधने सरांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी साहित्यिक नीरजा यांनी ‘स्त्रिया आणि समाजपरिवर्तन’ या विषयावर मते मांडताना संस्कृतीची अतिशय व्यापक व्याख्या श्रोत्यांना समजावून सांगितली. त्यांचे व्याख्यान अतिशय अभ्यासपूर्ण; पण सोप्या शैलीत झाले. श्रोत्यांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. समाज परिवर्तनाचा संदेश शाळाशाळांतून आणि महाविद्यालयांमधून पोचवायला हवा, असा आग्रह नीरजाताईंनी आपल्या व्याख्यानातून मांडला. केशव गोरे ट्रस्टच्या मृणाल गोरे दालनात हा कार्यक्रम झाल्यामुळे त्याला एक वेगळेच सामाजिक परिप्रेक्ष्य लाभले. ज्योती मालंडकर यांनी सूत्रसंचालन केले. ट्रस्टचे विश्वस्त भूषण ठाकूर यांनी समारोप केला. पुरोगामी चळवळींनी एकत्रितपणे काम करण्याची आज गरज आहे, याची त्यांनी जाणीव करून दिली व यापुढेही केशव गोरे ट्रस्ट आपल्या सोबत असेल, असे आश्वासन दिले. चळवळीची स्फूर्तिदायक गीते अंकिता, कृपेश आणि चमूने जोशपूर्णरित्या सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

प्रभा पुरोहित, गोरेगाव, मुंबई

शाखा : बेलापूर, नेरुळनिर्भय मॉर्निंग वॉक

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 20 ऑगस्टला नऊ वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्ताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नवी मुंबईच्या बेलापूर व नेरूळ शाखेतर्फे ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ चे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी सात वाजता नेरूळ येथील जुवेल गार्डन येथून वॉकची सुरुवात झाली आणि तिथून सिवूड स्टेशन मार्गे पुन्हा जुवेल गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ आली आणि तिथे या वॉकची सांगता झाली.

त्यानंतर जुवेल गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी बेलापूर शाखेच्या रेखाताई देशपांडे यांनी अभिवादन करून ‘तुम्हा, डॉक्टर दाभोलकर’ हे अभिवादन करणारं गाणं घेतलं. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक व राज्य कार्यकारी समितीचे सदस्य राजीव देशपांडे, ‘महाराष्ट्र अंनिस’ बेलापूर शाखेचे अध्यक्ष भास्कर पवार, नेरुळ शाखेचे अध्यक्ष रमेश साळुंखे यांनी आपले विचार मांडले. या प्रभात फेरीत त्रिशीला कांबळे, रेखा देशपांडे, विजय खरात, मनीषा पारले, साळुंखे मॅडम, बालाजी शिंदे, डॉ. जाधव, गिरीष बागूल, प्रभाकर सोनवणे, डॉ. रमेश रेणके आदी कार्यकर्तेसहभागी झाले होते. यावेळी नागरिकांना पत्रके वाटण्यात आली. ‘डॉक्टर दाभोलकर अमर रहे’च्या घोषणा देत ‘निर्भय वॉक’चा समारोप करण्यात आला.

विजय खरात, बेलापूर, नवी मुंबई

शाखा : ठाणे निदर्शने

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाणे शाखा ‘मअंनिस’तर्फे ठाणे स्टेशनजवळ संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या साक्षीने कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. हा कार्यक्रम समविचारी संघटनांचे कार्यकर्ते, सेवादलाचे कार्यकर्ते विशाल जाधव आणि सहकारी दिनेश टेंबे, अक्षय कोनकर; तसेच जगदीशभाई खैरालिया यांनी डॉ. दाभोलकरांच्या हत्येचे गूढ उलगडण्यात जगद्विख्यात महाराष्ट्र पोलिस दलाला का यश येऊ नये, अशी चिंता आणि समाजाची नाराजी व्यक्त केली.

कार्यक्रमास ‘मअंनिस’ ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक वानखेडे, ठाणे शहराध्यक्ष वंदना शिंदे, कार्याध्यक्ष अक्षिता पाटील, सक्रिय सदस्य अभिज्ञ गंगावणे, सीताराम गंगावणे, अजित डफळे, पुष्पा तापोळे, अशोक चव्हाण, सुरेश गोळे, रोहित परदेसी, निशांत बंगेरा या सदस्यांनी साखळी पद्धतीने संघटनेच्या घोषणा दिल्या. अजय भोसले यांनी ध्वनिक्षेपक व्यवस्थेसाठी सहकार्य केले.

अँब्रोस चेट्टियार, ठाणे

शाखा : गाळेगाव वैज्ञानिक दृष्टिकोन दिन

20 ऑगस्ट हा शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा 9 वा स्मृतिदिन ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून मोहने गाळेगाव शाखेत झाला. त्या निमित्ताने ‘निर्भय मॉर्निंग वॉक’चे आयोजन केले होते. अनेक साथींनी सहभाग घेतला. विद्रोही शाहीर आकाश पवार यांच्या गीतांनी नवचेतना निर्माण केली. यावेळी ‘अंनिवा’चे वर्गणीदार करण्यात आले व काही नवीन सभासदही करण्यात आले. शेवटी सिध्दार्थ प्राथमिक, माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान दिले व चळवळीच्या गीतांनी कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी डी. जे. वाघमारे, एन. बी. रणदिवे, जे. एस. शिंदे, अश्विनी माने, राजेश मोरे, गौतम मोरे, मधुकर कांबळे, मधुकर पवार, आनंद सोनवणे, पत्रकार संदीप शेंडगे, सुनीता चंदनशिवे, शोभाताई शिंदे, प्रभू पगारे, सुनीता विश्वे, शिरसाठ बाबा, अविंदा वाघमारे, पत्रकार अमोल सावंत, सरवदे सर, अमिता कांबळे, यशस वाघमारे व अन्य साथी उपस्थित होते.

डी. जे. वाघमारे, मोहने

शाखा : तलासरी अभिवादन रॅली

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त तलासरी तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समिती व कॉ. गोदावरी परुळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले. डॉ. दाभोलकरांचे मारेकरी लवकर पकडण्यात यावेत, या संदर्भातील निवेदन तहसीलदार, तहसील कार्यालय तलासरी यांना देण्यात आले.

महाविद्यालयाचे प्रा. निलेश साळवे यांनी शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा थोडक्यात परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी महाविद्यालय आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठवणींना उजाळा करून दिला.

तलासरी तहसील कचेरीमध्ये जाऊन सदर तपास निःपक्ष आणि गतीने करण्याबाबत लेखी निवेदन दिले. यावेळी प्रा. महेश माळवदकर, प्रा. रितेश रायचना, प्रा.बाळु लव्हारे यांचेसह 200 विद्यार्थी उपस्थित होते.

प्रा. निलेश साळवे, तलासरी

शाखा : वसई निर्भय वॉक रॅली

शनिवारीस 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 ते 8 दरम्यान वसई स्टेशन (प.) ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अंबाडी रोडपर्यंत शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमित्त ‘निर्भय वॉक’ची रॅली काढण्यात आली. वसईतील विविध संघटना यात सहभागी झाल्या होत्या. विविध वक्त्यांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागील मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा, हत्येमागील धर्मांध संघटनेवर कठोर कारवाई करावी, हा खटला जलद गतीने चालवून मारेकर्‍यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच याबाबत ‘अंनिस’ वसई शाखेकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

संदेश घोलप, वसई

शाखा : अंबरनाथ वैज्ञानिक दृष्टिकोन दिन

20 ऑगस्ट 2022 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतिदिन व ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिना’चे औचित्य साधून अंबरनाथ येथील गोखले रहाळकर विद्यालयात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ याविषयीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अंबरनाथ शाखेमार्फत आयोजित झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. श्यामकांत जाधव, किरण जाधव आणि बबन सोनवणे उपस्थित होते. शाळेतील सुमारे 200 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

बबन सोनावणे, अंबरनाथ

शाखा : रोहा शासनास निवेदन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रायगड जिल्ह्याच्या वतीने सरकारला निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर, जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर, जिल्हा प्रधान सचिव संदेश गायकवाड, रोहा शाखेचे प्रधान सचिव दिनेश शिर्के, प्रमोद खांडेकर, सौरभ चव्हाण, कुमार देशपांडे, अनिकेत पाडसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिना’निमित्त मेहेंदळे हायस्कूल, रोहा येथे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चमत्कारामागील विज्ञान हा कार्यक्रम मोहन भोईर आणि संदेश गायकवाड यांनी सादर केला. यावेळी जिल्हाध्यक्ष विवेक सुभेकर, रोहा शाखेचे प्रधान सचिव दिनेश शिर्के, प्रमोद खांडेकर, सौरभ चव्हाण, अनिकेत पाडसे व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

संदेश गायकवाड, पेण.

शाखा : चाळीसगाववैज्ञानिक दृष्टिकोन दिन

जिभाऊसो पांडुरंग शामराव पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे नरेंद्र दाभोलकर यांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमित्ताने विद्यालयात सागर नागणे सर यांनी ‘अंधश्रद्धा व बुवाबाजी त्यावरील कायदे’ याविषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य बी. पी. पाटील सर होते. तसेच शाळेतील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक पी. व्ही. शिंपी, श्रीमती एम. के. पाटील, श्री. एस. आर. पाटील व आर. पी. पारवे आणि मंजू भोई विज्ञान शिक्षक उपस्थित होते. भदाणे डी.पी. यांनी सूत्रसंचालन केले.

सागर नागणे, चाळीसगाव

शाखा : परभणी निर्भय मॉर्निंग वॉक

परभणी जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते राजगोपालचारी उद्यानापर्यंत ‘मॉर्निंग वॉक’ करण्यात आला.

याप्रसंगी विविध क्षेत्रांतील उपस्थित पुरोगामी विचारवंतांनी मनोगत व्यक्त करताना डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी ‘अंनिस’चे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. परमेश्वर साळवे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद कोरे, जिल्हा सचिव डॉ. सारिका सावंत, एन. आय. काळे, डॉ. मानवतकर, सुनीता साळवे, पांडुरंग धुतराज, घनशाम साळवे, उद्धव समिंद्रे, अमोल लांडगे, डॉ. संघमित्रा साळवे, लता साळवे, डॉ. सारिका सावंत, प्रा. रफिक शेख, इंजि. गजानन वैरागड, देविदास खरात, डॉ. अगस्ति इंगोले, प्रा. प्रल्हाद मोरे, मदन आहेर, प्रशांत वाटुरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

मुंजाजी कांबळे, परभणी

शाखा : अंबाजोगाई निर्भय मॉर्निंग वॉक

नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी अंबाजोगाई ‘अंनिस’ शाखेतर्फे शहरात ‘निर्भय मॉर्निंग वॉक’चे आयोजन करण्यात आले. सकाळी 6 ते 7 या वेळेत डॉ. आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा वॉक पार पडला. यामध्ये योगेश्वरी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. चव्हाण, डॉ. डी. एच. थोरात, कॉ. अजय बुरांडे, अ‍ॅड. जगतकर, मुख्याध्यापक देशमुख सर, हरदास सर, प्रदीप चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्तेसहभागी झाले होते. या ‘निर्भय वॉक’चे संयोजन शाखेचे कार्याध्यक्ष गणेश कदम, सचिव कृष्ण आघाव, सहसचिव संतराम कराड, राज्य कार्यकारिणी सदस्य नीळकंठ जिरगे, डॉ. अनंत चव्हाण, हेमंत धानोरकर, प्रमोद चरखा, चंद्रकला देशमुख, प्रदीप गिरवलकर आदींनी केले. या रॅलीमध्ये 50 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला. ‘हम होंगे कामयाब!’ या गीताने रॅलीची सांगता झाली.

संतराम कराड, अंबाजोगाई.

शाखा : नांदेड जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

‘महाराष्ट्र अंनिस’ जिल्हा नांदेड व नांदेड जिल्ह्यातील ‘अंनिस’च्या विविध शाखांच्या वतीने, तसेच विविध समविचारी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत केंद्र व राज्य सरकारकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ‘अंनिस’ नांदेड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देताना इंजि. सम्राट हटकर, कॉ. अ‍ॅड. प्रदीप नागापूरकर, कॉ. गंगाधर गायकवाड, इंजि. विजया मुखेडकर, इंजि. विश्वंभर भोसीकर, इंजि. शंकर खरात, उषा गैनकवाड, भगवान चंद्रे, अमरदीप गोधने, कॉ. शिवाजी फुलवले, नितीन ऐंगडे आदी उपस्थित होते.

सम्राट हटकर, नांदेड

शाखा : नायगाव शासनास निवेदन

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकर्‍याचा शोध घेऊन जलद गती न्यायालयात खटला दाखल करून मारेकर्‍यास कठोर शिक्षा देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन नायब तहसीलदार श्री. ल़ोढे यांंना महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, नायगाव शाखेतर्फे देण्यात आले. निवेदन देताना कार्याध्यक्ष प्रा. शंकर गड्डमवार, अध्यक्ष माजी प्राचार्य श्री. ह. सं. खंडगावकर. प्रधान सचिव भाऊराव मोरे, सदस्य सूरज अंजणीकर, गायकवाड, झुंजारे व इतर उपस्थित होते.

प्रा. शंकर गड्डमवार, नायगाव

शाखा : भोकर तहसीलदारांना निवेदन

‘अंनिस’ भोकर शाखेच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाबाबत भोकर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भोकर तालुकाध्यक्ष एल. ए. हिरे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बी. आर. पांचाळ, ‘अंनिस’चे सचिव दिलीप पोतरे, कार्याध्यक्ष शिवाजी गायकवाड, म. राष्ट्रीय काँग्रेस परिवार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय कोळी, पत्रकार शंकर कदम, सतीश भवरे आदींच्या सह्या आहेत.

एल. . हिरे, भोकर

शाखा हदगाव : तहसिलदारांना निवेदन

हदगाव जिल्हा नांदेड अंनिसच्या वतीने मा. तहसीलदार यांना निवेदन दिले. या निवेदनावर अंनिस कार्यकर्ते प्रा. डॉ. तुकाराम बोकारे, प्रदीप देशमुख, शिवशंकर शिंदे, राजू कदम, चेतन देशमुख, प्रा. डॉ. नितीन अनमुले, शिवाजी वानखेडे, प्रल्हाद सूर्यवंशी, पांडुरंग कदम, उत्तमराव वाघमारे, गंगाबाई वाघमारे, गजानन कदम यांच्या सह्या आहेत.

तुकाराम बोकारे, हदगाव

शाखा किनवट : शासनास निवेदन

किनवट जिल्हा नांदेड अंनिसच्या वतीने मा. तहसीलदार किनवट यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर अ‍ॅड. मिलिंद सर्पे, टेकसिंग चव्हाण, श्रीकृष्ण राठोड, अजय राऊत, गजानन पाटील, पुरुषोत्तम वार यांच्या सह्या आहेत.

अ‍ॅड. मिलिंद सर्पे, किनवट

शाखा बिलोली : तहसिलदारांना निवेदन

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून तपासाबाबत बिलोली तहसिदारांना अंनिस बिलोलीच्या वतीने निवेदन दिले गेले. या निवदेनावर कमलाकर जमदडे, मोहन जाधव, गौतम भालेराव, बालाजी नागनाथ व नलगोंडे यांच्या सह्या आहेत.

कमलाकर जमदडे, बिलोली

शाखा : उमरगा पोलिसांना निवेदन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, उमरगा शाखेच्या वतीने उमरगा उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांमार्फत जिल्हाधिकार्‍यांना, केंद्र व राज्य सरकारला निवेदन दिले गेले. या वेळी ‘अंनिस’च्या शिष्टमंडळाने शासनाकडे प्रमुख तीन मागण्या केल्या. त्या अशा – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनामागच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घ्यावा. या खुनामागच्या धर्मांध संघटनेवर कठोर कारवाई करण्यात यावी. हा खून खटला जलद गतीने चालवून मारेकर्‍यांना कठोर शिक्षा करावी. याबाबतचे निवेदन उमरगा उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी स्वीकारले.

यावेळी निवेदन देताना ‘मअंनिस’चे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. किरण सगर, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, महिला आघाडीच्या प्रमुख प्रा. अवंती सगर, मुरूम शाखेचे कार्यकर्ते प्रा. गोपाळ कुलकर्णी, महाराष्ट्र पत्रकार संघाचे पदाधिकारी अजिंक्य कांबळे, योगेश पांचाळ आदी उपस्थित होते.

प्रा. किरण सगर, उमरगा

शाखा : जालना अभिवादन सभा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा जालना यांच्या वतीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-कार्याध्यक्ष यांच्या खुनाला 9 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचे मारेकरी पकडले आहेत. परंतु मुख्य सूत्रधार अजूनही पडद्याआड आहेत. त्यांना पकडून कठोर कारवाई करण्यात यावी, त्याचप्रमाणे त्यांच्या खुनाशी संबंधित धर्मांध संघटनेवर बंदी घालण्यात यावी आणि खटला जलद गतीने चालवावा, अशी मागणी अभिवादन सभेत करण्यात आली.

अभिवादन सभेसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर गिराम, जिल्हा प्रधान सचिव मधुकर गायकवाड, मनोहर सरोदे, नारायण माहोरे, अनिता पांढरे, प्रशांत वाघ, संजय हेरकर, अनुराधाताई हेरकर, संतोष मोरे, मायाताई गायकवाड, स्मितेश गायकवाड आदी उपस्थित होते.

– ज्ञानेश्वर गिराम, जालना

शाखा : अहमदपूर अभिवादन सभा

‘अंनिस’ अहमदपूर शाखेच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिसभा आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी ‘अंनिस’ शाखाध्यक्ष डॉ. धीरज देशमुख होते. प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव होते.

या सभेत बोलताना प्रा गोविंद शेळके म्हणाले की, घरचा सर्व प्रपंच, वैद्यकीय व्यवसाय सोडून समाजाचं भलं करण्यासाठी डॉ. दाभोलकर यांच्यासारखा माणूस घराबाहेर पडतो आणि कोणत्याही धमक्यांना न घाबरता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून गावागावांमध्ये चळवळ उभी करतात, हे प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमाच्या वेळी प्रा. रत्नाकर नळेगावकर, मेघराज गायकवाड, अशोक चपटे, डॉ. सतीश ससाणे, सत्यभाऊ काळे, ज्ञानोबा भोसले, सतीश पाटील, शेषेराव ससाणे, वाजिद शेख, मोहम्मद नाझीम, अंतेश्वर धुमाळ, अजहर बागवान, जावेद बागवान, वीरेंद्रभाई पवार, अभिजित माने उपस्थित होते. राम तत्तापुरे यांनी प्रास्ताविक केले. चंद्रशेखर भालेराव यांनी आभार मानले.

मेघराज गायकवाड, अहमदपूर

शाखा लातूर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणाबाबत ‘अंनिस’ लातूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले गेले. यावेळी ‘अंनिस’ कार्यकर्ते रमेश माने, शिवाजीराव सूर्यवंशी, प्रकाश घादगिने, वसंतराव टेंकाळे, जिर्‍हे उपस्थित होते.

– प्रकाश घादगिने, लातूर

शाखा : नागपूर निर्भय मार्निंग वॉक

“या देशाची व्यवस्था भयानक आहे व भयानक घडत आहे. संविधानाचा जागर करीत असताना माणुसकीची जी उमेद आहे, ती जिवंत ठेवण्याचे कार्य विवेकी विचारधारा करते. जातीयवादी, धर्मांध प्रवृत्तीला दिले जाणारे उत्तर ही संवैधानिक भूमिकाच आहे,” असे परखड विचार प्रा. जावेद पाशा यांनी व्यक्त केले. ते शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘निर्भय मार्निंग वॉक’ या अभिवादन सभेला संबोधित करत होते.

‘महा.अंनिस’ उत्तर नागपूर शाखा व नागपूर जिल्हा कार्यकारिणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘निर्भय मॉर्निंग वॉक’चे आयोजन करण्यात आले होते. ‘वॉक’ला सुगत तथागत चौकातून आरंभ होऊन पाटणकर चौक मार्गेपरत सुगतनगर पोलिस चौकी जवळ येऊन सभेत रुपांतरित झाले.

रामभाऊ डोंगरे, डॉ. रमेश भिया राठोड, राम काळे, प्रा. पुष्पा घोडके, देवानंद बडगे, महेंद्र पासवान शास्त्री, बुद्धगया यांनी अभिवादन सभेला संबोधित करून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या मुख्य सूत्रधाराला शासनाने त्वरित अटक करावी, अशी मागणी केली.

कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमात आनंद मामा मेश्राम, चंद्रशेखर मेश्राम, अ‍ॅड. मनोहर गजभिये, नरेश महाजन, विभूतीचंद्र गजभिये, गेडामकर साहेब, देवयानी भगत, सुषमा शेवडे, अरविंद तायडे, वर्षा शहारे, विवेक निमगडे, रमेश ढवळे, अजय रहाटे, चरणदास गजभिये, कमलेश हुमने, दीपक गजभिये, शिला डोंगरे, चंदा मोटघरे, रंजना ठवरे, धनराज चौधरी, अरुण भगत, आकाश नंदेश्वर, दीप्ती नाईक, नेहा आटे, कविता रामटेके, शीला ढोणे, पुष्पा मानकर, गिरिजा तांबे, जयराज टेंभुर्णे, कुंदन मेश्राम, उषा भिवगडे, कांताप्रसाद रामटेके, साखरेजी, रमेश रामटेके, हरिष वासनिक, नारायण भावे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

चित्तरंजन चौरे, नागपूर

शाखा : यवतमाळ जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणातील सूत्रधारांना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी यवतमाळ जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन देताना ‘अंनिस’ कार्यकर्ते प्रकाश डब्बावार, लिलाधर मेश्राम, दिलीप बोरगमवार, आकाश चमेडीया, निरंजन मेश्राम, विरेंद्र कांबळे उपस्थित होते.

यानंतर आंबेडकर स्मारक यवमाळ येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी अंनिस उपाध्यक्ष अरविंद बोरकर, जयभीम जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य उपस्थित होते. दुपारी यवतमाळ बस स्टँडवर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सभासद नोंदणी अभियान राबविण्यात आले.

प्रकाश डब्बावार, यवतमाळ

शाखा : भद्रावती स्मृतिजागर

‘मअंनिस’च्या भद्रावती शाखेतर्फे विजासन बुद्धलेणी टेकडी या ठिकाणी डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती अभिवादन सभा घेण्यात आली. विवेकानंद महाविद्यालयातील प्रा. अमोल ठाकरे यांनी ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’ या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास अशोक जवादे, लताताई टिपले, शारदा खोब्रागडे, नामदेवराव रामटेके, रवी वानखेडे, चंद्रकला गेडाम, विवेक महाकरकार, अनिताबाई भजभुजे, रमेश गेडाम, सूरदास खोब्रागडे, रत्नाकर साठे, रामलाल बनसोड, संतोष वाळके आदी ‘अंनिस’चे कार्यकर्ते उपस्थित होते.

अशोक जवादे, भद्रावती

शाखा : चंद्रपूर अभिवादन सभा

चंद्रपूर जिल्हा ‘अंनिस’च्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन सभा चंद्रपूर येथे आयोजित केली. गंगाताई हस्ते यांच्या हस्ते डॉ. दाभोलकरांना अभिवादन करण्यात आले. ‘अंनिस’चे चंद्रपूर तालुकाध्यक्ष भीमलाल, प्रमुख पाहुणे जांभूळकरसाहेब, नागेश पेटकर, राजेंद्र गोडबोले यांनी डॉ. दाभोलकरांच्या कार्यावर प्रकाश टाकला. किशोर तेलतुंबडे यांनी डॉ. दाभोलकरांवर कविता सादर केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी चमत्काराच्या प्रयोगाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमास अविनाश टिपले, सुनीताताई कांबळे, शीलाताई चहांदे उपस्थित होत्या.

गंगाताई हस्ते, चंद्रपूर

शाखा : वर्धा निर्भय मॉर्निंग वॉक

वर्धा ‘अंनिस’च्या वतीने ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढून महात्मा गांधी पुतळ्याजवळ डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन सभा घेण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्रकुमार कांबळे व जोत्स्ना वासनिक, जिल्हा कार्याध्यक्ष, सीताराम लोहकरे, प्रियदर्शना भेले, उषाताई कांबळे, दुर्गा काकडे, प्रतीक्षा हाडके, विलास नागदेवते, रामभाऊ ठावरी, अनिल भोंगाडे, राजेश वाघमारे, महेश दुबे, जानराव नागमोते, समीर बोरकर, माकपचे शहराध्यक्ष श्रीपाल कांबळे, प्रज्ञानंद वाघमारे, चंद्रप्रकाश बनसोड, चुणारकर, हेमराज रामटेके, अजय नगराळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

नरेंद्रकुमार कांबळे, वर्धा

शाखा हिंगणघाट : तहसीलदारांना निवेदन

अंनिस हिंगणघाट, जि. वर्धा शाखेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी सीमा आर. मेश्राम, राजश्री दि. बांबोळे, प्रमोदिनी उ. नगराळे, सिंधू दखणे, वंदना थुल, लीला थुल, जया पोथारे, रजनी कांबळे, रेखा थुल, प्रमिला कुंभारे, योजना वासेकर, अश्विनी निमसरकार, मीरा फुलमाळी, ज्वलंत मुन, विक्रांत भगत आदी कार्यकर्तेउपस्थित होते.

राजश्री बांबोळे, हिंगणघाट

शाखा: राहुरी तहसीलदारांना निवेदन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे खुनाबाबत राहुरी जि. अहमदनगर शाखेच्या वतीने राहुरीचे तहसीलदार फसीयोद्दीन शेख साहेब यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व समविचारी पुरोगामी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी मधुकर अनाप, महेश धनवटे, संदीप कोकाटे, डॉ.जालिंदर घीगे, राहुल वायळ, मच्छिंद्र दूधवडे, कैलास बुळे, सुदाम सरोदे ,सतीश डौले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मधुकर अनाप, राहुरी


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]