‘मअंनिस’ शाखा गडचिरोलीतर्फे पूरग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत

अंनिवा

गडचिरोली तालुक्यातील वाकडीजवळ असलेल्या कृपाळा गावात नुकत्याच येऊन गेलेल्या पुरामुळे त्या गावातील वसंत तुकाराम भोयर व रंजित बोंडकुजी बावणे यांची घरे पाण्यात बुडाल्याने क्षतिग्रस्त झाली. घरातील अन्नधान्याची पाण्यामुळे खूप मोठी...

मोठे मठ, संप्रदाय स्थापन करून फसवणूक करणार्‍या ढोंगी लोकांपासून विद्यार्थ्यांनी लांब राहावे – अनंत बागाईतकर

अंनिवा

“शालेय विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन समजून सांगितला पाहिजे. त्यामुळे लहान वयातच विविध अंधश्रद्धा, भ्रामक समजुती दूर होतील. मोठे मठ, संप्रदाय स्थापून फसवणूक करणार्‍या ढोंगी लोकांपासून लांब राहिले पाहिजे,” असे मत ज्येष्ठ...

‘कोरोना’नंतरचे जग

प्रा. नागनाथ कोत्तापल्ले

चीनमधून उद्भवलेल्या कोरोनाच्या साथीने आपल्या देशासकट जगभर माजवलेला हाहाःकार आपण अनुभवत आहातच. या भयानक परिस्थितीने सर्वांना चिंतीत केलेले आहेच; अशा परिस्थितीत आपल्या मनात आपण काम करीत असलेल्या क्षेत्रासंदर्भात आजच्या परिस्थितीच्या...

कोरोनानंतरचे शिक्षण क्षेत्र

हेरंब कुलकर्णी

कोरोनाचा वेगवेगळ्या क्षेत्रावर नक्कीच दीर्घकालीन परिणाम होणार आहे. मी ज्या शिक्षण क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात काय घडेल, याचा विचार करताना असे वाटते की, शैक्षणिक वर्ष बहुधा उशिरा सुरू होईल...

माध्यमांचे सोशल डिस्टन्सिंग

अभिषेक भोसले

कोरोनाच्या आधीचं जग आणि नंतरचं जग आता एकसारखं नसणार आहे. ते बदललेलं असेल. त्या जगातील माध्यमंही बदललेली असतील. माध्यमं बदलली नाहीत, तर आपल्याला त्यांना बदलासाठी तयार करावं लागेल. कोरोनाकाळात त्यांनी...

निमित्त कोरोनाचे… धडे आरोग्य व्यवस्थेचे …

डॉ. हमीद दाभोलकर

कोरोनाचे संकट हे आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल खूप काही गोष्टी आपल्याला शिकवून जात आहे. मार्केटचे तत्त्वज्ञान सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांवर किती तोकडे आहे, याचा अगदी स्पष्ट अनुभव आपण या साथीच्या निमित्ताने...

कोरोना रुग्णांवर सामाजिक बहिष्कार नको

कृष्णा चांदगुडे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे दि. 3 जुलै 2017 रोजी सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा अमलात आला. या कायद्यान्वये जातपंचायतीकडून होणार्‍या मनमानी व वाळीत टाकण्याच्या घटनांविरोधात गुन्हे दाखल होत आहेत. असे असताना...

क्यूबा – जागतिक भ्रातृभावाचे जितेजागते उदाहरण

अनुवाद - राजीव देशपांडे

सार्‍या जगभर कोरोनाच्या साथीने हाहाःकार माजवला आहे. अशा वेळेस खरे तर जात, धर्म, वंश, पंथ, देश अशी आवरणे झुगारून देऊन केवळ मानवतेच्या पातळीवर एक होत सर्व देशांनी एकमेकांस मदतीचा हात...

कोरोना काळातील संकल्पना आणि आपण

संजय बनसोडे

कोरोना (कोविड 19) या अंतिसंसर्गजन्य रोगाने संपूर्ण जग प्रभावित, बाधित झाले. भारत याला अपवाद नाही. कोरोनाची साथ आटोक्यात आल्यावर; किंबहुना संपल्यावर जगभर त्याचे वेगवेगळे परिणाम दिसतील. भारतीयांच्या जीवनात, जीवनशैलीत निश्चितच...

आहेराची रक्कम देणगी म्हणून दिली

संजय बारी

जनमुक्ती संघर्ष वाहिनीचे उषा पाटील व दिवंगत. भीमराव म्हस्के यांचा मुलगा बिरसा आणि रसिका यांचा आंतरजातीय विवाह नुकताच संपन्न झाला. अनिष्ट रूढी परंपरांना, मानपान, देणंघेणं आशा सर्व गोष्टींना फाटा देऊन,...