कुंडली पाहून राष्ट्रीय फुटबॉल संघ निवड करणारे कोच स्टीमक यांना तातडीने बडतर्फ करा!

-

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

कुंडली पाहून फुटबॉल संघ निवड प्रकरणी राष्ट्रीय फुटबॉल कोच स्टीमक यांना तातडीने बडतर्फ करा आणि ह्या कामी ज्योतिषाला दिलेल्या पंधरा लाख रुपयांची नुकसान भरपाई फुटबॉल कोच आणि भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष यांच्याकडून वसूल करून घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, फारुख गवंडी, डॉ. संजय निटवे, वाघेश साळुंखे, सुजाता म्हेत्रे, डॉ. शंकर माने, सचिन करगणे, रवी सांगोलकर, सुनील भिंगे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्याद्वारे केली आहे.

भारतीय फुटबॉल संघाचे कोच ड्रगोर स्टीमक यांनी आशिया कप पात्रता फेरीच्या सामन्याच्या दोन दिवस आधी भारतीय फुटबॉल संघाची संपूर्ण माहिती भूपेश शर्मा नावाच्या ज्योतिषाला दिली होती. प्रत्येक खेळाडूंच्या ग्रहस्थितीनुसार भूपेश शर्माने दिलेल्या सल्ल्यानुसार अंतिम संघात कोण खेळणार किंवा नाही हे ठरवले गेले होते. नुकतेच त्यावेळीचे एआयएफएफचे पदाधिकारी कुशल दास यांनी, ज्योतिषाची मदत घेतली गेली होती आणि त्यासाठी बारा ते पंधरा लाख रुपये खर्च केला गेला, असे मान्य केले आहे.

या पत्रकात पुढे म्हंटले आहे की, ज्योतिष या विषयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ते एक छद्म विज्ञान आहे. ग्रह-गोल-तार्‍यांचा शास्त्रीय अभ्यास करणार्‍या विज्ञान शाखेला ‘खगोलशास्त्र’ असे म्हणतात आणि खगोल शास्त्राच्या उपलब्ध अभ्यासनुसार ग्रह-गोल-तार्‍यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे अशा संपूर्ण अशास्त्रीय गोष्टी राष्ट्रीय संघ निवडताना वापर करणे हे अत्यंत चुकीचे असून जीवापाड मेहनत करणार्‍या खेळाडूंच्या कर्तृत्वावर अविश्वास ठेवणारे आहे.

प्रसिद्धी पत्रकात पुढे नमूद केले आहे की, डॉ.जयंत नारळीकर ह्यांच्या पासून अनेक जेष्ठ खगोल वैज्ञानिकांनी ज्योतिषाला विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासून ते फोल असल्याचे सिद्ध केले आहे. जेष्ठ वैज्ञानिक जेम्स रँडी यांनी जगाच्या अंताच्या विषयी केलेल्या पंचेचाळीस दाव्यांचा अभ्यास करून त्यांचा फोलपण सिद्ध केला होता. तसेच भारतीय वंशाचे नोबेल पारितोषिक विजेते व्ही. वेन्कटरामन ह्यांनी देखील ज्योतिषाची तुलना छद्मविज्ञानाशी केली आहे, ह्याची देखील आठवण ह्या निमित्ताने करू देण्यात आली आहे.

सध्याच्या शासनाने ज्योतिषाच्या सारख्या अवैज्ञानिक गोष्टी अभ्यासक्रमात समविष्ट करण्याचा जो प्रकार चालवला आहे त्या मुळेच अशा गोष्टीना एक प्रकारे शासनाची मान्यता असल्या सारखी परिस्थिती निर्माण होत आहे. जन्मवेळ, कुंडली अशासारख्या कोणत्याही वैज्ञानिक आधार नसलेल्या गोष्टींचे यामुळे समाजात स्तोम माजते आहे आणि आपल्या कर्तृत्वा पेक्षा ज्यांचा आपल्या वैयक्तिक कर्तृत्वाशी काहीही सबंध नाही अशा गोष्टींवर अवलंबून राहणारी मानसिकता ह्या मधून निर्माण होते. ते समाजाच्या साठी अत्यंत घातक आहे असे देखील ह्या मध्ये नमूद केले आहे.

एका बाजूला चांद्रयान -३ चंद्रावर पाठवण्यातून विज्ञानवादी मानसिकता जोपासण्याचे महत्व अधोरेखित होत असताना अशा स्वरूपाच्या अशास्त्रीय गोष्टीना उत्तेजन देणे शासनाने टाळायला हवे असे देखील ह्या मध्ये म्हटले आहे. ज्योतिषाला कुठलाही वैज्ञानिक आधार नसून ते केवळ मनोरंजनाचे माध्यम आहे ही भूमिका शासनाने मान्य करावी. अन्यथा ज्योतिषाचा ग्राहक संरक्षण कायद्यात समावेश करून ग्राहकांना सल्ला चुकल्यास नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा करावा; अशी देखील मागणी या पत्रकाच्या मार्फत अंनिसने केली आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]