साथींचे रोग आणि सिनेमे – ब्लाईंडनेस

सुनील मधुकर प्रधान -

करोना रोगाच्या महामारीच्या विळख्यात आज अख्खी मानवजात भरडली जात आहे, या रोगाचा उपाय भविष्यात येऊ घातलेली औषधे आणि वॅक्सीनस हा आहे. तो निकट वा दूरस्थ असेल; पण निश्चित आहे.

पण, मानवी अविवेकाच्या रोगाचे काय?

Homosepien – शहाणा मानव उत्क्रांतीचे अपत्य. अन् यानंतरची हजारो वर्षांची वाटचाल. या वाटचालीत माणसाने विकासाचे, प्रगतीचे, संस्कृतीचे अनेक टप्पे पार केले. एकमेकांना बरोबर घेऊन केलेली तांत्रिक प्रगती तर थक्क करणारी. परंतु त्याच बरोबरीने आधुनिक काळात माणसा-माणसातील संबंध तुटक अविक्षित होत आहेत का? माणसं सुटीसुटी, एकाकी होत आहेत का? कसोटीच्या क्षणी मानवी स्वभावाची काळी बाजूच सामोरी येते का? डोळस शहाणपणाऐवजी अंध स्वार्थ वरचढ ठरतो का? व्यवस्थेऐवजी अराजकाचाच आश्रय होतो का? या आणि अशा प्रश्नांचं गारूड निर्माण करणारी ज्युझे सारामागो या लेखकाची पोर्तुगीज भाषेतील कादंबरी नि त्यावर आधारलेला फर्नांडो मायरलेसचा चित्रपट ‘ब्लाईंडनेस.’

चित्रपटाची सुरुवात होते गाड्यांच्या प्रचंड आवाजाने. सिग्नल्स, त्यानंतर येतो कोण्या एका शहराचा वरून घेतलेला शॉट. कॅमेरा आकाशाकडे झेपावतो. रेड सिग्नलवर पसरलेले पांढरे शुभ्र आकाश अन् त्यातून सरकणारे एक विमान. ग्रीन सिग्नल खात्री, रस्त्यावर वाहतूक सुरू होते. एक नेहमीचे शहरी धावपळीचं दृश्य. अन् हे थबकतं सिग्नलजवळ कर्रकर्रत थांबणार्‍या एका गाडीमुळे. कारण गाडीवाल्याला आलां आहे अचानक अंधत्व. पण हे अंधत्व नेहमीचे नालही हे आहे पांढर्‍या प्रकाशाच्या पडद्याचे आंधळेपण. त्यानंतर एकेक करून सर्वजण या साथीचे बळी होत जातात. एकट्या डॉक्टरच्या बायकोचा अपवाद वगळता.

ही अंधत्वाची कथा रुपकात्मक आहे. मानवी अविवेकावर केलेले हे जीवघेणे भाष्य आहे. अंधत्वातून अराजकाकडे आणि अराजकाकडून पारावीपणाकडे होणारा मानवी प्रवास. मानवी समाजातील भिन्न वंशांच्या, भिन्न वयांच्या, भिन्न रंगांच्या, भिन्न लिंगांच्या, भिन्न व्यवसायातील माणसांचा एक पट (cross section) दाखवून चितारला आहे. या पात्रांना विशेष नामे आणि अधिकची ओळख नाही. कारण ही कथा विशेष व्यक्तींची नसून मानवजातीची आहे. ही कथा आहे एकाच वेळी अतिशय अंगावर येणारी व त्याच वेळी डोळ्यांत अंजन चरचरून अंजन घालणारी. प्रथम अंधत्व आलेल्या माणसाकडून त्याच्या घरी घेऊन येणार्‍या चोराला तसेच त्याच्या स्वत:च्या पत्नीला. ज्याच्याकडे तपासायला त्याची बायको घेऊन जाते. त्या डॉक्टरला डॉक्टरकडील रिसेप्शनिस्टला डॉक्टरकडे आलेल्या तीन पेशंट्सला, म्हणजे गॉगलवाली तरुणी, लहान मुलगा व काळी पट्टी लावलेला माणूस यांना रोगाची लागण होते. आणि मग ही साथ सर्वांनाच कवेत घेते. फक्त डॉक्टरची पत्नी वगळून.

कादंबरीत सारामागोने व चित्रपटात मायरलेसने. हा अतर्क्य वाटणारा तपशील असा काही चित्तारला आहे की, प्रत्येक घटना प्रत्येक चौकट विलक्षण वाटावी; जीवंतपणे आपल्यासमोर घडणारे प्रत्यक्ष वास्तव! अंधव्यक्ती आवाजाच्या रोखाने मार्गक्रमणा करते, याचा विलक्षण उपयोग मायरलेसने अंधत्वाचे बळी होतानाच्या दृश्यांत केला आहे. म्हणून आधी ध्वनी/आवाज, संवाद ऐकू येतात. नी नंतर दृश्य दिसू लागते. दबा धरून बसलेल्या अंधत्वाची ही बळी घेण्याची चाल दिग्दर्शकीय प्रतिमेचे दर्शन घडवणारी आहे.

डॉक्टर, डॉक्टरची पत्नी, चोर, गॉगलवाली बाई, मुलगा पहिला आंधळा हा क्वारंटाईन मध्ये येणारा पहिला गु्रप. डॉक्टरच्या पत्नीने डॉक्टरबरोबर येण्यासाठी आपल्यालाही अंधत्व आल्याचा बहाणा केला. आल्याआल्याच चोर आणि पहिला आंधळा यांच्यात हाणामारी होते. चोराने पहिल्याची गाडी चोरली म्हणून अन् पहिल्याने चोराची दृष्टी चोरली म्हणून. डॉक्टर विचारतो, Do you want to make this place hell? या जागेचा नरक होणार आहे, याची ही सूचना! डॉक्टरची पत्नी पुढाकार घेऊन वॉर्डची सर्वांना सवय व्हावी म्हणून एकमेकात हात गुंफून वार्ड मधून फिरवून आणते. फिरताना चोर गॉगलवालीशी लगट करतो, तिचा बूट लागून चोराच्या पायाला मोठी जखम होते. या जागेचा नरक होण्याची प्रक्रिया बहुधा सुरू झाली आहे. डॉक्टर पत्नी न झोपता जागृत राहून या गटाचे सारथ्य करत आहे.

आणखीही दोन गट येथे येऊन मिळतात. यात पहिल्याची पत्नी, डॉक्टरची रिसेप्शनिस्ट व फॉर्मासिस्ट कक्षा असिस्टंटही आहेत. डॉक्टर पत्नी इथे त्यांचे स्वागत करते आणि इथे कशी व्यवस्था लावता येईल, याचे मार्गदर्शन करते. आलेल्यांकडून त्याला चांगला प्रतिसादही मिळतो.

आणि मग येतो एका डोक्यावर काळी पट्टी बांधलेला माणूस. त्याच्याकडे रेडिओ आहे. डॉक्टर पत्नी त्याला वॉर्डमध्ये घेऊन येते. सगळ्यांना उद्देशून “बाहेरच्या जगातील हालहवाला सांगू का?” म्हणून विचारतो. सर्वजण होकार भरतात.

“पहिल्या चोवीस तासांत शेकडो जण साथीचे शिकार झाले. कोणतीही वेदना नाही. समोर पसरलेला केवळा पांढरा समुद्र. सरकारने नेहमीप्रमाणेच उपाययोजना केल्या. तात्पुरती क्वारंटाईन, वैद्यकीय जगतातील आंतरराष्ट्रीय मेळावे, नेत्र तज्ज्ञांच्या व्यर्थ परिषदा आणि मग मागोमाग आले गोंधळ, गडबड, अपघात, कुणाला नेमकेपणाने कळलंच नाही की, Whether panic spread blindness or blindness spread panic अन् मग एक दिवस मिनिस्टरने देखील जनतेला उद्देशून जाहीर केले की, “तुमच्यासारखीच मीही आंधळी झाली आहे.” हे ऐकताच तेथे थंड स्तब्धता पसरली. हातातील रेडिओ पुढे करून काळी पट्टीवाला म्हणाला, “कदाचित आता आपल्याला संगिताची गरज आहे.” रेडिओवर संगीत सुरू होते. अन् वातावरणाचा कब्जा घेऊ लागते. गॉगलवाली डॉक्टरच्या मांडीवर किंचित कलते. डॉक्टर तिच्या केसातून मायेने हात फिरवतो, पत्नी समंजस नजरेने पाहते, आणि काळ्या पट्टीवाल्याचे निवेदन सुरू होते, And for the length of the song the kingdom of the blind shrank in to a circle of AM Radio. One can only imagine the inclined heirs, weired eyes and tears, why we should ask whether these are ears of joy or sorroco. Joy, sorroco are not like oil and water; they coexist.” क्वारंटाईन मध्ये आणखी माणसे जोडली जातात. यात बार टेंडसाठी एक जन्मांध हेही असतात. या सतत ओवल्या जाणार्‍या मानवी समुहातून व्यवस्थेवरील (आणि अव्यवस्थेवरील) ताण वाढतच जातो. मी अराजकात परिवर्तीत होतो. व्यवस्थेची शक्यता डॉक्टर पत्नीच्या पुढाकाराने बनत चाललेल्या गटातून सूचितही हाते. खरे म्हणजे स्वयं निर्णयातून स्वत:ला नियमित करून सर्व सहमतीतून, समन्वय साधून व्यवस्था निर्माण होऊ शकली असती; पण माणसे अशा वेळेस अव्यवस्थेचा, अराजकाचा, पारमीपणाचा, अन् त्या बरोबर हतबलतेचा आणि घरवशतेचा आश्रय करतात, याचे रदविग्न करणार व माणुसकी वरील विश्वास घडवणारे चित्रण या क्वारंटाईन मधील भागात केले आहे.

डॉक्टर वॉर्ड नं. 3 मध्ये व्यवस्था कशी लावता येईल हे त्याचा वॉर्ड रिप्रेझेंटेटिव्ह निवडावा म्हणून सांगण्याला जातो व त्यावर त्या वॉर्डमधील बार टेंडर त्याचा उपहास करतो आणि म्हणतो, ‘आमच्याकडे राजेशाही आहे. ‘I declair myself king of the ward no.3’ पाठोपाठ जन्मांध पुकारा करतो. ‘Long live the king’ अख्खा वॉर्ड त्याला दुजोरा देतो. ही आहे माणसाचे जमावात रूपांवर करणारी प्रक्रिया. दादागिरीची आणि अराजकाची सुरुवात.

King of the ward क्वारंटाईनचा ताबा घेतो आणि जाहीर करतो की, यापुढे अन्नासाठी पैसे मोजावे लागतील Food for money. पिस्तूलाचे बार काढून सर्वांवर धाक बसवितो. पैशाऐवजी ज्या काही चिजवस्तू असील त्यांची मागणी केली जाते. हे सगळे ऐकून परत निघताना डॉक्टर पत्नीच्या वॉर्डमधील लोकांचे अंतर्मन उघडे पडते. एक काळा मुलगा म्हणतो, आपण एकत्र राहूया आणि त्यांना नाही म्हणूया. त्यावर त्याचा हात धरून चालणारा गोरा माणूस उत्तरतो कोणी निगर म्हणतो म्हणून मी त्याला माझ्या चिजवस्तू देणार नाही. काळा मुलगा म्हणतो की, तुला दिसत नाही, तर तुला कसे कळले की, तो ‘निग्रोह’ आहे आणि तो गोर्‍या माणसाचा हात सोडतो. “मी त्याच्या आवाजावरून सांगतो” इतक्या विपरीत परिस्थितीत असतानाही खोल रुतलेल्या वंशद्वेषाचं दर्शन घडतं. डॉक्टर पत्नी सर्वांकडून चीजवस्तू गोळा करते; पण त्यात मिळालेली कात्री स्वत:जवळ ठेवते. तर स्टेनो लायटर स्वत: जवळ ठेवते. डॉक्टर वस्तू किंगला देतो. तेव्हा बाजूला जन्मांध ब्रेल पट्टीवर हिशेब करत असतो. जन्मापासून अंधत्वाचा शाप भोगणार्‍याकडे सहानुभूतीऐवजी इतका टोकाचा पारावी स्वार्थ पाहून डॉक्टर क्षुब्ध होतो. पुढल्या खेपेस किंग जाहीर करतो की, तुमच्याकडे आता काहीच उरलं नाही. आमची पुढची योजना तयार आहे. Woman for food वॉर्डातील स्त्रिया संतप्त होतात. या योजनेला नकार देतात. कोणी पुरुष म्हणतो, सक्ती नाही any volunteers? यावर स्त्रिया संतप्त होतात. पुरुषांना जायाचं असेल, तर त्यांनी जावं, कोणी स्त्री सुनावते ‘We are not fags’ कोणा पुरुषाचे उत्तर. ‘We are not whores’ स्त्रियांचे उत्तर. या निमित्ताने लिंगभेद उघडा पडतो. प्रथम नकारानंतर परिस्थिती जाणून एक एक करून स्त्रिया तयार होतात. पहिला आंधळा dignity वर बाष्कळ बडबड करतो; पण त्याची बायकोही तयार होते म्हणजे I am no different than others. एकमेकांच्या आधाराने स्त्रिया वॉर्ड नं. 3 कडे निघतात. त्यांच्या चाहुलीने वॉर्ड नं. 3 च्या लोकांचा पाशवी धिक्का “They are comming” या प्रसंगात एक स्त्री बेशुद्ध होते. तिला घेऊन सर्वजणी परत येतात. तिची सुश्रुषा करतात; पण ती मरून जाते. दुसर्‍या दिवशी जन्मांध त्यांच्या वॉर्डमध्ये येऊन त्या प्रसंगाबद्दल व त्या मृत स्त्रीबद्दल बोलतो, तेव्हा संतप्त होऊन डॉक्टर पत्नी त्यांच्या वॉर्डमध्ये जाऊन किंगला कात्रीने भोसकून मारते. यामुळे या दोन वॉर्डमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होते. वॉर्ड नं. 3 वाले बदला घेतील या भावनेने घाबरून जाऊन काही पुरुष किंगला मारणार्‍या स्त्रीला शोधून काढून शांततेचा तह म्हणून वॉर्ड नं. 3 च्या हवाली करण्याचे ठरवतात. आपणच हे कृत्य केलंय हे सांगण्यासाठी उठणार्‍या डॉक्टर पत्नीला तिची हालचाल जाणून डोळ्यावर पट्टी असणारा माणूस अडवतो व आपण त्यांच्याशी मुकाबला करून आपलं अन्न आपणच मिळवू, असे सांगतो व सगळे त्याला दुजोरा देतात. हे घडत असतानाच स्टेनो आपल्या जवळील लायटर घेऊन वॉर्ड नं. 3 ला आग लावते. इकडे एकमेकांच्या आधाराने डॉक्टर पत्नीच्या पुढाकाराने वॉर्डमधील मंडळी बाहेर पडतात. डॉक्टर पत्नी क्वारंटाईनचा दरवाजा उघडते. पहारेकरी कुणीच नसतात. ‘We are free’ ती उद्गारते.

बाहेरचं विश्व गोठलेलं. रेल्वेचे रिकामे डबे, वाहतूक नाही, सगळीकडे कचरा, घाण, पडलेली प्रेते इतस्तत: फिरणारी काही एकटी माणसे, तर काही टोळकी. डॉक्टर पत्नी, डॉक्टर, गॉगलवाली, पहिल्या आंधळ्याची बायको, पहिला आंधळा, एका डोळ्यावर पट्टी लावलेला फार्मासिस्टचा असिस्टंट, छोटा मुलगा असे एकमेकांच्या आधारे फिरतात. फार्मासिस्ट कडला मुलगा वाटेत हात सुटून चुकतो. उरलेल्याला एका जागी ठेवून डॉक्टर पत्नी अन्न शोधायला बाहेर पडते. डॉक्टरही बरोबर येतो. एका स्टोअरच्या बेसमेंटमध्ये अन्न मिळते. इतर लोकं येऊन अन्नासाठी तिच्या वर हल्ला करतात. डॉक्टर तिला सोडवतो. ती बाहेर अनू ढाळत बसते. तेव्हा एक कुत्रा जवळ येऊन तिचे अश्रू चाटतो. हा कुत्राही आता त्यांच्या गटाचा सदस्य झाला आहे. इतक्यात पाऊस येतो. ती आडोशाला येते. ते असते एक चर्च. ती आजूबाजूला पाहते तर चर्चमधील सर्व पुतळ्यांचे डोळे पट्टीने बांधलेले. आणि मागून निवेदन ऐकू येते, “देव आपल्याला शिक्षा करतो, नाही असं काही घडत नाहीये, तो काही ईश्वराचा मार्ग नव्हे, जे काही घडत आहे त्यातून सेंट पॉल संदर्भात जे घडलं त्याची आठवण होत आहे. पॉल ख्रिश्चनांना शिक्षा करत असे, मारत असे. पण झाले असे की, साक्षात ईश्वरच त्याच्याकडे आला आणि त्याला त्याने ख्रिश्चन केलं आणि ख्रिश्चनच केलं असे नव्हे की, त्याला आपल्या नेत्राने आंधळं करून टाकले, हेच आपल्याला होतं आहे का?” सर्वजण बाहेर पडतात. पावसात भिजतात. हर्षभरीत होतात. एकमेकांना मिठ्या मारतात. एकदा संगीताने असेच त्यांना जवळ आणले होते. त्यांचा गट पुढे निघतो. डॉक्टर पत्नी त्यांना चर्चमध्ये जे पाहिलं ते सांगते. “भयंकर कोणी असं केलं असेल?” कोणी तरी म्हणतं, “आपण आंधळे झालोय आपल्याला दिसत नाही म्हणून त्यांनाही दिसू नये म्हणून त्यांनी पुतळ्यांचे डोळे बांधले असेल.” आंधळ्याला असे डोळे बांधणं कसं काय शक्य आहे? यावर काळी पट्टी लावलेल्या माणसाचं म्हणणं, “most likely priest who saw what happened and crisis of faith may have done it” आपल्याला मात्र द़ृष्टी असलेली नेता मिळाली आहे. आपण खरोखरच सुदैवी आाहोत, असं गॉगलवाली म्हणते. त्या दिवशी तेथेच रात्र काढून दुसर्‍या दिवशी सर्वजण डॉक्टरच्या घरी जायला निघतात. रस्त्यात गॉगलवालीला प्रश्न पडतो. आपण एकमेकांना कसं ओळखायचं? त्यावर डोळ्यावर काळी पट्टी असणारा माणूस म्हणतो, ‘जे काही आहे, तेच म्हणजे आपण आहोत.’ सर्वजण घरी येतात. डॉक्टर पत्नीच्या रूपानं आंधळ्या प्रवासात सुद्धा अराजकात सुद्धा माणसांना एकत्र आणणारा ‘माणूस पण’ टिकवणारा, साथ करणारा, प्रेम देणारा, तगून राहणारा समंजस डोळसपणा अपवादात्मक का होईना आस्तित्वात असोतच याचे प्रत्ययकारी दर्शन येथे घडवले आहे. हा डोळसपणाही कधी कधी शक्य होतो.

डॉक्टर पत्नीचे चांगुलपण सामर्थ्य हे एखाद्या त्रात्यासारखे नाही. आणि ती सर्व पाणिमात्रांना तरून नेतो, असे काही हे नाही. या सामर्थ्याला, चांगुलपणाला मर्यादा आहेत आणि तगून राहून, टिकून राहून त्या पलिकडे जाणे देखील आहे. डॉक्टर पत्नीच्या नेतृत्वाची जवळीक निर्माण झालेला एक गटच निर्माण होतो. एक कुटुंबच म्हणाना. कदाचित सुव्यवस्थेचे संसूचन करणारे. आणि म्हणूनच ती घरात आल्यावर म्हणते, I am reeling at home and its your home too.

सर्वजण कपडे बदलतात, नहातात आणि एकमेकांसाठी सुंदर बनून जातात. गॉगलवाली काळी पट्टीवाल्यासाठी गरम पाणी घेऊन येते.

ती : बरं वाटतंय.

तो : हो.

ती : या मुलाचे आई-वडील सापडतील अशी मला आशा वाटते. तुझी आशा कोणती?

तो : वृद्ध माणसांच्या इच्छारसारखे व्यर्थ काहीही नाही.

ती : तरीपण

तो : तुला नाही समजणार, आपण आता जसे आहोत तसे जगत राहावे, असे मला वाटते.

ती : म्हणजे आंधळे?

तो : माझ्यासाठी आजपर्यंत इतकं चांगलं कधीच नव्हतं. मला आपण एकत्र जगत राहावं, असं वाटतं.

ती : एकत्र माझ्याबरोकर की, सर्वांबरोबर.

तो : आपण इथे एकटेच आहोत? कोणी आहे का इथे?

खरं म्हणजे सर्वजण तेथेच आहेत. कोणीच काही उत्तर देत नाहीत. सर्व शांत राहतात. एका टोकाच्या अनुभवातून सारे गेलेच. कदाचित त्यातून सारे जवळ आलेत. किंचित समंजस झालेत. तेथे कोणी नाही असे समजून काळी पट्टीवाला म्हणतो, “छान छान मला तुझ्याच बरोबर राहावेसे वाटते.”

एकत्रित नि वैयक्तिक भावबंध फुलू लागलेत. हळव्या जुन्या आठवणी जाग्या होताहेत. पहिल्या आंधळ्या बरोबर त्याची बायको त्या हळूवारपणे जागवतेय.

डॉक्टर पत्नीने डायनिंग टेबलवर सर्वांसाठी जेवण वाढून तयार ठेवलंय. कोपर्‍यात एक मधाची बाटली असल्याचंही ती सांगते. डॉक्टर म्हणतो, “A special bottle of something saprkling for our guest” त्यावर काळी पट्टीवाल्याचं म्हणणं “There is nothing like water clean water” स्वच्छ नितळ, निर्मळ पाणी, स्वच्छ, नितळ, निर्मळ द़ृष्टीकडे लक्ष वेधणारं डॉक्टर “I would purpose a toast to our, family” डॉक्टर पत्नी “o our human family” त्यावर छोटा मुलगा “And to the dog” डॉक्टर पत्नीसह सर्वजण “To the dog, to the dog” मध्ये सामील मुक्या प्राण्यासकट त्यांचे आता विस्तारित कुटुंब झालं आहे.

जेवणानंतर डॉक्टर पत्नीजवळ येतात. बर्‍याच कालावधीनंतर नवरा-बायको म्हणून आई/दाई म्हणून तिनं दीर्घकाळ त्याला जपलंय. तिला थोपटत तो म्हणतो, “I see you when I to each your face. I see you so beautiful. It`s well I want to remember” तळ ढवळून खोलवरचं काही हाती लागतंय.

दुसर्‍या दिवशी सगळ्यांना एकत्र करून डॉक्टर पत्नी अन्नाची कमतरता आणि सुरक्षितता याबाबत बोलत असते. पहिल्या आंधळ्यासाठी पेल्यातून कॉफी ओतते आहे. ओतली जाणारी कॉफी, प्याला अन् नंतर त्यातून धुरकट पांढुरक्या हलक्या पडद्याआडून डॉक्टर पत्नी पहिल्याला दिसू लागते. “I can see you, I can see you” पुटपुटत पुटपुटत तो मोठ्याने बोलू लागतो. “मला सगळं दिसतंय.” “सगळं किती सुंदर आहे” “माझी दृष्टी मला परत मिळालीय.” प्रथम सर्वांचा अविश्वास, चक्रावून जाणं अन् मग नंतर हर्षभरीत होत “त्याला दिसतंय, दिसतंय” म्हणून सर्वांचाच गजर. आनंदाने सगळेच एकत्र येतात. मिठ्या मारतात. हा आनंदोत्सव चालू असताना एकटा काळीपट्टीवाला कोपर्‍यात शांत बसून कदाचित अंतदृष्टीने सारं न्याहाळतो आहे. सर्वांपासून बाजूला सरत काळीपट्टीवाल्याला ओलांडून डॉक्टर पत्नी गॅलरीत जाते. इकडे काळीपट्टीवाल्याचे निवेदन सुरू होते-

“At that movement same unspoken thoght must have occurred to everybod He was first to go blind perhas we will all begin to gain our silent gum. So the celebration was not entirely selfless. The next says the next weels they will sleep with anticipation that they will see again. this time they will really see. But who will be so timid as to cling to the blindness, who will be so foolish to fear that these intimacies might be lost and what about this woman who is now so sttangely silent who has borne such a terrible weight and is now so suddenly free. Already she could imagine voices of the city shoulding “”I can see” ती आकाशाकडे पाहते. फक्त पांढरेफेक आकाश.

“I am going blind, she thought” ती चेहरा खाली वळवते. तिला दिसतं-शहर तसंच आहे.

पांढर्‍याशुभ्र आकाशातून सरकणार्‍या विमानाच्या चौकटीपासून, पांढर्‍याफेक फक्त आकाशाला चौकटीपर्यंत, वरून घेतलेल्या खालच्या शहराच्या गतिमान, कर्कश धावपट्टीच्या शॉटपासून तिला दिसणार्‍या शांत शहराच्या दर्शनापर्यंत पहिल्याच्या ‘I am blind’ या टाहोने थबकणार्‍या शहराच्या दर्शनापासून “I am going blind” या डॉक्टर पत्नीच्या मनात येणार्‍या विचारातून धोक्याची जाणीव ठेवणार्‍या पण थांबलेले जीवन सुरू होण्याची शक्यता दर्शविणार्‍या शहराच्या शांत दृश्यापर्यंत एक विलक्षण थक्क करणारा प्रवास घडवला आहे. फर्नांडो मायरलेसने.

हे सगळं विश्व दाखवण्याचे विलक्षण आव्हान, मायलेससमोर होत. सुरुवातीपासून क्वारंटाईनपर्यंतचा प्रवास त्याने एका सर्वसाक्षी नजरेने टिपला आहे. त्यानंतरचा भाग डॉक्टर पत्नीच्या नजरेने चित्तारला आहे. अगदी अखरेपर्यंत. पण काळी पट्टी लावलेल्या माणसाच्या आगमनापासून याला जोड मिळते ती त्याच्या अंतर्दृष्टीची. सारामागोने कादंबरीत लेखकाचे पात्र निर्माण करून त्याचे चिंतन निवेदनातून साकारलं आहे. तर मायरलेस येथे काळी पट्टीवाल्याच्या अंतर्द़ृष्टीची रेखाटनं त्याच्या धीरगंभीर, समंजस शहाण्या अन् कळवळ्याच्या निवेदनातून मांडतो. चित्रपटाचा शेवट म्हणजे या शैलीचा उत्कर्षबिंदूच.

या चित्रपटावर मिश्र प्रतिक्रिया आली. अनेकांना तो कादंबरीहून उणा वाटला. थोड्यांनीच तो त्यांच्या टॉप-10 मध्ये नेऊन बसवला. पण या सर्वांत महत्त्वाची प्रतिक्रिया होती खुद्द कादंबरीकार ज्युरो सारामागोची. मायरलेसने सारामागोला थोड्या लोकांबरोबर चित्रपट दाखवला. चित्रपट संपला आणि अश्रूपूर्ण नेत्रांनी सारामागो मायरलेसला म्हणाला, “Fernando, I am so happy to have seen the movie. I am as happy as I was the day I finished the book.”

याहून अधिक मोठी दाद कोणती असू शकते?

करोनाचा निकट वा दूरस्थ उपाय अतिनिकट येवो आणि अविवेकाचाही.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]