सुभाष किन्होळकर - 9421492069
![](https://anisvarta.co.in/wp-content/uploads/2021/03/Balkavita.jpg)
सांग, सांग ना गं आई
आजोबांना शेजारच्या।
रोज-रोज सांगतात
गोष्टी भयाण भुताच्या॥1॥
चिंचेच्या त्या झाडाखाली
जात नको जाऊ म्हणे।
असतात तिथे सदा
भुताचे अस्सल ठाणे ॥2॥
बोरांसाठी नदी वाट
घालू नकोस पालथी।
पाण्यासाठी फिरतात
भुते तिकडे सारखी ॥3॥
खरंच सांग गं आई
काय खरं? काय खोटं?।
असतात म्हणे त्यांच्या
पायाची उलटी बोटं ॥4॥
आई म्हणे धिटाईने
भिऊ नको माझ्या बाळा।
नेऊ नये चिंच-बोरे
म्हणून असे ही शाळा॥5॥
नाही जगी भूत-बित
नाही कुठे रहिवास।
कल्पनेच्या गोष्टी सार्या
नुसताच होई भास॥6॥
-सुभाष किन्होळकर
मु.पो. धामणगाव बढे, ता. मोताळा, जि. बुलढाणा
मोबा. ९४२१४९२०६९