निशाताई भोसले -
शनिशिंगणापूर आंदोलनात डॉ. लागूंना पोलीस गाडीमध्ये घालून जेलमध्ये घेऊन जात असताना मी त्यांच्या शेजारीच बसले होते. तेंव्हा मी त्यांना गंमतीने विचारले, “डॉ. तुम्ही पिंजरा पिक्चरात जेलमध्ये गेला होतात पण, आता प्रत्यक्षात जाणार आहात तर, कसे वाटते?” त्यावर ते मिश्किपणे म्हणाले, “पहिलटकरणीला जशी भीती वाटेल तशीच भिती आता मला वाटत आहे!” यावर डॉ.दाभोलकरांच्यासह आम्ही सर्वजण मनमुराद हसलो. प्रत्यक्षात जेलमध्ये गेल्यानंतर जेलरसाहेबांनी डॉ.लागूंच्या बघून आम्हाला चांगली ट्रीटमेंट दिली. सकाळी नाष्ट्यासाठी घरी बोलावले. डॉ.लागूंच्यामुळे आज आपल्या सर्वांना चांगला नाष्टा मिळाला, असे दाभोलकरांनी सर्वांसमोर सांगितले. अंनिसचा एक चांगला हितचिंतका गमावला याचे मनस्वी दुःख होते. त्यांना विनम्र अभिवादन!