-
शबरीमला मंदिर प्रकरणात धार्मिक प्रथांचा विचार करताना संवैधानिक मूल्यांना प्राधान्य देण्याची मागणी करणार्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल असणार्या याचिकेवर सलग सुनावणी सुरू आहे. ही याचिका अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर, नंदिनी जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
याचिकेत, सर्वोच्च न्यायालयाचा २०१८ चा निर्णय कायम ठेवण्याची तसेच धार्मिक प्रथांविषयी विचार करताना संवैधानिक मूल्यांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याचिकेत राज्यघटनेतील कलम ५१ अ (ह) वर विशेष भर देण्यात आला आहे. या कलमानुसार प्रत्येक नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि चिकित्सक विचारसरणी विकसित करणे हे कर्तव्य आहे. त्यामुळे न्यायालयांनीही वैज्ञानिक दृष्टिकोनास प्रोत्साहन देण्याची मागणी याचिकेत केली आहे.
