‘अंनिस’तर्फे जागतिक परिचारिका दिनानिमित्त सत्कार समारंभ

श्रीपाल ललवाणी -

“परिचारिका या उच्चशिक्षित असतात. त्या अतिशय मेहनती असतात. त्या संशोधनात सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. जगभरात ज्या ज्या व्यक्तींनी वैज्ञकीय संशोधनात हातभार लावला त्या प्रकारचे काम परिचारिकांकडून अपेक्षित आहे, त्यासाठी त्यांना सर्व सुविधा मिळायला हव्यात”, अशी अपेक्षा डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी व्यक्त केली.

आधुनिक नर्सिंगच्या जनक फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा १२ मे हा जन्मदिवस हा ‘जागतिक नर्सेस डे’ म्हणून साजरा केला जातो. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या कार्याचा परिचय व्हावा तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, त्यांचे विचार घराघरात पोहचावेत या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणे शाखेतर्फे विविध रुग्णालयांतील परिचारिकांचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेले पुस्तक भेट देऊन सत्कार केला गेला. या वेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेले ‘विचारांचा जागर’ हे पुस्तक आणि मुक्ता मनोहर यांनी लिहिलेले ‘नग्न य : बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध’, ‘एक वादळी सूर-बंत सिंग’ हे पुस्तक सुद्धा परिचारिकांना भेट म्हणून देण्यात आले.

त्याप्रमाणे या वर्षीही शहरातील विविध रुग्णालयांतील ३० परिचारिकांचा सत्कार केला गेला. प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि कामगार नेत्या व लेखिका मुक्ता मनोहर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या दोघांनी सर्व परिचारिकांचा सत्कार केला.

माया साळुंके व सुनंदा कुंभार (संजीवन हॉस्पिटल), आशा भुजबळ व शैला कुदळे (जहांगीर नर्सिंग होम), सुनीता पडवळ व प्राजक्ता बर्वे (के. ई. एम.), रुपाली खाडे व यास्मिन सय्यद (ताराचंद हॉस्पिटल), वर्षा गवई व सपना लोखंडे (दळवी हॉस्पिटल), प्रीती पिंपळेकर व कविता वाघमोडे (सह्याद्री हॉस्पिटल), नीता चौधरी व रुपाली अधिकारी (येरवडा मनोरुग्णालय), पुष्पा मरकड, अरुणा गायकवाड, प्रज्ञा गायकवाड, सुनीता थोरात, रेखा पवार, संगीता भुजबळ व हेमंत चौगुले (ससून रुग्णालय), संगीता त्रिंबके, संगीता गांधी व सुमती मालगुंडे (कमला नेहरू हॉस्पिटल), मनीषा शिंदे व मनीषा भागवत (सूर्या हॉस्पिटल), अनामिका सोलोमन व जीजी शेंडगे (रुबी हॉस्पिटल) व कुंदा कुंबरे या सत्कार केलेल्या परिचारिका आहेत.

या वेळी अंनिस कार्यकर्ते भारत विठ्ठलदास यांनी ‘चमत्कारामागील विज्ञान’ हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कार्यक्रम सादर केला. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या कामाचा परिचय अंनिस, पुणेचे कार्याध्यक्ष अनिल वेल्हाळ यांनी करून दिला. पुणे शाखेचे अध्यक्ष वसंत कदम यांनी सूत्रसंचालन केले. ‘अंनिस’चे ट्रस्टी दीपक गिरमे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. या वेळी अंनिस राज्य कार्यकारिणीचे वरिष्ठ सदस्य श्रीपाल ललवाणी, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव हे उपस्थित होते.

श्रीपाल ललवाणी, पुणे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]