अंनिस शहादाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

रवींद्र पाटील -

‘कोविड-19’ या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शहादा येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व तालुका प्रशासन यांच्या संयुक्तपणे ‘मी कोविड योद्धा, मी रक्तदाता’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

‘कोविड-19’ आजाराच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील विविध सामाजिक संघटना सेवा आणि मदतकार्य करीत आहेत. त्यास तालुका प्रशासन प्रोत्साहन देत सहभागी होत आहे.

केवळ समाजमाध्यमांचे आवाहन आणि प्रत्यक्ष फोन संपर्क साधून 41 रक्तदात्यांनी प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला.

आजच्या कार्यक्रमात येथील प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, ‘महाराष्ट्र अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शशांक कुलकर्णी सर, शहादा शाखाप्रमुख डॉ. बी. डी. दादा, सुनीता पटेल, ज्येष्ठ नागरिक संघाचे डी. एच. आप्पा पाटील, सेवा दलाचे राज्य मंडळ सदस्य कैलास भावसार, विचारधारा फौंडेशनचे तात्याजी पवार, रवींद्र पवार, सेवा दलाचे कार्याध्यक्ष मानक चौधरी, प्रगतिशील शेतकरी व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे किशोर नरोत्तम पाटील, जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष भूषण बाविस्कर, सामाजिक कार्यकर्ते लियाकत अली सय्यद, डॉ. खलील शाह आदी मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरासाठी ‘अंनिस’च्या तरुण कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. शहादा शाखेचे कार्याध्यक्ष संतोष महाजन, प्रधान सचिव आरिफ मणियार, धीरज पाटील, हितेश ईशी, खंडू घोडे, धीरज शिरसाठ, राहुल गवळे, हिंमत चव्हाण, प्रदीप केदारे सर, हेमंत बोरसे, अशोक पाटील, श्रीकांत बाविस्कर, विनायक सावळे, भटू वाकडे, जयेश केदारे यांनी परिश्रम घेतले. शहादा ब्लड बँकेचे डॉ. नाजीम तेली व त्यांच्या सर्व कर्मचारी वृंदाने नियोजन केले.

रवींद्र पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंनिस, नंदुरबार


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]