-
कोल्हापूर येथील प्रकाश बिल्डरचे बापूसाहेब पाटील ऊर्फ बी. वाय. पाटील यांचे निधन झाले. पर्यावरणप्रेमी, नदी प्रदूषणमुक्तीमध्ये भाग घेणारे कार्यकर्ते असणारे आर्किटेक्ट सुनील पाटील यांचे ते वडील. वडिलांच्या रक्षाविसर्जनादिवशी मूठभर रक्षा कुंडामध्ये, उर्वरित सर्व रक्षा बंगल्याच्या आवारात असलेल्या बागेमध्ये वृक्षारोपण करत पसरली. बागेतील मातीमध्ये रक्षा सोडत पर्यावरण, नदी प्रदूषणमुक्तीचा वेगळा संदेश समाजाला दिला. रक्षाविसर्जनामुळे नदी प्रदूषित होते, म्हणून वडिलांच्या मृत्यूनंतर रक्षा पाण्यात न सोडता बागेमध्ये वृक्षारोपण करत पसरून टाकली. श्रीमती अंजना पाटील, डॉ. राजेश्वरी पाटील, संजय, अरुण, प्रकाश, अशोक, नातवंडे असे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. सर्वांनी वृक्षारोपणामध्ये सहभागी होत वेगळा संदेश दिला.