जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी घेतला मोकळा श्वास

निशा व सचिन -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दहिसर शाखेतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी निवासी शिबिराचे आयोजन केले होते. स्वतःला वेळच न देणार्‍या, नोकरी व कुटुंब यात कसरत करत स्वतःला मात्र विसरून गेलेल्या महिलांनी किमान दोन दिवस तरी सगळ्या जबाबदर्‍यांना विसरून फक्त स्वतःसाठी जगावं, हा या शिबिराचा हेतू होता. हे शिबिर पालघर जिल्ह्यातील कुरझे गावानजीक असणार्‍या सुगंधा फार्म मध्ये होते, जिथे शहरातील गजबज, गोंधळ, प्रदूषण या सर्वांपासून मुक्त असणारे, हिरव्यागार झाडांच्या सान्निध्यात इतर कुठला साधा आवाजही येऊ शकणार नाही; इतकेच काय, मोबाईल नावाचा सर्वांत मोठा डिस्टर्बन्स सुद्धा जिथे डिस्टर्ब करू शकणार नाही, असे निसर्गरम्य वातावरण होते. कार्यक्रमाचे उद्घाटन हे सर्वांनी नैसर्गिक रंग वापरून आपल्या हातांचे ठसे देत कलरफुल झाड तयार करून झाले.

या दोन दिवसीय शिबिरात महिलांसाठी गाणी, गप्पा, डान्स यासोबतच विस्मरणात जायला लागलेले गावाकडचे मैदानी खेळ सुद्धा होते. लिंग समभाव या विषयावर आरती व महेंद्र नाईक यांनी घेतलेले डोळे उघडणारे व स्त्रीला तिच्या स्त्रीत्वाची ओळख करून देणारे सत्र, ’सेल्फ डिफेन्स’ संबंधी अनुप देठे यांनी घेतलेले प्रॅक्टिकल सहित महिला अत्याचारांकडे बघण्याची दृष्टीच बदलणारे सत्र, जगदीश (जे. डी. ) यांनी घेतलेला पहाटेच्या थंडीत सर्वांमध्ये उत्साह आणणारा झुंबा डान्स आणि त्यानंतर स्त्रियांच्या आरोग्याविषयी जाणीव करून देणारे ’आरोग्यभान’ हे सत्र सुद्धा होते. तसेच बैलगाडीतून सफर करण्याची दुर्मिळ होत चाललेली संधी सर्वांना मिळाली. नदीत मनसोक्त डुंबण्याची मुभा होती. सर्वांसोबत मनमोकळ्या गप्पा मारता येत होत्या आणि हे सगळं करत असताना घर, कुटुंब, मुलं यांची चिंता सतावत नव्हती; शिवाय आदिवासी महिलांनी ’तारपा’ नृत्य शिकवले व सर्वच महिलांनी याचा ठेका धरला. शिबिराच्या शेवटी महिलांनी व्यक्त केलेल्या एकेक भावना आम्हाला बळ देणार्‍या होत्या. कित्येक वर्षांनतर पहिल्यांदा काहीही काम न करता दोन दिवस फक्त मजा करण्याची संधी मिळाली, ’ असं सहभागी गृहिणी सांगत होत्या. ’लहानपणी घराजवळ नदी असून पण कधी नदीत मनसोक्त डुंबता आलं नाही. नंतर पण कधीच तशी संधी मिळाली नाही, पण इथं खर्‍या अर्थाने मनासारखं जगायची संधी मिळाली,’ असंही एका महिलेने सांगितले. कुटुंबातील किंवा वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींमुळे ’डिप्रेशन’मध्ये गेलेल्या महिला जेव्हा ’इथं आल्यावर पुन्हा नवी उमेद आल्यासारखं वाटतंय, ’ असं सांगत होत्या, तेव्हा सर्वांनाच भरून येत होतं आणि अशा मोकळ्या श्वासाची किती गरज आहे, हे लक्षात येत होतं. लहान मुलांना सोबत घेऊन आलेल्या महिला सांगत होत्या की, ’आमच्याशिवाय पण आमची मुलं राहू शकतात आणि अगदी दोन दिवस आम्हाला त्यांचं खाणं-पिणं काहीच करावं लागत नाही, त्यांची कसलीही काळजी न करता आम्ही मोकळं जगू शकतो, हा अनुभवच आमच्यासाठी खूप विशेष होता.’ ज्या महिला लहान मुलांना घरी ठेवून येऊ शकत नाहीत, अशा महिलांना या दोन दिवसांत मुलांमध्ये गुंतावं लागू नये, म्हणून महाराष्ट्र अंनिसच्या दहिसर शाखेतील कार्यकर्त्यांनी पुरुष कार्यकर्त्यांची एक टीम बनवली होती. त्यामध्ये कृष्णा गारखेडे, नीलेश फडतरे, मनोज डोमे, अमित कदम, गणेश सोनवणे हे कार्यकर्ते होते. त्यांनी दोन दिवस दिवसभर या मुलांचे खाणे-पिणे, खेळवणे, झोपवणे अशा सर्व जबाबदार्‍या त्यांनी पार पाडल्या. त्यामुळेच या महिला खर्‍या अर्थाने मोकळा श्वास घेऊ शकल्या.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]