श्रद्धा आणि ज्ञान यांच्यात मोठे द्वंद्व

-

डॉ.शरद बावीस्कर (जेएनयु दिल्लीचे प्राध्यापक)

सन्मानीय विचारमंच आणि समविचारी मित्र, आपल्या सर्वाचे आभार, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात.

आज आपण डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शहादत दिवशी त्यांची आठवण काढतोय…

खरंतर आज मी अंनिसच्या विरोधात बोलणार आहे असं ठरवलं आहे. पाहिली गोष्ट अशी की हमीदने मला खूप शॉर्ट नोटिसवर बोलवलं आणि दुसरी गोष्ट संकेताप्रमाणे पुस्तक प्रकाशन सोहळा जो असतो, त्यात पुस्तकांविषयी मांडणी करावी लागते.

सगळं काही व्यवस्थित चालू आहे, आपली ट्रिलियन इकॉनामी आहे, आपल्याला खरंच अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज आहे का? सगळं काही किती सुरळीत चालू आहे. उदाहरण देतो.  मी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती एक मिश्किल पोस्ट केली होती. आपला समाज किती मजबूत आहे, किती भक्कम पायावरती उभा आहे याचं ते ठळक उदाहरण आहे. जेएनयूमध्ये  उपराष्ट्रपती धनखड आले होते. ते आले आणि सात दिवसांत पाय उतार झाले. जेएनयूमध्ये पुढील एक दोन आठवड्यात मराठी अध्यासनाच्या भूमी पूजनासाठी आपले मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री येणार होते. हे भूमी पूजन कायद्याने बंद करायला पाहिजेत. कारण हे कितीदा भूमी पूजन करतात! गोष्ट अस्तित्वात येत नाही. पण हे वर्षानुवर्षे आता ती मराठी चेअर आहे ती वीसपंचवीस वर्षापासून फाइलमध्ये बंद आहे. कितीदा तरी तिथे मंत्री येऊन गेले आहेत. तर मी एक मिश्किल पोस्ट टाकली. जो कोणी जेएनयूमध्ये येतो त्याला उतरती कळा लागते. हा प्रवास इंदिरा गांधींपासून सुरू झालेला आहे. १९७५ मध्ये  त्यांनी आणीबाणीच्या दरम्यान प्रयत्न केला तर नंतर निवडणुकीमध्ये हारल्या. धनखड आले पाय उतार झाले. तर ही पोस्ट किती मिश्किल होती विचार करा. आपल्या देशात विनोद बुद्धीला जागा नाही. तर आपल्यातील कोणी तरी मेन स्ट्रीमच्या पत्रकाराने ही बातमी करून टाकली. आपले मित्र प्रशांत कदम यांनी मला ती फॉरवर्ड केली. नंतर मला सांगण्यात आलं की आपले कामाख्या देवी मानणारे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी ती वाचून, मला पण बाबा उतरती कळा लागेल म्हणून ते जेएनयूमध्ये आलेच नाहीत.  हजारो करोडोची जरी संपत्ती असेल तरी आम्ही एवढे तकलादू आहोत.  हा एक जोक आहे. आणि मी खाली तळटीप दिली होती की अंधश्रद्धा वाईट असते आणि ही अंधश्रद्धा आहे. म्हणजे मला विनोदाला पण सबटायटल द्यावे लागते की हा विनोद आहे म्हणून! सुरुवात इथून आहे.

अहो, आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलनाची गरजच नाही एवढा भक्कम समाज आहे हा!  म्हणजे तुळशीपत्र लावा पास होऊन जा,  राफेलचं विमान घेण्यासाठी तुम्ही हजारो करोडो फ्रान्सला द्या आणि लिंबूमिरची बांधा. हे ट्रम्पचे मंदिर बनवत आहेत! अशा समाजात खरंच अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज आहे का?

खरं तर महत्वाचा मुद्दा आहे आणि मी थोडी तात्विक मांडणी करणार आहे. सध्या मी लोकसत्तामध्ये तत्वाज्ञानावर लिहितो आहे, तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. काही म्हणतात की हे काय चालू आहे? फार दुर्बोध आहे, डोक्याचा भुगा होतो आहे वगैरे वगैरे. त्यांना माझं जे पुस्तक आहे ते सोपं वाटतं. त्यांना त्या पुस्तकातील एक धागा कळत असावा असं मला वाटतं. मी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचं साहित्य वाचलं. हा माझा अंनिस सोबत दुसरा  कार्यक्रम आहे. आपला आधीचा कार्यक्रम होता त्यावेळी हमीदने मला काही पुस्तकं दिली, ती वाचली. तर अंनिसच्या कामामध्ये कुठेतरी समाजात गैरप्रकार दिसतोय म्हणून तेवढा हस्तक्षेप नव्हता तर त्याला एक सैद्धांतिक बैठक होती. आणि कुठलेही प्रबोधन जे असतं ते फक्त उत्साहाने चालत नाही तर त्याला एक मजबूत आणि सैद्धांतिक बैठक लागते, जी डॉ. दाभोलकर यांच्याकडे होती. कुठलीही सैद्धांतिक बैठक असते ती वेसारींळल नसते, ती परिवर्तनशील असते. आधार आपण शोधत जातो.

अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये श्रद्धा हा शब्द आहे. त्याच्याकडे आपण कसे पाहतो? मला दोन आठवड्यापूर्वी सुरेश द्वादशीवार यांनी फोन केला, जे वयस्कर सत्तरी, ऐंशीतील आहेत. ते तत्वज्ञान वाचत आहेत आणि तरुण मंडळी आहेत ती काही वाचत नाही आहेत, ती स्क्रोल करत आहेत. तर ते मला म्हणाले मी एक प्रस्तावना लिहितो आहे. श्रद्धा आणि ज्ञान यांच्यातील जे द्वंद्वं आहे ते क्रीडांगण आहे की रणांगण आहे याविषयी त्यांनी माझ्याशी चर्चा केली.

आपण श्रद्धेकडे कसे पाहतो? युरोपमध्ये पश्चात देशामध्ये डिबेट कशी राहिली आहे? त्यांची ५००-६०० वर्षांची ज्ञानपरंपरा कशी राहिली आहे? त्या तुलनेने आपण कुठे आहोत? ते राफेल बनवतात तर आपण लिंबू मिरच्या का बांधतो? असे विवेकी प्रश्न आपल्याला पडू शकतात.

श्रद्धा हा शब्द आहे तो तर आधी आपल्याला स्पष्ट असायला पाहिजे!  श्रद्धा आणि ज्ञान हे दोन वेगळे ट्रॅक आहेत, हे दोन पूर्णतः वेगळे ट्रॅक आहेत. श्रद्धा जेव्हा ज्ञानाचा दावा करते तेव्हा द्वंद्वात्मक संबंध तयार होतो. वातावरण तयार होते. जो मनोव्यापार चालतो.. मनोव्यापाराचं उदाहरण दिलं की आपण किती जरी म्हणू की फार क्षमता आहे आपल्यामध्ये, आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन वापरतो.. तरी आपल्यावर थोडं जरी संकट आलं की बुद्धिवाद गळून पडतो. आपण सगळे कार्यकारणभावानुसार जगतो. फक्त जो कार्यकारणभाव वापरतो त्याला अधिष्ठान चुकीचे असते. आपण शिकत होतो की पृथ्वी स्थितीशील आहे आणि सूर्य गतिशील आहे. आपण हा कार्यकारणभाव शोधलाच होता. माणसाला जगण्यासाठी काहीतरी स्पष्टीकरणं लागतात, मग ती चुकीची का असेना!

मग श्रद्धा म्हणजे नेमकं काय? त्याविषयी आपल्याला किती स्पष्टता आहे? कारण बर्‍याचदा आपण दुसर्‍या टोकाची भूमिका घेतो की सगळं आपल्याला कॉजल प्रिन्सिपल (Causal Principal) मध्ये उलगडता येईल. ती आपली सदोष मांडणी आहे. कारण जर तुम्ही सर्व काही कार्यकारणभावाच्या तत्वाने उलगडता येईल असे मानले तर स्वातंत्र्याची संकल्पना बाद होते. स्वातंत्र्याची संकल्पना कुठे लागू होते? जिथे दोन, तीन असे निवडीचे पर्याय असतात, अशी परिस्थिती असते. सगळे आपल्याला तेवढेच बरोबर दिसतात व त्यातील एकाची आपल्याला निवड करावी लागते. स्वातंत्र्याचं हे तत्व लागू होतं आणि जिथे एकच शक्यता असते आणि ती अनिवार्य असते ते वैज्ञानिक दृष्टिकोनात बसते. अठराव्या शतकातील डिबेट आहे. कांट याने चर्चा केलेली आहे. आपल्याला अज्ञात आणि अज्ञेयमध्ये फरक करावा लागेल. म्हणजे अननोन आणि अननोएबल. (unknown and unknowable) जे अज्ञात असतं त्याचा आपल्याला कार्यकारणभावाने उलगडा लागू शकतो. जे अज्ञेय असतं ते आपल्या चौकटीत बसत नाही. तो श्रद्धेचा प्रांत असतो. म्हणून धर्मश्रद्धा वगैरे ह्या गोष्टी सरळ सरळ चुकीच्या ठरत नाहीत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने त्याचा अर्थ लावणे म्हणजे तुम्ही दोन वेगळे पॅराडाईम कोलॅप्स करत आहात. हे डिबेट अठराव्या शतकात स्पष्ट झालेले आहे. म्हणून तिकडे जी मॅक्स वेबरची परंपरा आहे की जो मुद्दा मी आपल्या आधीच्या कार्यक्रमात पण मांडला होता. म्हणून श्रद्धा व ज्ञानात द्वंद्वं हे श्रद्धा जेंव्हा ज्ञानव्यवहारावर अतिक्रमण करते तेंव्हा निर्माण होते. कारण श्रद्धेचा दावा ज्ञानाचा नसतोच. श्रद्धा अज्ञेय आहे. पण मला कशावर तरी विश्वास ठेवावा लागेल. म्हणजे अज्ञेयत्व आहे तेथे कार्यकारणभाव काम करणार नाही. आणि Thankfully that everything is not explainable in casual principle, otherwise it will end up the very principle of liberty म्हणजे जर सगळंच कार्यकारणभावानुसार उलगडत जाईल, तर आपल्याकडे स्वातंत्र्य नसेल. स्वातंत्र्याचा अर्थ असा आहे की चार-पाच सारख्याच वैध शक्यता आहेत, त्यांच्यापैकी एक मला निवडायची आहे. विज्ञानात हे असं असू शकतं का? ज्या गोष्टी कार्यकारणभावानुसार उलगडत जातात तिथे आपण असं म्हणू शकत नाही की चार पाच शक्यता, चारी महत्वाच्या वाटत आहेत. त्यापैकी मी एक निवड करणार आहे. म्हणून इमॅन्युएल कांटने ‘क्रिटीक ऑफ प्युअर रिजन’ आणि ‘क्रिटिक ऑफ प्रॅक्टिकल रिजन’ हे दोन वेगळे ग्रंथ लिहिले आहेत. कारण त्याला स्वातंत्र्य वाचवायचं होतं. आपण जर सगळा मनोव्यापार वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या नावे कार्यकारणभावात कोंबत असू, तर आपल्याला संविधानामधून स्वातंत्र्याचं तत्व काढून घ्यावे लागेल. मुक्ताने अंनिसच्या अघोरी अंधश्रद्धांबाबतच्या कामाबद्दलच्या ज्या गोष्टी मांडल्या. ज्या क्रिमिनल आहेत. आउट राइट क्रिमिनल आहेत तिथे तर डीबेटची पण गरज नाही. तिथे तर शासनानेच कुठल्याही सभ्य समाजात ती  अ‍ॅक्शन घेतली पाहिजे. म्हणजे अंधश्रद्धेचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांची जर तुम्ही विभागणी केली तर काही गोष्टी आहेत की त्याला डिबेटची पण गरज नाही. थोडं जरी त्या समाजात समाजमन चिकित्सक बनलेलं असलं तर! आपलं समाजमन खरोखरच चिकित्सक बनलेले आहे का? त्याच्यासाठी आपल्याला दुसरी संकल्पना आहे राजकीय तत्वज्ञानाची तिच्याकडे यावं लागेल. 

बॉडी पॉलिटिक नावाची गोष्ट असते. बॉडी पॉलिटिक म्हणजे समाज जसा नागरिकांनी बनलेला आहे, व्यक्तींनी बनलेला असतो, त्या व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक जीवनात वेगवेगळ्या असतात पण काही महत्वाचे प्रश्न, मुद्दे असतात की त्या सगळ्या व्यक्ती एकत्र येऊन जसं एकसंध शरीर निर्माण होतं, ज्याला आपण बॉडी पॉलिटिक म्हणतो. आपल्या समाजात असे कुठले मुद्दे आहेत तिथे आपल्या समाजात आक्रोश दिसतो? समाजात लोकांना तळमळ वाटते? त्यावरून तो समाज मध्ययुगीन आहे की मागासलेला आहे, सभ्य आहे की असभ्य आहे हे आपण ठरवू शकतो. जे महत्वाचे मुद्दे आहेत, जे न्यायाचे मुद्दे आहेत त्या मुद्यावरती आपल्या समाजात उदासीनता जाणवते आणि काहीतरी निरर्थक गोष्टींमध्ये तुम्हाला गल्लोगल्ली मोर्चे दिसतील. याचा अर्थ आपली बॉडी पॉलिटिक आहे ती संविधानाशी सुसंगत नाही. It’s not in sync with the constitution. मॅडम कमिशनर यांनी तोच मुद्दा उपस्थित केला. राज्यसंस्था आणि समाज. कोणी म्हणेल राज्यसंस्था हे समाजाचे प्रतिबिंब असते किंवा समाज हे राज्यसंस्थेचे प्रतिबिंब असते पण खरं नातं हे इंटरमिडियरी ज्या बॉडीज असतात त्या कशा आहेत त्यावर अवलंबून असतं. म्हणजे आपल्या समाजात राज्यसंस्था बदलत गेलेल्या आहेत. कधी मुघलशाही तर कधी वसाहतवादी. त्याचा आणि समाजाचा संबंध येऊ दिला नाही एवढी काळजी इंटरमिडियरी रिग्रेसिव्ह फोर्सेसनी घेतलेली आहे. ज्याचा सामना सरळ सरळ विवेकवादी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी होता. तिथे मग जे पुरोगामी विचार करणारे आहेत, त्यांच्या ज्या चळवळी आहेत. महाराष्ट्रात काही प्रमाणात त्या यशस्वी झाल्या. उत्तर भारतात त्या दिसत नाही म्हणून तिथं गौरी लंकेश किंवा डॉ. नरेंद्र दाभोलकरसारखे प्रकार दिसत नाहीत. कारण तिथं अशा संविधानवादी, ज्ञानवादी चळवळी होताना दिसत नाहीत. २४ वर्षांपासून मी उत्तर भारतात राहतोय. तर इंटरमिडियरी बॉडीज… शैक्षणिक घ्या, जी शैक्षणिक व्यवस्था चिकित्सक बुद्धी घडवायला अगदी तकलादू आहे आणि या शैक्षणिक संस्था कोणाच्या हातात होत्या आत्तापर्यंत? जे सत्तेसाठी आता दरदर भटकत आहेत त्यांच्याच हातात होत्या. शिक्षण काय भानगड आहे ते मला महाराष्ट्राच्या बाहेर केंद्रीय विद्यापीठात गेल्यावर लक्षात आलं की हे शिक्षण आहे! फ्रान्समध्ये गेल्यावर हे लक्षात आलं की शिक्षणाच्या नावावर आपल्याकडे काहीच होत नाहीये. म्हणजे आपली शैक्षणिक व्यवस्था जी आहे ती कुचकामी आहे. जर शिक्षण व्यवस्थित असेल तर किती कॉमन सेन्सची गोष्ट आहे, की श्रद्धा तुझ्या घरी. आता मी धुळ्याला गेलो बहिणीकडे, दिवसरात्र प्रत्येक गल्लीमध्ये जोरात काहीतरी चालू आहे. तर तिथे शेजारी विद्यार्थी कसा काय अभ्यास करेल? म्हणजे दिवसरात्र चालू आहे कारण हे गेले, ते गेले आणि मग मुद्दा येतो की कुठलीही चिकित्सा केली की त्याचा सरळ सरळ अर्थ होतो की हे आमच्या धर्माचा द्वेष करतात. म्हणजे मी काही जरी बोललो तरी. म्हणून मी बोलतो खरंतर. काही जरी बोललो तरी जे मारेकरी असतात त्यांना तर बुद्धी नाही. त्यांची बुद्धी आधीच काढून घेतलेली असते. म्हणजे अंधश्रद्धामध्ये फक्त आस्थेचे प्रश्न नाहीये. अंधश्रद्धामध्ये फक्त धर्मिकतेचा प्रश्न नाही. त्याच्यात राजकारण, अर्थकारण हितसंबंध जुडलेले आहेत. जोपर्यंत हितसंबंध धोक्यात येत नाही तुम्ही कितीही काही केलं तरी तुमच्यावर कोणीही वार करणार नाही. सोपी गोष्ट आहे.

श्रद्धेचा दावाच नसतो ज्ञानाचा. म्हणजे श्रद्धा जी आपल्याला पुढे जाऊ देत नाही. बेसिक ज्ञान व्यवहारात ती बाधा ठरते. श्रद्धा पूर्णपणे बाद होणारच नाही कारण त्याच्यात मग We are inviting some backlash. आपल्याला त्या श्रद्धेचं साहित्य समजून घ्यावं लागेल. तिचा प्रांत समजून घ्यावा लागेल. आपण काळजीपूर्वक श्रद्धा आणि ज्ञानामध्ये द्वंद्वं होणार नाही ही काळजी घेतली पाहिजे. जेव्हा श्रद्धा स्पष्टपणे ज्ञानाचा बुरखा घेते तेव्हा ती अनिष्ट प्रथा आहे. आपण त्यादृष्टीने श्रद्धावान आहोत. मी तर म्हणतो जे आहेत तुळशीपत्र लावणारे ते अधर्मी लोक आहेत. ज्यांचे राजकीय हितसंबंध आहेत तेच प्रोत्साहन देत आहेत. तेच यांच्या आरत्या ओवाळत आहेत. एखाद्या माणसाला कळत की कोणाच्या मनात काय चालू आहे मग त्याचा इंडियन सर्व्हिसेसमध्ये वापर का करत नाही? त्यांना कळत आहे की सगळी लबाडी आहे. म्हणून समाजमनाला सरळ सरळ जबाबदार ठरवणं बरोबर नाही. समाजमन हे प्रचंड लवचिक असतं. राज्यसंस्था आणि समाजमन यांच्यात मध्यस्थी करणार्‍या गोष्टी आहेत त्या जबाबदार आहेत. 

आपण म्हणतो की भारतीय समाज काय बरोबर नाही. मी तर म्हणतो की आपल्या बर्‍याच पुरोगामी मित्रांमध्ये प्रॉब्लेम आहे की कार्यक्रम अटेंड केला की दोन तीन दिवस माणूस डिप्रेशनमधे जातो. That’s not what we called enlightenment… त्याच्यामुळे मग कुठल्याही पुरोगामी कार्यक्रमामध्ये दहा बारा पंचवीस लोक येतात आणि तरुण अजिबातच येत नाहीत. त्याच्यामध्ये एवढं निरस टोनमध्ये बोलतो. आता काही खरं नाही आपलं, आता गेलो आपण. हा जो अंडरटोन असतो.. म्हणजे जे मुद्दे मांडायचे आहेत ते मांडायला पाहिजेत, पण त्याच्यातलं जे राजकीय कम्युनिकेशन म्हणतो तिथे आपण कमी पडतो. म्हणून प्रामाणिकपणे काम जरी करत असू तरी वाट Gramaschi called optimism of will that we lack आणि तो उत्साह निर्माण करण्याची क्षमता नसते. म्हणून पुरोमागी लोकांविषयी असं बोललं जातं की ते डिप्रेस करतात… ती उत्साह निर्माण करण्याची क्षमता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यात होती. He could connect to anybody and from any walk of social life. त्यांच्यातील जी राजकीय कम्युनिकेशनची क्षमता होती, त्यांच्यातील जी स्पष्टता होती त्यामुळे ते कुठल्याही क्षेत्रातील व्यक्तीसोबत अर्थपूर्ण संवाद करू शकत. ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात ते आले होते त्यांच्याशी त्यांचे मतभेदसुद्धा झालेले आहेत आणि त्यांनी ते मतभेद मान्यसुद्धा केलेले आहेत. आता जमिनीवर काम करणारे जे आहेत. त्यांना कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागतो?  ते बोलके सुधारक नव्हते.  काही न करता, ते इथं कमी पडले, ते तिथे कमी पडलं असं बोलणं फार सोपं असतं. पण हा जो त्यांनी परिवार उभा केलेला आहे, त्यांच्या प्रेमापोटी तुम्ही एवढ्या संख्येने आलेले आहात. We must acknowledge that.  He had  what we called political communication not just intellectual clarity. फक्त बौद्धिक स्पष्टता असणं हे पुरेसं नसतं.

मी आता आठ महिन्यांपासून दैनिक लोकसत्तामध्ये तत्वज्ञानावर लेखमाला चालवतो आहे. आपल्याकडे सैद्धांतिक मंडणीचं वावडं आहे. आपल्याकडे वैश्विक अकॅडमीमध्ये जो ज्ञानव्यवहार चालू आहे तिथपर्यंत मजल जात नाही आहे. मराठी विचारविश्वात.

सदोष मांडणी आपल्याला बर्‍याचदा चुकीच्या रस्त्याने घेऊन जाते. अंधश्रद्धेचा प्रश्न हा फक्त राजकरणाचा प्रश्न नाहीये. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात हमीद आहे, रेश्मा कचरे आहेत. मानसिक आरोग्याचा पण हा मुद्दा आहे म्हणून जी संवेदनशीलता लागते ती संवेदनशीलता तेव्हाच शक्य आहे जेव्हा एकारलेल्या पद्धतीने आपण अंधश्रद्धेकडे पाहूच शकत नाही. याला इतिहास आहे, बर्‍याच गोष्टी आहेत म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर हे कधीही कोणावर नैतिक ठपका ठेवत नव्हते. आणि त्यांच्यात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याची, त्यांच्याशी नाळ जोडण्याची क्षमता होती. ती फार महत्वाची आहे. डॉ. दाभोलकर यांचे साहित्य मी वाचलं आहे. अंनिसची रचना कशी आहे? Intellectual wing काय आहेत? त्याच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न मी करत होतो. की याची रचना कशी आहे? याचा विस्तार कसा आहे? म्हणून मी अरविंद पाखलेजींना पण विचारलं. याचे राज्य पातळीवर कसे कार्यक्रम होतात? जिल्हा पातळीवर कसे कार्यक्रम होतात? कारण राजकीय तत्वज्ञानाचा प्राध्यापक असल्यामुळे माझ्यासाठी हे फार महत्वाचे विषय आहेत. तर सांगायचा मुद्दा हा आहे की, श्रद्धा आणि ज्ञान हे क्रीडांगण असले पाहिजे, रणांगण नाही. ते कसं करता येईल? तुम्ही श्रद्धा बाद करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला मॅक्स वेबर वाचावा लागेल. त्याने प्रिन्सिपल ऑफ रिलिजिऑसिटी हा मुद्दा मांडला होता. कारण बर्‍याच गोष्टी ज्या असतात त्यांना Irrational नाही म्हणत, त्याला Non Rational म्हटलं जातं. तोच तर साहित्याचा प्रश्न आहे, संगीताचा प्रश्न आहे, सौंदर्याचा प्रश्न आहे, मैत्रीचा प्रश्न आहे. तिथे कोणतं कॉजल प्रिन्सिपल आणणार आहेत?  आणि मानवी व्यवहार जो आहे तो या प्रांतामध्ये अफाट आहे, अमर्याद आहे. अननोएबेलिटीही (Unknowability) आहे.  

वैज्ञानिक क्षेत्रात पण मानण्यात येतं की, जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो विनम्र असतो. वैज्ञानिक दृष्टिकोन दावाच करत नाही की त्या पॅराडाईमच्या पलीकडे त्याला कळत आहे म्हणून. अज्ञात जे आहे तो प्रांत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आहे पण अज्ञेय हा नाही. बर्‍यापैकी साहित्य निर्मिती होते अंनिसच्या विचार मंचावर, ती साहित्य निर्मिती परत परत अपडेट झाली पाहिजे. एका बाजूला तुम्ही पाहत आहात की मुख्यमंत्री अशा लोकांचा जयजयकार करत आहेत जे अतिशय स्पष्टपणे बुद्धीविरोधी मानसिकतेचा पुरस्कार करत आहेत. आपल्यासारख्या लोकांनी महाराष्ट्र काही प्रमाणात वाचवून ठेवला आहे. पण एवढी मोठी लाट आहे ती वरुन येणारी, तिची क्षमता एवढी आहे की It’s very difficult to हा जो काळ आहे तो फार कठीण काळ आहे. म्हणजे खरंतर आपल्या बाजूने कुठलीही यंत्रणा नाही. मॅडम कमिशनर म्हणत होत्या की executive बॉडीला स्वायत्तता दिली पाहिजे. अशी परिस्थिती आहे की ज्या स्वायत्त गोष्टी आहेत, जेएनयू तिथेच हस्तक्षेप चालू आहे… तटस्थ हा पण पर्याय नाहीये आजच्या परिस्थितीत. कोणी जर म्हणाले मी तटस्थ आहे तरी पण तुम्हाला पुढच्या वर्षी तिकीट मिळणारच नाही. तटस्थ हा पर्यायच नाही. इसमे सब हिस्सेदार है| इकडे नाहीतर तिकडे. ही जी मधली अवस्था आहे ती कोणालाच नाहीये. कोणाला जर वाटत असेल आपण गप्प बसू. इकडे ही नाही तिकडे ही नाही. जेव्हा जेएनयूचा नंबर आला तेव्हा सब चूप थे, सब नही मगर बहुत सारे चूप थे| नंतर शेतकर्‍यांच्या नंबर आला, त्याच्या नंतर आर्मी जवानांचा नंबर आला असं करत करत सबका नंबर आयेगा| म्हणून आधीपासूनच आपला नैतिक कणा आहे, बौद्धिक कणा आहे तो शाबूत ठेवला पाहिजे. नाहीतर मग तिथे बसून शेण खाण्याची मानसिकता असली पाहिजे. मधला पर्यायच नाही.  तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल. ती भूमिका तिकडची असू द्या किंवा इकडची असू द्या.

याच मंचावरून मी माझे थोर मित्र डॉ शंतनू अभ्यंकर यांना आदरांजली अर्पण करतो. मी त्यांना एकदाच भेटलो. त्यांना त्यांचे आयुष्य समोर दिसत होतं. पण काय त्यांचा जिवंतपणा!…  आपण पावलो पावली मरत असतो त्याची काही चिंता नसते आपल्याला. मी स्टॉईक तत्वज्ञानाविषयी एक टिप्पणी केली की, मृत्यूचे निरनिराळे प्रकार असतात. आपला नैतिक मृत्यू होतो, आपला बौद्धिक मृत्यू होतो, आपला सामाजिक मृत्यू होतो. त्याचा ताण असायला पाहिजे, कुठेतरी आपला शारीरिक श्वास थांबणार आहे त्याचा ताण आपण घेऊन बसलो आहोत. ज्या लोकांमध्ये विवेकी स्पष्टता असते ते या गोष्टींकडे अतिशय निर्भयपणे पाहतात. ते मला डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्यामध्ये दिसले. कारण ती बैठक आहे. नाहीतर आपला थातुरमातुर बुद्धिवाद गळून पडतो. जे तथाकथित पुरोगामी सत्तेत होते, त्यांना मी तथाकथितच म्हणतो. त्यांनी अपरिमित नुकसान केलं आहे. त्यांनी इंटरमिडिअरी बॉडीजला सक्षम केलं नाही… जेएनयूच्या लोकांना स्पष्टता असल्यामुळे ते आम्हाला प्रश्न विचारतात. अहो, तुम्ही मास्तर मग तुम्ही असं कसं काय बोलता? अरे आम्ही मास्तर आहोत.. पण मास्तर लोकांचा धर्म जो असतो तो सत्यानुनय आहे, सत्तानुनय नाहीये. सत्तानुनय पण आहे आता मास्तर लोकांचा. नाही नाही तुम्ही आता असं काही बोलू नका, प्रिन्सिपल बनवतो तुम्हाला, डीन बनवतो तुम्हाला, गाजर दाखवण्याचे प्रकार प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आहे. पण तुम्ही एक सिटिजन म्हणून पण आहात त्या परिस्थितीमध्ये. तुमची भूमिका महत्वाची आहे. तर माझ्या म्हणण्यातील मुद्दा असा आहे की श्रद्धा, ज्ञान याच्याविषयी स्पष्टता अंनिसमध्ये नक्कीच असली पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणात आहे. फक्त हाच देश नाही जिथे अंधश्रद्धा आहे. १६ व्या शतकापर्यंत कॅथलिक चर्चचे कसं असायचं माहीत आहे का? रविवारची मोठी प्रार्थना असते, शनिवारी कोणी शारीरिक संबंध ठेवला तर पोरगं अपंग ठरेल किंवा पापाची अपत्य ठरेल अशी भावना होती. म्हणून कोणी अशी चूक केली तर पैसे द्यावे लागायचे. तो पण समाज अशा परिस्थितीतून गेलेला आहे. पण तिथे लुथर होऊन गेलेले आहेत, तिथे रुसो होऊन गेलेले आहेत, व्होल्टेअर होऊन गेलेले आहेत, तिथे ती सलगता आहे पाचशे वर्षांची आणि त्या दृष्टीने महाराष्ट्राला तेवढे आहे की १९ व्या शतकापासून आपल्याकडे पण ती परंपरा उभी राहिली आणि काही प्रमाणात भक्ती परंपरेत पण तो विद्रोह दिसतो. त्या दृष्टीने महाराष्ट्र वेगळा ठरतो. मला खात्री आहे की चोरी झालेली आहे. महाराष्ट्रात असं होऊच शकत नाही कारण वातावरण तसं नव्हतं. मला खात्री आहे की महाराष्ट्रात चोरी झालेली आहे. पण महाराष्ट्र आळशी आहे. बिहार आळशी नाही आहे.

शब्दांकन : सौरभ बागडे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ]