-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा इस्लामपूरचे कार्याध्यक्ष कॅप्टन डॉ. एस. के. माने यांच्या ‘कलाविष्कार’ या वास्तूचा गृहप्रवेश समारंभ काही महिन्यांपूर्वी कोणतेही कर्मकांड, सत्यनारायण पूजा व विधी न करता शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून पार पडला. यातून बचत झालेली रकम रुपये १० हजार देणगी म्हणून त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देण्याचा अतिशय स्तुत्य निर्णय घेतला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्ष आणि आपल्या संस्थेच्या जनरल सेक्रेटरी मा. सरोज पाटील (माई) यांचेकडे तो चेक सुपूर्द केला. या प्रसंगी सांगली जिल्हा अंनिसचे उपाध्यक्ष मा. दीपक कोठावळे, प्राचार्य डॉ. अरुण पाटील, मा. अनिल पाटील उपस्थित होते.