इस्लामपूर येथे ‘अंनिस’चे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

प्रा. डॉ. एस. के. माने -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने इस्लामपूर येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात जिल्हास्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. सहा तालुक्यांतून 250 कार्यकर्तेया शिबिरासाठी उपस्थित होते. या शिबिराचे उद्घाटन रोपट्याला पाणी घालून डॉ. हमीद दाभोलकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ‘अंनिस’च्या राज्य अध्यक्ष सरोजमाई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्य कार्यकारी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘अंनिस समजून घेताना’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ‘अंनिस’ कोणत्याही देवा-धर्माला विरोध करत नाही, तर देवा-धर्माच्या नावाखाली लोकांचे जे मानसिक, आर्थिक शोषण करतात, त्यांना विरोध करते. भारतातील बुद्ध, महावीर, वारकरी संत आणि समाजसुधारक यांची धर्मचिकित्सेची परंपरा ‘अंनिस’ पुढे चालवते आहे. कर्मकांडकेंद्री धर्म मानवकेंद्री करण्याचा प्रयत्न करते.

‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. प. रा. आर्डे यांनी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयाची मांडणी केली. फारुख गवंडी यांनी शाखा ‘अंनिस शाखा कशी चालते?’ यावर मार्गदर्शन केले.

‘अंनिस’च्या राज्य अध्यक्षा सरोजमाई पाटील म्हणाल्या की, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि एन. डी. पाटील सर यांनी सुरू केलेल्या या चळवळीचे कार्य आपण सर्वांनी जोमाने पुढे नेऊया. या कामासाठी मदत लागेल ती करायला मी तयार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक जाणिवा निर्माण करण्यासाठी ‘अंनिस’ने प्रयत्न करावेत.

या शिबिरासाठी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील, संस्थेचे अध्यक्ष एन. आर. पाटील, उपाध्यक्ष सुनील पाटील, बी. ए. पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील, डॉ. संजय निटवे, इब्राहिम नदाफ, डॉ. नीलम शहा आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राहुल थोरात यांनी केले. सूत्रसंचालन अलका पाटील यांनी केले. आभार प्रा. एस. के. माने यांनी मानले. शिबिराचे यशस्वी संयोजन प्रा. सचिन गरुड, प्रा. राजेश दांडगे, प्रा. संतोष खडसे, दीपक कोठावळे, प्रा. भरसावळे, प्रा. बामणे, बापू नांगरे, डॉ. सीमा परदेशी यांनी केले.

प्रा. डॉ. एस. के. माने (कार्याध्यक्ष, अंनिस इस्लामपूर)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]