न्हावा शेवा पोलीस स्टेशनमध्ये जातपंचायतीवर सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

अशोक वानखडे -

उलवे, नवी मुंबई येथील रहिवासी रोहन राजू गरुड यांच्या घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात दाखल आहे, तरीही या घटस्फोटाचा निवडा जातपंचायतीद्वारे केला जावा, असा दबाव गरुड कुटुंबीयांवर आणला गेला. 5 व 55 वाड्यांची जातपंचायत भरवून गरुड कुटुंबीयांना जातीतून बहिष्कृत करून वाळीत टाकणे, मारहाण व दंड करू, अशा धमक्या फोनवरून व व्हॉट्सअ‍ॅपवरून देणे, रोटी-बेटी, मानपान बंद करण्याच्या धमक्या देणे, असे प्रकार जातपंचायतीद्वारे गेल्या सहा महिन्यांपासून चालू केले. त्यामुळे याबाबतची तक्रार ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांकडे गरुड कुटुंबीयांनी केली. त्याचा पाठपुरावा कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवा पोलीस स्टेशनमध्ये गोंधळी समाजाच्या पंचांवर सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नंदिनी जाधव, प्रा. प्रवीण देशमुख, राजू देशपांडे हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी व ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अशोक वानखडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच हा गुन्हा दाखल करण्यासाठी न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांचे सहकार्य लाभले.

अशोक वानखडे, ठाणे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]