-

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अधिकृत मुखपत्र असलेले ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’च्या वार्षिक अंकाचे प्रकाशन रॅशनलिस्ट मुव्हमेंट मुंबईचे आणि द्रविड-मुन्नेत्र कळघम मुंबईचे यांच्या वतीने धारावी येथील डी. एम. के. च्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी तामिळनाडूतील सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटचे डॉ. जे. रवीकुमार स्टीफन म्हणाले की, “नरेंद्र दाभोलकरांनी आपल्या मुलाचे नाव ‘हमीद’ ठेवून अगदी नावावरून जात-धर्म ओळखण्याच्या प्रथेला मूठमाती दिली आहे. पेरियार यांनीही तामिळनाडूमध्ये धार्मिक नावे आणि जातिवाचक आडनावे काढून टाकण्याची मोठी मोहीम सुरू केली होती. त्याचाच परिणाम म्हणून आज दक्षिण भारतात कोणीही जातीवाचक आडनाव लावत नाही”
द्रविड कळघमचे अध्यक्ष के. वीरमणी यांनी डॉ. दाभोलकरांचा जन्मदिन विविध उपक्रमांनी तामिळनाडूमध्ये राज्यभर साजरा करावा, असा आदेश दिला होता, अशी आठवण रॅशनलिस्ट फोरमचे ए. रविचंद्रन यांनी सांगितली. या कार्यक्रमाला संपादक राजीव देशपांडे, सहसंपादक मुक्ता दाभोलकर, प्रा.प्रवीण देशमुख, अंनिसचे विश्वस्त गणेश चिंचोले, रूपाली आर्डे, अंनिस सायन-माटुंगा शाखेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद वानखडे, शुभदा निखार्गे, सुनीता देवलवार, रमेश साळुंखे या अंनिस कार्यकर्त्यासह द्रविड कळघमचे कार्यकर्ते ए. रविचंद्रन, गणेशन, अँटनी कन्नन, स्टीफन रविकुमार, नेल्लाकुमार, नल्ला शेकरन, सुधाकरन, शानमुगारासन, शंकर द्रविड, सुरेश कुमार, वेनिला, वलार्माथी, सुमथी आसाइटम्बी हे उपस्थित होते.