रामभाऊ डोंगरे -
महा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, उत्तर नागपूरतर्फे वृक्षारोपण, कोरोना विषयी जनजागृती, मानस -मित्र मानसिक आधार करीता हेल्पलाईन, वैज्ञानिक जागृती व महात्मा जोतिबा का संघर्ष या नाट्याचे सादरीकरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर गार्डन, लष्करी बाग येथे करण्यात आले.
प्रथमत: संविधान उद्धेशिकेचे वाचन विभुतिचंद्र गजभिये यांनी केले. तर या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रधान सचिव मा. रामभाऊ डोंगरे यांनी सादर करतांना विषद केले की, महा. अंनिस उत्तर नागपूर शाखेने करोना काळात 14 वेळेस गरीबांना झोपडपट्टीत जाऊन अन्नदान, भोजनदान, मास्क वितरण, कोविड योद्धांचा सन्मान व वृक्षारोपण केले असून हा 15 वा कार्यक्रम आहे. महा. अंनिसची उत्तर नागपूर शाखा वैज्ञानिक जाणिवांची जनजागृती करण्यात नागपूर शहरात सदैव अग्रेसर असून नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या प्रसंगी अतिथीच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे बौद्ध महोत्सव सीरपूर (जि.महासमुद) येथे छत्तीसगढ शासनाने गौरविलेले ‘महात्मा जोतिबा का संघर्ष’ हे नाटक प्रस्तुत करण्यात आले व छत्तीसगढ शासनाने पाठविलेले सन्मान पत्र कलावंतांना अतिथींच्या हस्ते वितरित करण्यात आले.
महात्मा फुलेंच्या भूमिकेसाठी रॉकी घुटके, सावित्रीच्या भूमिकेसाठी माधुरी मेश्राम व इतर भूमिकांसाठी अजय रहाटे, गौतम मघाडे, शशांक चणकापुरे, (डायरेक्टर व लेखक ), आशुतोष टेंभुर्णे, निकिता बोंदाडे, श्वेता पाटील (संचालन), मनिषा बौद्ध, चंदा मोटघरे व जान्हवी मेश्राम इत्यादी कलावंतांना प्रशस्तीपत्र प्रदान करुन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे यांनी, तर आभार प्रदर्शन नरेश महाजन यांनी केले.
– रामभाऊ डोंगरे, नागपूर