वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्हा शाखेचा ‘जागर स्त्रीमुक्तीचा’ व ‘संत कबीर जयंती’ साजरी

प्रवीण देशमुख -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे जिल्हा आणि असंघटित कष्टकरी कामगार संघटना, उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा कबीर जयंती व वटसावित्री पौर्णिमेनिमित्त ‘जागर स्त्रीमुक्तीचा’ कार्यक्रम उल्हासनगर येथे झाला. हा कार्यक्रम ऑनलाईन आणि ऑफलाईन असा दोन्ही पद्धतीने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.

चार्वाक, बसवण्णांपासून सुरू झालेली माणसांना संपवायची धर्मांध सनातन्यांची परंपरा अगदी दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे गौरी लंकेश यांच्यापर्यंत सुरू ठेवूनही विचार मात्र मरत नसतात. कबीरांचे निर्वाण होऊन सहाशे वर्षे उलटली, तरीही त्यांचे विचार आजही संपलेले नाहीत. महापुरुषांचे विचार त्यांना संपवून कधीच नष्ट होत नसतात, हे आता तरी सनातन्यांनी समजून घेतलं पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. प्रवीण देशमुख यांनी कबीर जयंतीच्या निमित्ताने केले. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, पूजा-पाठ, कर्मकांड, निरर्थक रुढी-परंपरा यांमध्ये भरडल्या जाणार्‍या जनसामान्यांना आपल्या जिवाची पर्वा न करता विवेकाची वाट दाखवण्याचे काम संत कबीर यांनी अखेरच्या क्षणापर्यंत केले.

वटसावित्री निमित्त ‘जागर स्त्रीशक्तीचा – हाय सबला तेरी कहानी’ याबाबत बोलताना वंदनाताई शिंदे यांनी वटसावित्रीच्या व्रताचा फोलपणा उपस्थित महिलांसमोर मांडला. त्याचबरोबर बुवाबाजीच्या चमत्कारांचा भांडाफोड करणारे प्रयोग सादर करून त्यामागील विज्ञान समजावून सांगून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

राजू कोळी यांनी नुकत्याच घडलेल्या ‘मॅग्नेट मॅन’ प्रकारामागील रहस्य प्रयोगासह उपस्थितांसमोर करून दाखविले व अशा अपप्रचाराला बळी न पडता प्रत्येकाने कोरोनाची लस ही घेतलीच पाहिजे, असे आवाहन केले. प्रा. प्रकाश पारखे यांनी उपस्थितांच्या काही प्रश्नांच्या अनुषंगाने आपले विचार मांडत ‘मॅग्नेट मॅन’च्या प्रकारामागील विज्ञान समजावून सांगितले.

या कार्यक्रमात स्वप्निल वाघमारे, राजू कोळी, स्वप्निल साहू, सुनंदा वानखडे यांनी प्रबोधनात्मक गीते सादर करून कार्यक्रमामध्ये रंगत आणली.

या कार्यक्रमाला वटसावित्रीच्या कर्मकांडाला झुगारून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांसह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश पारखे, कार्याध्यक्ष अशोक वानखेडे, राज्य सल्लागार समितीच्या सदस्य वंदनाताई शिंदे, राज्य सांस्कृतिक समितीचे सदस्य राजू कोळी, ठाणे जिल्हा सचिव सचिन शिर्के, जिल्हा सांस्कृतिक विभागाचे सदस्य मनीष वाघमारे, स्वप्निल शिरसाट, सुनंदाताई वानखेडे यांच्यासह असंघटित कष्टकरी महिला संघटनेचे अध्यक्ष सुनील अहिरे, शहराध्यक्षा मीरा सपकाळ, नवीन गायकवाड यांच्यासह समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रा. प्रवीण देशमुख, डोबिंवली


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]