सांगलीत पैशाचा पाऊस; भोंदूबुवासह चौघे जेरबंद

-

दीड लाखांची रोकड जप्त; पाच दिवसांत पोलीस कोठडी; सोलापूर, म्हैसाळ, तासगाव तालुक्यात छापे

पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून सुनील मोतीलाल व्हटकर (वय 57, बुधवार पेठ, सोलापूर) यांना पंधरा लाखांचा गंडा घालणार्‍या भोंदूबुवासह चौघांना अटक करण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना शुक्रवारी यश आले. चौघांकडून दीड लाखाची रोकड व दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत.

अटक केलेल्यांमध्ये भोंदूबुवा रोहित भालचंद्र बेन्नाळकर ऊर्फ शंकर महाराज (वय 34, रा. अकलूज, जि. सोलापूर), संदीप सुभाष पाटील (41, रा. अंजनी, ता. तासगाव), रोहित महादेव ऐवळे (32, खणभाग, सांगली) व अरुण शिवलिंग कोरे (33, म्हैसाळ, ता. मिरज) यांचा समावेश आहे. न्यायालयाने या सर्वांना 28 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. अटकेतील संशयितांची संख्या आता सहा झाली आहे. यापूर्वी अट केलेल्या सांगलीतील बादशहा पाथरवट (35), त्याची पत्नी आसमा (30) या दोघांची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. दरम्यान, आता या प्रकरणातील शिवानंद हाचंगे (60, विडी घरकूल, सोलापूर) हा अजूनही फरारी आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

फिर्यादी सुनील व्हटकर हे सोलापुरात शेती करतात. कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी शंकर महाराज याची भेट घेतली. शंकरने कौटुंबिक अडचणीवर काही उपाय सांगितले. तसेच पैशाची अडचण असेल, तर सांगा, तुम्हाला पैशाचा पाऊस पाडून देतो,’ असे सांगितले. व्हटकर तयार झाले. यासाठी शंकरने त्यांना 25 लाख रुपये खर्च असल्याचे सांगितले. चर्चेअंती 15 लाख रुपये देण्याचे व्हटकर यांनी मान्य केले.

शंकरने ‘मी अनेकांना पैशाचा पाऊस पाडून दिला आहे,’ असेही सांगितले. त्यानंतर सांगलीत बादशहा पाथरवट याच्याशी मोाबाईलवर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला. पाथरवट यानेही व्हटकर यांना ‘मला महाराजांनी पैशाचा पाऊस पाडून दिल्याचे सांगून व्हटकर यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर व्हटकर यांच्याकडून 15 लाख रुपये घेतले. पण प्रत्यक्षात या सर्वांनी पैशाचा पाऊस पाडून दाखविलाच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्हटकर यांनी चार दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

पाथरवट दाम्पत्यास तातडीने अटक केली होती. महाराजासह अन्य संशयितांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक सोलापूर जिल्ह्यात तळ ठोकून होते. महाराज हा अकलूनचा असल्याची माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड, हवालदार सचिन मोरे, संदीप मोरे, सुदर्शन वाघमोडे, कपील साळुंखे यांच्या पथकाने पहाटे महाराजाच्या घरावर छापा टाकून त्याला पकडले. त्याच्या चौकशीतून अन्य संशयितांची नावे व पत्ते मिळाले. त्यानंतर त्यांनाही पकडले.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]