-
महाराष्ट्रातील पहिले आंतरजातीय आंतरधर्मीय वधू वर सूचक केंद्र सुरु
सध्या राज्यात आणि देशभरात जाती जाती आणि धर्मा धर्माच्या मध्ये मोठ्या प्रमाणात विद्वेष निर्माण केला जात आहे. त्यामुळे जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन जोडीदार निवडण्याची इच्छा असलेल्या लोकांच्यासाठी असे जोडीदार शोधणे अत्यंत अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर जाती जातींमधल्या भिंती तोडण्यासाठीचा कृती कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यस्तरीय आंतरजातीय आंतरधर्मीय वधू वर सूचक केंद्र सुरू केले आहे. या केंद्रामध्ये आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह स्वच्छेने करणार्या वधू वरांनी आणि पालकांनी आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन या केंद्राचे राज्य समन्वयक शंकर कणसे आणि डॉ. ज्ञानदेव सरवदे यांनी केले आहे. यासाठी अंनिस लवकरच वेबसाईट तयार करणार आहे. त्यामध्ये वधु-वरांनी आपली माहिती भरावी.
आंतरजातीय, आंतरधर्मीय तसेच विधवा- विधुर विवाह करू इच्छिणार्यांनी आपली माहिती या केंद्राचे समन्वयक शंकर कणसे (मु. पो. पिंपरी, ता. कोरेगाव, जि. सातारा संपर्क ९९२२३ ५५४३५) आणि डॉ.ज्ञानदेव सरवदे, बारामती (संपर्क ९५२७७२१४७५) यांच्याशी संपर्क करावा.
