शरद मोरेश्वर बापट, -
मंत्र सगळे फसवे असती
त्यांच्या नादी लागू नका।
नाही शिव वा ब्रह्मा कोणी
विवेक-विचारा सोडू नका ॥1॥
महंत असो वा ताई, बाबा
चार पावले दूर राहा।
विज्ञानाला न पटणारी
कर्मकांडे ती सोडून द्या ॥2॥
जातीवरती ठरत नसे हा
नीच असे की उच्च असे।
व्हावे साक्षर उच्च असे तो
ज्याच्या अंगी ज्ञान वसे ॥3॥
–शरद मोरेश्वर बापट,
अपर्णा अपार्टमेंट, सहकार नगर 2, पुणे 411009