महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यव्यापी महिला सबलीकरण व प्रबोधन अभियान 2020

उषा शहा - 9423593215

8 मार्च महिला दिन विशेष

‘मअंनिस’ महिला सहभाग विभाग दरवर्षी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती 3 जानेवारी ते राजमाता जिजाऊ जयंती 12 जानेवारी या कालावधीत महिला सबलीकरण व प्रबोधन अभियान चालवतो. दरवर्षी महिलांसंदर्भात विषय घेऊन त्याविषयी प्रबोधन करणारे कार्यक्रम राबविले जातात. यंदा ‘महिला व व्यसन’ हा विषय घेण्यात आला. “महिलांनो, द्या एकच नारा, व्यसनांना नको मुळीच थारा” ही टॅगलाईन घेऊन हे अभियान राज्यभर राबविण्यात आले. हा विषय दोन मुद्द्यांच्या अनुषंगाने घेण्यात आला. एक-पुरुष व्यसन करतो, तेव्हा त्याचे परिणाम स्त्रीला भोगावे लागतात आणि दोन – स्त्रिया स्वत:च व्यसन करण्याचे प्रमाण सध्या खूप वाढले आहे.

‘महिला व व्यसन’ विषयाची मांडणी करण्याआधी काही व्यसनमुक्ती केंद्र आणि समुपदेशकांशी संपर्क करून सद्य:स्थितीची माहिती घेण्यात आली. तेव्हा असे आढळून आले की, सध्या महिलांनी व्यसन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात ग्रामीण व शहरी महिलांचा समावेश आहे. या महिला 13 ते 70 वयोगटातील आणि निरनिराळ्या आर्थिक स्तरातील आहेत; अगदी अशिक्षित ते डॉक्टर, इंजिनिअर या सारख्या उच्चशिक्षित महिलांमध्येही व्यसन दिसून येत आहे. पौगंडावस्थेतील मुलींचे प्रमाण खूपच आहे. महाराष्ट्रभर घेतल्या गेलेल्या कार्यक्रमांमध्ये महिलांंच्या व्यसन करण्यामुळे होणारे परिणाम आणि त्यावरचे उपायही चर्चिले गेले. या कार्यक्रमांमध्ये ‘प्रतिष्ठा’ ही ‘दारूचे दुष्परिणाम’ या विषयीची अगदी प्रभावी अशी शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली. सातारच्या परिवर्तन संस्थेच्या ‘तंबाखूचे दुष्परिणाम’ या पीपीटीद्वारे चर्चा झाली. शाहीर एस. एस. शिंदे यांचे ‘दारूडा नवरा बाई’ आणि ‘बोला आज मिळून सारे, निश्चय करू या रे, ज्या ज्या घातक सवयी, दारू, सिगारेट, बिडी नष्ट करू या रे’ ही गीते सादर करण्यात आली. शेवटी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली.

नांदेड येथे प्रारंभ परिषद – या अभियानाचे उद्घाटन नांदेड येथे करण्यात आले. नांदेड शाखा आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेच्या प्रशिक्षण हॉलमध्ये 200 सफाई कामगार महिलांसाठी हा कार्यक्रम झाला. यावेळी महापालिकेचा अधिकारी वर्ग, अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे, सरचिटणीस शहाजी भोसले, सरचिटणीस हरिदास तम्मेवार, महिला विभाग कार्यवाह उषा शहा, सहकार्यवाह रूक्साना मुल्ला उपस्थित होत्या व त्यांनी मार्गदर्शन केले. नांदेड शाखेचे जिल्हा कार्याध्यक्ष सम्राट हटकर, रंजना खटके, विजया मुखेडकर, सुलोचना मुखेडकर, प्रा. लेनिना, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. चिद्रावार आणि इतर सर्व कार्यकर्ते यांनी खूप परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

सम्राट हटकरांनी विडी, सिगारेटच्या धुराचा शरीरावर परिणाम दाखवणारा प्रभावी प्रयोग सादर केला. 25 व्यसनी व्यक्तींना व्यसनमुक्त करणार्‍या आनंद बिराजदार यांचा सत्कार करण्यात आला.

धुळे येथे अभियानाचा समारोप – अभियानाचा समारोप धुळे येथे एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयात करण्यात आला. उषा शहा, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश बिर्‍हाडे, जिल्हा महिला सहभाग विभाग कार्यवाह प्रा. कल्पना भागवत, प्राचार्य शिंदे यांच्यासह सर्वांनी मार्गदर्शन केले. प्राचार्यांनी हा कार्यक्रम समाजात सर्व ठिकाणी होण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी व्यसनमुक्तीचे काम करणार्‍या गीतांजली कोळी या महिलेचा सत्कार करण्यात आला.

3 जानेवारी रोजी नांदेड येथे उद्घाटन झाल्यानंतर दहा दिवसांत रत्नागिरीमधील कुंबळे, डोंबिवली, नागपूर, कोपरगाव, उमरगा, बीड, जळगाव, औरंगाबाद, नेरळ, नवी मुंबई, लातूर, शहापूर, नांदेड, ठाणे, सोलापूर, पुणे, नांदेड, वर्धा, हिंगोली, मोहोळ, वाशी, मुंबई-मानखुर्द, नाशिक, धुळे, अंबरनाथ, रायगड, चौंढी, भिवंडी अशा 56 ठिकाणी राज्यभरात कार्यक्रम झाले.

यंदा विशेष उल्लेख करायचा म्हणजे औरंगाबादमध्ये शहाजी भोसले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सात परिषदा घेतल्या. यातील प्रत्येक परिषद चार तासांतील तीन सत्रांची होती. तसेच या परिषदांच्या सांगता परिषदेला सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]