‘अंनिस’ने घेतलेल्या रील्स स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वाघेश साळुंखे -

११ सप्टेंबर २०२२ रोजी नागपूर येथे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सोशल मीडिया विभागाची चर्चा सुरू असताना ‘अंनिस’ने रील्स स्पर्धा घ्यावी, अशी कल्पना पुढे आली.

सध्या समाज माध्यमांत रील्सची खूपच चलती आहे. काही सेकंदांचे हे व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल पाहिले जात आहेत. लहान-थोर सर्वांनाच या माध्यमाने वेडे केले आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. पण यात प्रबोधनाचा विचार खूप कमी प्रमाणात आहे, हेही वास्तव आहे.

त्यामुळे या कल्पनेला सर्वांनीच उचलून धरले. साहजिकच या स्पर्धेच्या आयोजनाची सर्व जबाबदारी सोशल मीडिया विभागावर येऊन पडली. नंतर सोशल मीडिया विभागाच्या टीमने एक ऑनलाईन बैठक घेऊन स्पर्धेचे आयोजन कशा पद्धतीने करावे, याबाबत चर्चा केली. १ नोव्हेंबर हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जन्मदिवस. तेव्हा डॉक्टरांना हे एक चांगले अभिवादन ठरेल. त्यामुळे सर्वांनीच या कल्पनेला पाठिंबा दिला. जबाबदार्‍या ठरल्या. पद्धत ठरली. स्पर्धेचे विषय, निकष निश्चित झाले. चमत्कारविरोधी प्रबोधन, बुवाबाजीबाबत जनजागृती, फलज्योतिषविरोधी जनजागृती, फटाकेमुक्त दिवाळी, छद्मविज्ञान, ग्रहणविषयक अंधश्रद्धांबाबत जनजागृती असे पाच विषय ठरवण्यात आले. १० नोव्हेंबर २०२२ ही व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख होती. अंतिम तारखेपर्यंत ५७ व्हिडिओ प्राप्त झाले. अंनिसच्या काही कार्यकर्त्यांनीही व्हिडिओ बनवून पाठवले. या स्पर्धेच्या निमित्ताने काही कार्यकर्त्यांनी पहिल्यांदाच रील्सचे मध्यम वापरले होते. काही व्यावसायिक रील्स निर्मात्यांनीही स्पर्धेत सहभाग घेतला. १४ नोव्हेंबर२०२२ रोजी एका ऑनलाईन कार्यक्रमात या स्पर्धेचा निकाल घोषित केला जाणार होता. परीक्षणासाठी केवळ चारच दिवस उपलब्ध होते. इतक्या कमी कालावधीत परीक्षणाचे काम ‘रोडमॅप एंटरटेनमेंट’ या निर्मिती संस्थेचे ऋषी पवार, तसेच अंनिसचे कार्यकर्ते राहुल माने, अक्षिता पाटील आणि पंकज पाटील यांनी पार पाडले. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘Reels for Rationality’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सिने-नाट्य अभिनेते डॉ. शरद भुताडिया उपस्थित होते. डॉ. हमीद दाभोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. हमीद दाभोलकर यांनी सोशल मीडिया वापरताना कोणती दक्षता घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. शरद भुथाडिया यांनी स्पर्धा घेण्याच्या कल्पनेचे कौतुक केले. आपल्या भाषणात त्यांनी स्पर्धेचा निकाल घोषित केला. प्रथम क्रमांक- शर्वरी दीपक लहादे (रु. ७०००), द्वितीय क्रमांक- गौरव राजेश संभूस (५०००), तृतीय क्रमांक- सुनील आबा शिंदे (३०००), उत्तेजनार्थ बक्षिसे- शिवानी प्रदीप तरे व सूरज कृष्णा भोसले (प्रत्येकी रु.२०००) यांच्या रील्सना बक्षिसे मिळाली. ‘Reels for Rationality’ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाघेश साळुंखे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अजय मोकाशी यांनी करून दिला. सूत्रसंचालन अक्षिता पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन राहुल माने यांनी केले.

सर्व स्पर्धकांची बक्षिसे त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहेत. या पाच विजेत्या स्पर्धकांशिवाय आणखी पंधरा स्पर्धकांना प्रोत्साहन म्हणून ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ एक वर्ष मोफत पाठवण्यात येणार आहे.

या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सोशल मीडिया विभागाचे वाघेश साळुंखे, राहुल माने, ज्ञानेश्वर गिराम, अक्षिता पाटील, पंकज पाटील, अजय मोकाशी, समीर तांबोळी, अमोल पाटील यांनी मेहनत घेतली. तसेच राहुल थोरात, फारुख गवंडी यांनीही सहकार्य केले. या सर्वांच्या प्रयत्नातून ही अनोखी रील्स स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. यातून सोशल मीडिया विभागाला खूप काही शिकायला मिळाले. या माध्यमाची ताकद समजली. जुन्या चुका सुधारून पुढील वर्षी ही स्पर्धा आणखी मोठ्या स्वरुपात घेण्याचा आमचा मनोदय आहे.

वाघेश साळुंखे

सोशल मीडिया विभाग,

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]