-

डोंबिवली अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते बिपीन रणदिवे यांचे नुकतेच निधन झाले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची डोंबिवली शाखा सुरू करण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता. ते सर्पअभ्यासक होते. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र अंनिस व अंनिवा संपादक मंडळाच्या वतीने विनम्र अभिवादन!

महाराष्ट्र अंनिस कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मीरासाहेब मगदूम यांचे नुकतेच निधन झाले. ते राष्ट्र सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. तसेच माझी शाळेचे संस्थापक होते. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र अंनिस व अंनिवा संपादक मंडळाच्या वतीने विनम्र अभिवादन!
– महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती