राहुल थोरात -

चला, व्यसनाला बदनाम करूया! या ‘अंनिस’च्या मोहिमेस राज्यव्यापी प्रतिसाद
1) पुणे शहर शाखा
दि. 31 डिसेंबर रोजी शनिवार पेठेतील साधना मीडिया सेंटर येथे दूध वाटप करण्यात आले. नववर्षाचे स्वागत करताना दारू पिऊ नका, दूध प्या असे आवाहन नागरिकांना करण्यात आले. त्याला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सामाजिक कार्यकर्त्या प्राची दुधाणे म्हणाल्या, हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून तो पुणे शहरासह राज्यातील इतर ठिकाणी देखील राबविण्यात यावा व अशा पद्धतीने डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विचाराचा वारसा पुढे नेला जावा. याप्रसंगी साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ म्हणाले की, डॉ. दाभोलकरांनी दिलेल्या चतुःसूत्रीच्या आधारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्य करत आहेत, ही दिलासादायक बाब आहे.
मॉल व डिपार्टमेंटल स्टोअर्समधून वाईन व बीअर विक्रीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन असल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाले आहे. असा प्रस्ताव मंजूर करण्याचा जनहितविरोधी निर्णय शासनाने घेऊ नये, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांना देण्यात आले.
या उपक्रमात श्रीपाल ललवाणी, अनुराधा काळे, अनील वेल्हाळ, सुरेश सपकाळ, नितीन बसरूर, नीतेश रामगुडे, दत्ता जाधव, माधव गांधी, राहुल कदम, प्रकाश सोनावणे, नितीन हांडे, गजानन बिराजदार आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
2) डोंबिवली
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डोंबिवली शाखेच्यावतीने आयोजित ‘द-दारू’चा नव्हे ‘द-दुधा’चा या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डोंबिवली शाखेच्या वतीने ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ या उपक्रमांतर्गत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी 5 वाजता ‘द-दारू’चा नव्हे ‘द-दुधा’चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांतर्गत नागरिकांना दूध वाटप करण्यात आले व नववर्षाचे स्वागत करताना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला व या उपक्रमाबद्दल आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या. एवढेच नव्हे, तर अनेकांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत जोडून घेण्यासाठी नाव नोंदणी केली.
‘द–दारू’चा नव्हे, तर ‘द–दुधा’चा,
हॅप्पी न्यू इयर, हॅप्पी न्यू इयर, नो दारू–नो बीअर,
नो दारू–नो वाइन.. प्या दूध– राहा फाईन
अशा घोषणा देण्यात आल्या. यातून तरुण पिढीने दारूच्या व्यसनाच्या आहारी न जाता त्यापासून दूर राहायला हवे. व्यसनांचे मार्ग अंधश्रद्धेकडे नेतात, असा संदेश यातून दिला. यावेळी सर्व उपस्थितांना एक ग्लास दुधाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये ‘अंनिस’बरोबरच समविचारी संघटना; तसेच राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याप्रसंगी येणार्या-जाणार्या नागरिकांनी कार्यक्रमाबाबत कौतुक केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
या कार्यक्रमाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ट्रस्टी गणेश चिंचोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रोहित सामंत, डोंबिवली विधानसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, शशिकांत म्हात्रे, नीमेश पाटील, सुशील सामंत, ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या व कवयित्री अनिता देशमुख, नितीन सोनवणे, उदय देशमुख, संध्या देशमुख आदी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांना जागवत त्यांनी दाखवलेला ‘पुरोगामी व विवेकवादी विचारांचा वसा- वारसा’ पुढे नेण्याचा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यानंतर अहिंसेच्या मार्गाने एवढे मोठे जनआंदोलन उभे करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर हे एकमेव उदाहरण आहे, असे विचार रोहित सामंत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश चव्हाण, सुशील सामंत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी महत्त्वाचा सहभाग नोंदवला.
3) सातारा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सातारा जिल्हा व परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे आयोजित ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेली 32 वर्षे हा उपक्रम शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणेने दरवर्षीप्रमाणे 31 डिसेंबर रोजी गोल बाग, सातारा चौक येथे झाला. संस्थेच्या वतीने नागरिकांना दुधाचे मोफत वाटप करून प्रबोधनाची गाणी सादर केली जातात. त्याचप्रमाणे व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन केले गेले.
या उपक्रमासाठी डॉ. शैला दाभोलकर, प्रशांत पोतदार, उदय चव्हाण, अॅड. हौसेराव धुमाळ, डॉ. दीपक माने, वंदना माने, भगवान रणदिवे, जे. जे. जाधव, दिलीप महादार, मयुरी अस्लम तडसरकर,‘ विवेक वाहिनी’चे बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
4) परभणी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परभणी जिल्हा शाखेच्या वतीने ‘चला, व्यसनाला बदनाम करू या’ या उपक्रमांतर्गत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर दूध वाटप करण्यात आले. या उपक्रमामध्ये दारूची पूर्णाकृती बाटली तयार करण्यात आली होती व तिला नागरिकांनी चप्पलने मारून दारूचा निषेध करण्यात आला. ‘द-दारू’चा नव्हे ‘द-दुधा’चा, ‘हॅप्पी न्यू इयर, हॅप्पी न्यू इयर – नो दारू नो बीअर’, ‘नो दारू-नो वाइन- प्या दूध राहा फाईन’ अशा घोषणा देण्यात आल्या. यातून तरुण पिढीने दारूच्या व्यसनी न जाता व्यसनांपासून दूर राहायला हवे, व्यसनाचे मार्ग हे अंधश्रद्धेकडे नेतात, असा संदेश यातून दिला. यावेळी सर्व उपस्थितांना एक ग्लास दुधाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्राचार्य प्रल्हाद मोरे, मन हॉस्पिटलचे प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ.जगदीश नाईक, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. सुनील जाधव, शारदा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, डॉ. नवनाथ सिंगापुरे, प्रगतिशील शेतकरी भानुदास शिंदे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. चंद्रकांत गांगुर्डे, प्रा. डॉ. अरविंद लोणकर, दक्षता समिती, जिल्हाधिकारी कार्यालय परभणीचे सदस्य अनिता सरोदे, पत्रकार संजय बगाटे, अरुण दीपके, ‘अंनिस’ मीडिया प्रतिनिधी अलीम शेख, पैलवान मुंजा खुणे, रामचरण कोदली, प्रा. डॉ. अविनाश पांचाळ, प्रा. माणिक लिंगायत, विनोद डावरे, ‘अिंंनस’चे कार्यकर्तेउपस्थित होते. त्याप्रसंगी येणार्या-जाणार्या हजारो नागरिकांनी कार्यक्रमाबाबत कौतुक केले.
5) ठाणे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शाखा व व्यसनमुक्ती जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने महर्षी वाल्मिकी चौक, ठाणे (पश्चिम) येथे ‘द-दारू’च्या ऐवजी ‘द-दुधा’चा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. योगेश फडतरे यांच्या समुपदेशनाने झाली. ते म्हणाले, जत्रा-यात्रा, उत्सव, निवडणूक, मिरवणूक, होळी अशा विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी दारू पिऊन आनंद व्यक्त करण्याची वाढती ‘क्रेझ’; तसेच सिगारेट, ड्रग्स, गुटख्यासारख्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आता जागृत नागरिकांनी पुढाकार घ्यावा.
महाराष्ट्र अंंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शाखेचे प्रा. प्रकाश पारखे (खगोलशास्त्र अभ्यासक, तज्ज्ञ), अजय भोसले आणि विजय मोहिते; तसेच व्यसनमुक्ती जनजागृती सेवा संस्थेचे जगदीश खैरालिया (संस्थापक), ललित मरोठिया (अध्यक्ष), संजय धिंगान (सचिव) आणि अखिल भारतीय वाल्मिकी नवयुवक संघाचे नंदकिशोर सौदे (ठाणे जिल्हाध्यक्ष) उपस्थित होते. या उत्साही कार्यक्रमाचे निवेदन ललित मरोठिया यांनी उत्तम रीतीने केले. सरतेशेवटी ‘द-दारू’च्या ऐवजी ‘द-दुधा’चा कार्यक्रमाची सांगता दूध वाटप करत नववर्षाच्या सर्वांना हार्दिक सदिच्छा देऊन झाली.
6) बार्शी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा, बार्शी, जि. सोलापूर शाखेच्या वतीने ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ आणि ‘द-दारू’चा नव्हे ‘द-दुधा’चा या उपक्रमांतर्गत दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, बापूसाहेब शितोळे, (खजिनदार, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी) श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. भारती रेवडकर, कॉ. तानाजीराव ठोंबरे, अध्यक्ष, अंनिस जिल्हा सोलापूर, प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे, प्रा. हेमंत शिंदे सदस्य, ‘अंनिस’ राज्य सल्लागार समिती, संजय मोरे, कार्यध्यक्ष, उन्मेष पोतदार, सचिव, मधुकर शेळके, उपाध्यक्ष, डॉ. प्रवीण मास्तुद, प्रा. शंकर अंकुश, श्रीमती सत्यभामा जाधवर व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
7 ) वाई
दि. 31 डिसेंबर रोजी नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाईमधील शाहीर चौकात योध्दा प्रतिष्ठान, वाई आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन, समिती शाखा वाई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दारू नको, दूध प्या’ महाजनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. 31 डिसेंबर हा बरेच जण दारू-बीअर सेवन करून साजरा करतात. मद्यसेवनाला; विशेषत: तरुण पिढी बळी पडते. त्यामुळे त्यांचे जीवन बरबाद होत आहे. त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी, म्हणून हा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी ‘दारू नको, दूध प्या’, ‘नको दारू-नको बीअर, हॅप्पी न्यू ईयर, हॅप्पी न्यू ईयर’ अशा प्रबोधनात्मक घोषणा देण्यात आल्या. या उपक्रमाला तरुणांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
8) सोलापूर
दि. 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते 6:30 वाजता पार्क चौकात नववर्षाच्या पूर्वसंध्येला सर्व नागरिकांना ‘द-दारू’चा नव्हे ‘द-दुधा’चा उपक्रमांतर्गत दूध पिण्याबद्दलचे प्रबोधन करीत व ‘नो व्हिस्की – नो बीअर, हॅपी न्यू ईयर’ असा संदेश-घोषणा देत दूध वाटप करण्यात आले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसह पोलीस अधिकारी व राजकीय, सामाजिक बांधवांनीही या कार्यक्रमास आवर्जून भेट देऊन कौतुकही केले. या कार्यक्रमात कोरोना नियमांचे कटाक्षाने पालन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, निशा भोसले, मधुरा सलवारू, ब्रह्मानंद धडके, उषा धडके, कुंडलिक मोरे, आर. डी. गायकवाड, गोरख गडसिंग, सुरेखा गडसिंग, डॉ. निनाद शहा, उषा शहा, नीलेश गुरव, नितीन अण्वेकर, धनाजी राऊत, शार्दुल भालेराव, नितीन कोळी, एच. सिंहासन व सचिव लालनाथ चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
9) गडहिंग्लज
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा गडहिंग्लज व गडहिंग्लज पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ आणि ‘द-दारू’चा नव्हे ‘द-दुधा’चा या उपक्रमांतर्गत दारूच्या बाटलीला जोडे मारून दुधाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, अनंत देसाई, बाळासाहेब मुल्ला, प्रा. पी. एम. भोईटे, प्रा. सुभाष कोरे, पांडुरंग करंबळकर गुरुजी, अशोकराव मोहिते, प्रा पी. डी. पाटील, प्रा. शिवाजी होडगे, अलका भोईटे, सुवर्णलत्ता गोईलकर, अरुणा शिंदे, गीता पाटील, सुमन सावंत, प्रा. पी. बी. रक्ताडे, प्रा. अशपाक मकानदार, मनसेचे अध्यक्ष नागेश चोैगले, शिवसेनेचे प्रा. सुनील शिंत्रे, राष्ट्रवादीचे सरपंच उदय चव्हाण, प्रा. आप्पासाहेब कमलाकर, प्रा. साताप्पा कांबळे, गणपतराव पाटोळे; तसेच अनेक कार्यकर्तेव नागरिक उपस्थित होते.
10) चाकण
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चाकण आणि कलाविष्कार मंच, चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे आयोजित ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेली 32 वर्षे हा उपक्रम शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणेने दरवर्षी 31 डिसेंबर रोजी महात्मा फुले चौक येथे होत असतो. संस्थेच्या वतीने नागरिकांना मोफत दुधाचे वाटप करून प्रबोधनाची गाणी सादर केली जातात. त्याचप्रमाणे व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन केले जाते. त्यामुळे अनेक नागरिक व्यसनमुक्त झाले आहेत. अत्यंत स्त्युत्य असा हा उपक्रम असून सर्व स्तरांपर्यंत, असे उपक्रम राबवण्याची गरज आहे.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका प्रमिला गोरे, मनोहर (बापू) शेवकरी, रमा हुलावळे, नारायण करपे, प्रमोद पारधी, विशाल बारकर, विजय तांबे, मनोहर मोहरे, नामदेव पडदुणे, चंद्रकांत बुट्टे, राजेंद्र जगनाडे, सचिन आल्हाट, अभिजित पांडे, संभाजी थिटे, धनश्री गोरे, आदिती पारधी, अनुष्का करपे, वसुधा भोर आदी उपस्थित होते. चाकण शिवसेना उपप्रमुख राजेंद्र खेडकर, कॉन्ट्रॅक्टर शामभाऊ राक्षे, गणेश गोरे यांनी दुधासाठी सहकार्य केले. तसेच वाचकांना वार्षिक अंक देऊन पुढील वर्षाची वार्तापत्र सभासद नोंदणी केली. सर्व नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले व दुधाचा आस्वाद घेतला.
11) जत
‘दारू नको-दूध प्या’ उपक्रमांतर्गत 31 डिसेंबरला अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दूध वाटपाचा कार्यक्रम झाला. डिसेंबर हा दिवस दरवर्षी तरुण पिढी दारू, बीअर पिऊन साजरा करते. या दिवशी नवीन वर्षाचे स्वागत व्यसन करून केले जात आहे. तरुण पिढी वाममार्गाला लागत आहे. हे पाहून अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा जतच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत ‘दारू नको-दूध प्या’ हा उपक्रम जत येथील निगडी कॉर्नर या ठिकाणी दुधाचे वाटप करून घेण्यात आला. यावेळी चंद्रसेन माने पाटील म्हणाले की, आजची पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. या पिढीमध्ये दारू, गुटखा, तंबाखू, सिगारेट अशा व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. व्यसनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. नव्या पिढीने नवीन वर्षाची सुरुवात करताना व्यसनमुक्त व्हावे, असे मत शिक्षक माने-पाटील यांनी व्यक्त केले. वाघमोडे म्हणाले की, आज लोकशाही धोक्यात आली आहे. मतदान करताना सुद्धा मतदार दारू-मटण घेतल्याशिवाय मतदान करत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मतदान करणे हा संविधानाने दिलेला हक्क आहे. तो हक्क बदनाम करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. भारतातील तरुण पिढी जोपर्यंत व्यसनमुक्त होत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जतच्या वतीने ‘दारू नको-दूध प्या’ हा सामाजिक उपक्रम राबवून तरुण पिढीला व्यसनांपासून दूर करण्याचा चांगला प्रयत्न या ठिकाणी केला आहे.
कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी केले. सय्यद सर यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले. यावेळी माजी सैनिक दत्ता शिंदे, बाबासाहेब काटे, ‘प्रोटॉन’चे तालुकाध्यक्ष बंडगर सर, ‘अंनिस’चे जिल्हा पदाधिकारी इब्राहीम नदाफ, अर्जुन कुकडे, युवक नेते संतोष साबळे, रवी सांगोलकर आदींनी महत्त्वाचे सहकार्य केले.
12) बिलोली
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा बिलोली, जि. नांदेड येथे ‘वाईन नको-दूध प्या’ अभियान राबविण्यात आले. तहसील कचेरीसमोर झालेल्या या कार्यक्रमात दूध वाटप करण्यात आले. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संनगले, कमलाकर जमदाडे, फारुक शेख, मोहन जाधव, सायलू कारमोड, अहमद मौलाना, युन्नुस कासराळीकर आदी सहभागी झाले.
13) कोल्हापूर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कोल्हापूरच्या विविध भागात ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ हे अभियान राबवले. शहाजी कॉलेज, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, शिंगणापूर ग्रामपंचायत अशा विविध ठिकाणी व्याख्याने देऊन लोकप्रबोधन करण्यातआले. अभियानाचा समारोप शिंगणापूर ग्रामपंचायतीसमोर दुग्ध प्राशनाने झाला. अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. व्यसनांमुळे व्यक्तीचे नुकसान होते, कुटुंबाची वाताहत होते आणि समाज देशोधडीला लागतो. पण महाराष्ट्र शासन अबकारी कराच्या लोभाने डिपार्टमेंटल स्टोअरमध्येही दारू उपलब्ध करून देणार आहे, ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. याचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती निषेध करत आहे. विलासराव पोवार सर म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जनतेला आरोग्यवान जीवन जगता यावे म्हणून गल्लोगल्लीत तालमी बांधून व्यायामाची सवय लावली. कोल्हापूरच्या महाराणी जिजाबाईनी आपल्या राज्यात दोनशे वर्षापूर्वी दारूबंदी केली होती. प्रा. डॉ. छाया पोवार यांनी दारूबंदी करणार्या महिलांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. अमर पाटील यांनी ‘अंनिस’च्या कार्यक्रमाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संजय आर्दाळकर, आक्काताई पाटील, संजय परिवर्तन स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णात कांबळे यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन संजय सुळगावे यांनी केले.
कोल्हापूरमध्ये न्यू कॉलेज कोल्हापूर, शाहू कॉलेज कोल्हापूर, माझी शाळा-सुसंस्कार हायस्कूल कदमवाडी, प्रबुद्ध भारत हायस्कूल शिंगणापूर आणि ज्योतिर्लिंग हायस्कूल वडणगे, निगवे दुमाला या ठिकाणी ‘द-दारू’चा नव्हे, ‘द-दुधा’चा, ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उपक्रमांतर्गत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी सीमा पाटील, सुजाता म्हेत्रे, रमेश वडणगेकर, किरण गवळी, अनिल चव्हाण, संजय कळके, प्रमोद म्हेत्रे, संजय अर्दाळकर, सुजाता पाटील, संजय सुळगावे यांनी विशेष प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी केला.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्याच्या नावाखाली मद्यसंस्कृतीकडे आकर्षित झालेल्या तरुणाईला परावृत्त करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि सुसंस्कार शिक्षण मंडळ, कोल्हापूर यांच्यावतीने सुसंस्कार हायस्कूलमध्ये व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन या उपक्रमांतर्गत दारू’चा नव्हे ‘द-दुधा’चा हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमासाठी सुसंस्कार शिक्षण मंडळाचे संस्थापक व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती कोल्हापूरचे उपाध्यक्ष एम. एच. मगदूम, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या राज्य समिती सदस्या सीमा पाटील, माझी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा हुल्ले, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरत लाटकर होते. सीमा पाटील यांनी व्यसन व त्याचे दुष्परिणाम; तसेच तरुण पिढीचे व्यसनात वाहवत जाण्याचे विदारक दृश्य या अंगाने मांडणी केली. यावेळी विद्यार्थ्यांना सुगंधी दूध देण्यात आले. तसेच व्यसनमुक्तीपर चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले. सूत्रसंचलन सागर पाटील यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक संजय कळके यांनी केले. आभार गुलाब आत्तार यांनी मानले.
14) वर्धा
‘द दारू’चा नव्हे, तर ‘द-दुधा’चा उपक्रम महाराष्ट्र् अंधश्रधा निर्मूलन समिती, वर्धा जिल्हा व जातिअंत संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे यांच्या हस्ते दारू सोडणार्या व्यक्तीला दूध देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रतीक्षा हाडके, जिल्हा सचिव दुर्गा काकडे, जिल्हाध्यक्ष नरेंद्रकुमार कांबळे व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा कार्यध्यक्ष नम्रता भोंगाडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव भैयाजी देशकर, महाराष्ट्र अंनिसचे उपाध्यक्ष सुरेश रंगारी, राजेश वाघमारे, चंद्रप्रकाश बनसोड, प्रभाकर धवणे, माकपचे शहर सचिव समीर बोरकर, जनवादी महिला संघटनेच्या उपाध्यक्ष दीपमाला मालेकर, प्रीतम हिराणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होतो. याप्रसंगी नरेंद्रकुमार कांबळे यांनी प्रस्तावना मांडली व ‘अंनिस’च्या कार्याची माहिती दिली; तर यशवंत झाडे म्हणाले की, व्यसनांमुळे सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक दुष्परिणाम होतो. प्रतीक्षा हाडके, दुर्गा काकडे यांनी सरकारच्या दारूबाबत दुटप्पी नीतीचा निषेध केला. याप्रसंगी नम्रता भोंगाडे, संजय भगत, प्रभाकर धवणे यांनी व्यसनमुक्तीचे गीत सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नम्रता भोंगाडे, आभार शीतल बनसोड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेकरिता दशरथ गवळी, नीलेश दंभारे, गणेश गेडाम, समीर उपाटे, गजानन मानकर, पल्लव दातारकर, चंद्रभान नाखले, अनिल खनडाळकर आदींनी सहकार्य केले. या अभिनव उपक्रमात प्रभाकर धवने यांनी वाटपाकरिता 20 लिटर दूध पुरवठा करून सहकार्य केले.
15) पेण
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती म्हणजे ‘नेहमी धर्माबद्दल काहीतरी वेडेवाकडे बोलणार’; त्यातही ‘हिंदू धर्मामध्येच चुका काढत बसणार,’ असं बर्याच जणांना वाटतं. समिती घेत असलेल्या उपक्रमांकडे एक नजर टाकली तर हे खरं नाही, हे सहज लक्षात येईल.
वास्तविक, अंधश्रध्दा काही धार्मिकच असते असं नव्हे; ती आर्थिक, सामाजिकही असू शकते. कुठल्याही क्षेत्रात डोळे बंद करून (आणि मेंदूला कुलूप लावून) एखादी गोष्ट स्वीकारली आणि लोकांनी ती पाळली की, अंधश्रध्दा जन्माला येतेच. अमुक अंगठी घातली किंवा तमुक पूजा केली की, धनलाभ होईल ही आर्थिक अंधश्रध्दाच. एखादा मनुष्य अमुक जातीचा आहे म्हणून तो आपल्यापेक्षा उच्च किंवा नीच आहे, ही सामाजिक अंधश्रध्दा.
सुरुवातीला सर्वच अंधश्रध्दा निरुपद्रवीही वाटतात, कोणाच्या लक्षातही येत नाहीत. त्या संबंधित व्यक्तीपुरत्या सीमित असतात. त्यातून जेव्हा त्या व्यक्तीला किंवा इतरांना त्रास होतो, तेव्हाच आपले लक्ष तिथे वेधले जाते. पण तोपर्यंत तो माणूस त्यात इतका गुंतलेला असतो की, हस्तक्षेप करणे कठीण होते. व्यसनाची पहिली सुरुवातही तशीच असते. मित्रांसोबत पहिला पेला घेता-घेता केव्हा त्या पेल्यात आपण बुडून जाऊ, ते सांगता येत नाही.
आताच्या काळात दारू, सिगरेट, ड्रग्स या गोष्टींना एक सामाजिक मान्यता आली आहे, त्याभोवती एक चकचकीत वलयही आले आहे. ते भेदणे आणि प्रवाहाविरुध्द जाऊन ‘मला ड्रिंक्स नकोत,’ हे सांगणे युवकांना कठीणच जाते.
म्हणूनच गेली अनेक वर्षेसमिती ‘चला, व्यसनाला बदनाम करूया,’ हा उपक्रम दरवर्षी 31 डिसेंबरला घेत आहे. बर्याच जणांचा पहिला पेला या तारखेला ठरलेला असतो म्हणून आजच्या दिवसाचे औचित्य.
त्यानिमित्ताने पेणमध्ये सार्वजनिक विद्यालय येथे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे अकरावी, बारावीच्या मुलांसाठी व्याख्यान आयोजित केले होते. डॉ महानंदा म्हात्रे च.ऊ. (चशव) यांनी स्वतः पाहिलेल्या व्यसनी माणसांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या वाईट स्थितीची उदाहरणे दिली. व्यसनांचे आपल्यावर होणारे परिणाम याविषयी जागृत केले आणि मित्रांच्या आग्रहाला बळी न पडता व्यसने टाळा, असे कॉलेज युवकांना कळकळीने आवाहन केले.
संदेश गायकवाड, चंद्रहास पाटील, सतीश पोरे, लोहोकरे मॅडम, मीना मोरे, सावनी गोडबोले या सर्वांच्या परिश्रमाने समाजप्रबोधनाचा हा संदेश योग्य वयोगटापर्यंत पोचला.
16) वसई
वसई पश्चिम, भास्कर आळी, बेनिपेटी येथे प्रसिद्ध टीव्ही कलाकार राजेश उईके आणि ‘अंनिस’ कार्यकर्ते गौतम कांबळे यांच्या पुढाकाराने व्यसनविरोधी प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला. व्यसनाची दाहकता, कुटुंबाची होरपळ आणि हानी, युवा पिढीवर होणारा परिणाम याची माहिती, चमत्कार आणि विज्ञान, बुवाबाजी, आरोग्यविषयक अंधश्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन यावर प्रात्यक्षिकांसह संवाद अण्णा कडलासकर, संदेश घोलप यांनी घेतला. स्वागत राजेश उईके यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन लिंबू-मिरचीचे तोरण राष्ट्रसेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विनय वाज यांच्या हस्ते करून आणि अशा वस्तू नजर लागू नयेत म्हणून बांधण्यामागील फोलपणा सांगून केले. डोळस आणि व्यसनमुक्त समाज हे आपले ध्येय असावे, असे ‘अंनिस’ बोईसरचे कार्यकर्ते अनिल खिलारे यांनी प्रास्ताविकात सांगून उपस्थितांना ‘महा. अंनिस’च्या प्रबोधनकार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
पुस्तकांची विक्री करणारी व्यवस्था जिल्हा सोशल मीडिया विभाग कार्यवाह अंकुश मोरे यांनी पाहिली. परिसरातील नागरिकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
17) नागपूर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नागपूर शाखेच्या वतीने ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ या उपक्रमांतर्गत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दूध वाटप करण्यात आले. या उपक्रमांमध्ये दारूची पूर्णाकृती बाटली तयार करण्यात आली होती व तिला पुरुष व महिलांनी चप्पलने मारून दारूचा निषेध करण्यात आला. ‘द-दारूचा नव्हे, तर द-दुधाचा’, ‘हॅप्पी न्यू इयर, हॅप्पी न्यू इयर नो-दारू नो बीअर,’ ‘नो दारू-नो वाइन, प्या दूध -राहा फाईन’ अशा घोषणा देण्यात आल्या. यातून तरुण पिढीने दारूच्या आहारी न जाता व्यसनांपासून दूर राहायला हवे, व्यसनाचे मार्ग हे अंधश्रद्धेकडे नेतात, असा संदेश यातून दिला. यावेळी सर्व उपस्थितांना एक ग्लास दुधाचे वाटप करण्यात आले. यावेळी रामभाऊ डोंगरे राज्य कार्यकारिणी सदस्य, चित्तरंजन चौरे कार्याध्यक्ष नागपूर जिल्हा, देवानंद बडगे, आनंद मेश्राम, विभूतीचंद्र गजभिये, चंद्रशेखर मेश्राम, अशोक राऊत, चरणदास गजभिये, अजय रहाटे, शशांक चणकापुरे, अमित ढोरे, माधुरी मेश्राम, रंजना ठवरे, दीप्ती नाईक, श्वेता पाटील, निकी बोंदाडे, सुनीता गजभिये, छबु गजभिये, जान्हवी मेश्राम, सम्मेक मेश्राम, मनीषा बौद्ध, पूजा मेश्राम व ‘अंनिस’चे कार्यकर्ते उपस्थित होते. त्याप्रसंगी येणार्या-जाणार्या हजारो नागरिकांनी उपक्रमाबाबत कौतुक केले.
18) पिंपरी–चिंचवड
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी-चिंचवड व निगडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे आयोजित ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने वाईनविक्री धोरणाचा पुन्हा विचार करण्याची गरज आहे, असे मत राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख यांनी व्यक्त केले. गेली दहा वर्षे हा उपक्रम शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणेने दरवर्षी 31 डिसेंबर पिंपरी-चिंचवड परिसरात साजरा होत असतो. यावर्षी भक्ती-शक्ती उद्यानासमोर संस्थेच्या वतीने नागरिकांना मोफत दुधाचे वाटप करून प्रबोधनाची गाणी सादर केली गेली. त्याचप्रमाणे व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन केले गेले. महिलांनी दारूच्या प्रतीकात्मक बाटलीला जोडे मारून आपला निषेध व्यक्त केला. त्यामुळे अनेक नागरिक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. अत्यंत स्त्युत्य असा हा उपक्रम असून सर्व स्तरांपर्यंत राबवण्याची गरज आहे.
या उपक्रमासाठी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्रीराम नलावडे, पिंपरी-चिंचवड शाखेचे विजय सुर्वे, शुभांगी घनवट, अंजली इंगळे, विश्वास पेंडसे, चारूदत्त बुध्दिसागर, राजू जाधव, रवींद्र बोर्लीकर,अशोक जाधव यांनी कार्यक्रफाचे नियोजन केले. निगडी शाखेचे अध्यक्ष प्रदीप तासगावकर यांनी दुधासाठी सहकार्य केले. निगडी प्राधिकरण व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मुकेश सोमय्या यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. तसेच वाचकांना वार्षिक अंक देऊन पुढील वर्षाची वार्तापत्र सभासद नोंदणी केली. सर्व नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले व दुधाचा आस्वाद घेतला.
19) बाणेर, पुणे
31 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणे अंतर्गत बाणेर भागात ‘द-दारूचा नव्हे, द-दुधाचा’ हा प्रतीकात्मक उपक्रम बाणेर येथे संध्याकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला होता. प्रथम अलका जाधव यांनी स्वागत करून सर्वांना मास्क व सॅनिटायझरचे महत्त्व सांगितले व श्रीमती रमाबेनच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले. व्यसनमुक्ती कार्यकर्ता सर्जेराव कचरे इस्लामपूर (सांगली) यांनी व्यसनमुक्तीवर माहिती देऊन व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. डॉ. रवी वरखेडकर यांनी आभार मानले. यावेळी दूध, केळी वाटप करून उपक्रमाची सांगता झाली.
20) मोहने, ता. कल्याण
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती मोहने शाखेच्या वतीने ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ या नवीन उपक्रमांंतर्गत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी साडेपाच वाजता ‘द-दारूचा नव्हे, द-दुधाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ‘नो दारू नो वाईन’, ‘हॅपी न्यू इयर, नो दारू-नो बीअर’ अशा घोषणा देण्यात आल्या. शाखेच्या सांस्कृतिक विभागप्रमुख सुनीता चंदनशिवे यांनी व्यसनावर सुंदर गीत गाऊन वातावरणनिर्मिती केली.
याप्रसंगी व्यसनांचे दुष्परिणाम व आजची तरुण पिढी व्यसनाकडे वळत आहे व ते भविष्यात किती धोकादायक आहे, त्यासाठी ‘मअंनिस’चा उपक्रम किती महत्त्वाचा आहे, यावर ठाणे जिल्हा महिला विभागप्रमुख अविंदा वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड गुरुजी यांनीही व्यसनाधिनता ही एक सामाजिक समस्या असून त्यामुळे समाजाचे किती नुकसान होते, हे सांगितले. नवीन वर्षात कोणतेही व्यसन न करता व्यसनविरहित जीवन जगण्याचा संकल्प करण्याचे आवाहन सर्वांना केले.
या उपक्रमांतर्गत नागरिकांना दूध वाटप करण्यात आले व नवीन वर्षाचे स्वागत करताना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. ‘अंनिस’च्या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला व या उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी बी. एच. गायकवाड गुरुजी, डी. जे. वाघमारे, अविंदा वाघमारे, अश्विनी माने (शाखाप्रमुख), सुनीता चदनशिवे, सरिता ससाणे, श्रुती मॅडम, डी. के. भादवे, मधुकर कांबळे, प्रवीण माने, संदीप शिंदे, गौतम मोरे हे कार्यकर्तेव इतर समविचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा सचिव राजेश मोरे यांनी केले.
21) अंबरनाथ (जि. ठाणे)
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अंबरनाथ शाखेच्या वतीने ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ या उपक्रमांर्तगत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी 5 ते 7 यावेळेत ‘द-दारू’चा नव्हे ‘द-दुधा’चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘नो दारू-नो बीअर, हॅप्पी न्यू इयर’, ‘नो दारू- नो वाइन राहा फाइन’ अशा घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमांतर्गत नागरिकांना एक ग्लास दूध वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नववर्षाचे स्वागत करताना व्यसनांपासून दूर राहण्यासाठी आवाहन करण्यात आले. तसेच दारूच्या आहारी न जाता व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमास ‘महाराष्ट्र अंनिस’ शाखा अंबरनाथ येथील डॉ. शामकांत जाधव, किरण जाधव, किसन वराडे, बबन सोनवणे, अरुण तायडे, प्रदीप बर्जेबदलापूर आदी उपस्थित होते. तसेच राणू गॅस येथील कर्मचारी देखील सहभागी झाले होते. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया नोंदवल्या. नंतर नववर्षाच्या पूर्वसंध्येला अध्यक्ष किसन वराडे यांच्या ‘सरवा’ या आत्मकथाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्था, लातूरतर्फे सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल अंबरनाथ ‘अंनिस’ शाखेतर्फे अभिनंदनपर पत्र देऊन गौरविण्यात आले व कार्यक्रम संपन्न झाला.
22) रत्नागिरी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रत्नागिरी यांच्यावतीने मारुती मंदिर, रत्नागिरी येथे ‘चला व्यसनाला बदनाम करूया,’ ‘वाईन नको, दूध प्या’ हा उपक्रम राबवला. उपस्थित सर्वांना दुधाचे वाटप करण्यात आले. व्यसनांच्या दुष्परिणामाविषयी अंनिस कार्यकर्त्यांनी यावेळी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी विनोद वायंगणकर, राधा वणजू, मधुसुदन तावडे, अतुल तांबट, यशपाल तावरे, राजेश कांबळे, सुप्रभा वायंगणकर आणि संकल्प कला मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संकलन – राहुल थोरात