-

आधी आपण प्राणी होतो
प्रश्नाने आपणांस मनुष्य बनवले
प्रश्नामुळेच हिंसा आणि क्रूरता न
स्वीकारण्याचे धाडस निर्माण झाले
प्रश्नामुळेच वेद, ग्रंथ आणि
बायबल लिहिले गेले
आणि प्रश्नामुळेच ते सर्व
अस्वीकारार्ह ठरविण्यात आले
प्रश्नाने अन्यायावर प्रहार केला
प्रश्नानेच भयापोटी राजाच्या आदेशाला
मानण्याच्या प्रथेला आव्हान दिले
प्रश्नानेच असहमतीला सुळावर
चढविण्याच्या मनमानीला
चाप बसला
परंतु आता प्रश्नांवर संकट आहे
प्रश्न कैद केले जाताहेत
प्रश्नांना मारण्याची तयारी सुरूयं
एक माणूस आपली ‘मन की बात’
करत आहे
आणि
सांगत आहे की
यातच सारी उत्तरे आहेत
प्रश्न विचारणार्यांनाच प्रश्न विचारले जात
आहेत की,
त्यांच्या प्रश्नांमागे काय कारस्थान आहे?
अधिक प्रश्न विचारणार्यांवर दंगली
घडविल्याचा आरोप ठेवला जात आहे
आता प्रश्न हा आहे की प्रश्नांचे
काय करायचे?
प्रश्न नाही विचारले तर मनुष्य
नाही राहणार
आणि प्रश्न विचारले तर मारले जाणार
मूळ हिंदी कविता : सुभाष राय
मराठी अनुवाद : भरत यादव दूरभाष : 9890140500