-
मुंबई येथील मा. उदयदादा लाड यांच्या यूआरएल फौंडेशनचा या वर्षीचा नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीस दिला गेला. पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, गिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. रुपये 1 लाख व स्मृतिचिन्ह असे स्वरूप होते.
सातारा अंनिसचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार आणि सोलापूर अंनिस कार्यकर्त्या निशाताई भोसले यांना स्नेहालय संस्थेचा नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार दिला गेला.
तसेच पुणे येथील ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांना खटाव येथील पद्मभूषण डॉ. पा. बा. सुखात्मे समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सर्वांचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मन:पूर्वक अभिनंदन!