डॉ. प्रदीप पाटकर -
संवेदनशील असू शकतात
होऊ शकतात
माणसे, पशु पक्षी
अगदी वनस्पती सुद्धा!
पण देवाचं काय?
तो तर हरवून जातो
मंत्रतंत्रात, पोथ्यापुरणात,
अगम्य विशेषणांत,
नामजपाच्या हिशोबात
सहज ओढला जातो तो व्यापारात
बंदिस्त होतो परंपरेत, देवळात
शिल्पकारांच्या मूर्तीत
कसलाही विधिनिषेध
नुरलेल्या बळीविधीत.
तो असतो बंदिवान
तथाकथित नियतीच्या तुरुंगात
अठ्ठावीस युगांच्या माळा ओढीत
गप्प, निमूट, चुपचाप
आगामी अवताराच्या धास्तीत….
–डॉ. प्रदीप पाटकर, पनवेल
