अंनिसची महिलांसाठी राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा उत्साहात संपन्न

नीता सामंत -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य महिला विभागाने महिलांसाठी राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयाशी संबंधित मजकुराचे तीन मिनिटे अभिवाचन करायचे होते. तसेच त्या मजकुरावरील स्वतःचे मत एक ते दोन मिनिटांत मांडायचे होते. वाचन व मत असलेला व्हिडिओ स्वतःच्या फेसबुक पेजवर टाकायचा होता.

या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातील अंधश्रद्धांचे विषय महिलांनी अभिवाचनाद्वारे मांडले आणि त्यावरील स्वतःचे मनोगत व्यक्त केले. या अभिवाचनासाठी स्पर्धकांनी अंधश्रद्धेशी निगडित विविध विषयांची निवड केली होती. तृतीयपंथीय ते मासिक पाळीसारख्या संवेदनशील विषयांपर्यंतच्या अंधश्रद्धांचा यामध्ये समावेश होता. साप आणि त्याबद्दलच्या गैरसमजुती असो किंवा जटेशी निगडित कुप्रथा; अशा अनेक विषयांचा समावेश स्पर्धकांनी आपल्या अभिवाचनात केला होता.

‘अंधश्रध्दा निर्मूलन’ या विषयाशी निगडित वाचनाला चालना मिळावी, महिलांनी स्वतःचे मत निर्भीडपणे मांडावे, हा एक आणि समाजातील जास्तीत जास्त महिलांना ‘अंनिस’च्या कामाशी जोडून घेणे हा दुसरा उद्देश या स्पर्धेमागे होता.

‘महाराष्ट्र अंनिस’मधील प्रा. प्रभा पुरोहित, अंजली नांनल, निशा भोसले आणि प्रा. प्रवीण देशमुख यांनी परीक्षकांचे कठीण काम समर्थपणे पार पाडले.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नाट्य-चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलाकार चिन्मयी सुमित यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात सीमा पाटील यांनी गायलेल्या ‘युग क्रांतीचा आलं’ या सुंदर गीताने झाली. चिन्मयी सुमित यांनी ‘वाचनाने मी कशी समृद्ध झाले’ या विषयावर उत्स्फूर्तपणे ओघवत्या भाषेत केलेली मांडणी सर्वांना एक वेगळाच आनंद देऊन गेली. वाचनाने एखाद्याचे आयुष्य किती समृद्ध होऊ शकते, याची मांडणी करताना चिन्मयी सुमित यांनी स्वतःच्या जीवनातील वेगवेगळे अनुभव सांगितले. कोणत्याही प्रश्नावर भूमिका घेताना त्याबद्दल वाचून, स्वतःचे मत बनवण्याची सवय खूप उपयोगी पडते, असे त्यांनी सांगितले.

प्रा. प्रभाताई पुरोहित यांनी ‘अंनिस’ची ओळख करून दिली. पंचसूत्रीच्या माध्यमातून ‘अंनिस’ काय काम करते आणि महिलांचा सहभाग कसा आवश्यक आहे, याची मांडणी त्यांनी केली आणि जास्तीत जास्त महिलांनी ‘अंनिस’बरोबर जोडून घ्यावे, असे आवाहन केले. प्रा. प्रवीण देशमुख यांनी परीक्षण करताना परीक्षकांनी कोणते निकष लावले, हे समजावून सांगितले. ज्यांना बक्षीस मिळाले नाही, अशांच्या अभिवाचनातील वैशिष्ट्यांचा देखील त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

नीता सामंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्थपणे सांभाळले. सुनीता देवलवार यांनी स्पर्धेचा निकाल घोषित केला. मीना मोरे यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. पहिला क्रमांक मिळालेल्या डॉ. लता पाडेकर यांचा व्हिडिओ यावेळी दाखविण्यात आला.

या स्पर्धेत पुढील स्पर्धकांना पारितोषिक मिळाले.

प्रथम क्रमांक : डॉ. लता पाडेकर

द्वितीय क्रमांक : अ‍ॅड. स्वाती कुरनूरकर

तृतीय क्रमांक : हेमा चोपड़ा

उत्तेजनार्थ : शैला बाबर व सुवर्णा नारखेडे.

सर्वच स्पर्धकांना प्रशस्तिपत्र आणि बक्षीसपात्र विजेत्यांना बक्षिसे म्हणून रोख रक्कम व पुस्तक पाठवण्यात आले. नीता सामंत, सुनीता देवलवार, उषा शहा, सीमा पाटील, मीना मोरे, राधा वणजू यांनी ही स्पर्धा यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.उत्कृष्ट आयोजनाबद्दल या स्पर्धेचे आयोजक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य महिला विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन!

विवेकाचा आवाज बुलंद करूया….!

नीता सामंत, प्रा. प्रवीण देशमुख


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]