जीवनातील समस्येवर वैज्ञानिक दृष्टिकोनाने मात करता येते – मिलिंद देशमुख

-

– खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये अंनिसचा कार्यक्रम

                अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम हे स्वयं विकासचे काम आहे. नियमित व्यायाम वाचन व व्यसनापासून दूर राहून जीवनातील आपल्या वाटचालीत वैज्ञानिक दृष्टिकोन वापरला तर येणार्‍या प्रत्येक समस्येवर यशस्वी मात करता येते असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद देशमुख यांनी केले. ते दि. २१/१/२६ रोजी खंडाळा येथील पोलीस प्रक्षिशण केंद्रात महिला गृहरक्षक प्रशिक्षार्थी शिबिरात ते बोलत होते.

अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख पुढे म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी १९८९ साली सुरु केलेल्या म. अंनिसच्या अथक प्रयत्नातून महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा झाला असून त्या कायद्याबाबत समाजात जनजागृती होण्याची आवश्यकता आहे.

पिंपरी चिंचवड शाखेचे कार्यकर्ते सुभाष सोळंकी व राजू जाधव यांनी चमत्कार प्रात्याक्षिके करून दाखवली. प्रशिक्षणार्थींना त्यामागील विज्ञान समजावून सांगितले. प्रशिक्षण समन्वय अधिकारी पोलीस निरीक्षक संजय केदारे, पोलीस निरीक्षक आनंद रुईकर यांनी संयोजन केले. मा. श्रीहरी पाटील, उपप्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा यांनी कार्यक्रमास सहकार्य केले. याआधीही दि. १९/१२/२०२५ रोजी साठ महिला गृहरक्षक प्रशिक्षणार्थींचे याच प्रकारचे प्रशिक्षण झाले होते. त्या वेळी विश्वास पेंडसे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी ग्रंथदिंडी लावली होती. त्या वेळी अनेकांनी पुस्तके घेतली होती. यासाठी रामभाऊ नलावडे व राजू जाधव यांनी मदत केली होती.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]