मोहसीन शेख -
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मुस्लीम सत्यशोधक मंडळ, सातारा आयोजित
बकरी ईद (ईद उल अजहा) हा त्यागाचा, बलिदानाचा अर्थात कुर्बानीचा संदेश देणारा सण आनंदाने साजरा करणेसाठी कालसुसंगत बदल करून ‘रक्तदान’ करून मानवतेचा खरा विचार समाजात देणेसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्यभरात मागील ११ वर्षांपासून सतत ‘रक्तदान उपक्रम’ राबवते. त्याबरोबर मुस्लीम सत्यशोधक मंडळ या कामी अग्रेसर आहे.
या उपक्रमास दर वर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सातारा येथे सकाळी १०-१ या वेळेत २० जणांनी रक्तदान केले. माऊली ब्लड बँक यासाठी कायम सहकार्य करते.
या उपक्रमात मोहसीन शेख, श्रेयंषू माने, प्रवीण माने, शामली माने, प्रशांत पोतदार, उदय चव्हाण, इंद्रजीत कदम, डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. प्रदीप झनकर, डॉ. दीपक माने, महादेव इंगळे, शाहरुख शिकलगार, सार्थक पाटील, इंद्रजीत कदम इ. लोकांनी सहभाग घेतला. याचे सर्व नियोजन मोहसीन शेख व वंदना माने यांनी केले.
– मोहसीन शेख, सातारा
